$type=ticker$snippet=hide$cate=0

महाविकास आघाडीची कसोटी

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात काय गदारोळ होणार, याची चुणूक भारतीय जनता पक्षाने दाखवून दिली आहेच. राज...


महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात काय गदारोळ होणार, याची चुणूक भारतीय जनता पक्षाने दाखवून दिली आहेच. राज्यांत झालेली अतिवृष्टी, त्याची मदत मिळण्यास होत असलेला विलंब, राज्याच्या महसुलात झालेली घट, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ, त्यावरचा राज्य सरकारचा कर, गारपीट, गुंतवणुकीत महाराष्ट्राची झालेली पिछेहाट, देशातील कोरोनाबाधितांतील महाराष्ट्राची चिंता वाटावी अशी संख्या, बुलेट ट्रेनला झालेला विरोध, मेट्रो कारशेडचा न सुटलेला प्रश्‍न असे विविध प्रश्‍न सरकारसमोर असताना मंत्र्यांविरोधातील आरोपाने सरकारची कोंडी करण्याची आयती संधी प्रबख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मिळाली आहे. 

करुणा शर्माप्रकरणात धनंजय मुंडे अडकले, तर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले.  आता या दोघांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. राज्याचा गेल्या सहा महिन्याचा गाडा अक्षरशः कर्ज काढून हाकावा लागला आहे. आताही तुटीचा अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे. वाढत्या अपेक्षा आणि कोरोनाने उत्पन्नाला लावलेली कात्री अशा संकटात अजित पवार यांची अर्थसंकल्प मांडताना कसोटी लागली आहे. आमदारांच्या निधीत एक कोटी रुपयांची घातलेली भर, जिल्हा नियोजन व विकास निधीसाठी केलेली जादा तरतूद पाहता त्यासाठी तरी पैसा कुठून आणणार, या प्रश्‍नाचे उत्तर अर्थसंकल्पीय भाषणातच मिळणार आहे. त्यातच सरकारमधील तीन पक्षांतील विसंवादावरून भाजपने सरकारची कोंडी करण्याचे ठरविले आहे. एकीकडे ही स्थिती असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे वनमंत्री संजय राठोड हे सोमवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाचे लक्ष्य असणार आहेत. त्यात महाराष्ट्र विकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही राठोड यांच्या बचावासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या भाजपचा अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकहाती सामना करावा लागणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेली शिवसेना राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंधांची टांगती तलवार, कोरोना नियमांची होणारी पायमल्ली, वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ, मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी होणारा विलंब, शिक्षकांचे सुरू असलेले आंदोलन, शिक्षण खात्यातील गोंधळ, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाढता विसंवाद, सेलिब्रेटींच्या ट्वीटची चौकशी आदी असंख्य मुद्द्यांवरून सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तापणार आहे.

कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रथमच अर्थसंकल्पीय अधिवेशन जेमतेम आठ दिवस चालणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याच्या कारणावरून भाजपने कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेतले जात असल्याने भाजप त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरण्याचे भाजपने ठरवले आहे. या प्रकरणात समोर येत असलेली माहिती आणि कोरोनाचे निर्बंध झुगारून पोहरादेवी येथे केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे राठोड यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने राठोड यांच्यापासून दो गज दुरी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राठोड प्रकरणात एकट्या शिवसेनेला भाजपशी दोन हात करावे लागणार असल्याचे दिसते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री राठोड हे संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यात राठोड यांचा आवाज असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने सरकारवर हल्ले चढवण्यात येत आहेत. भाजपच्या महिला आघाडीने राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शने केली. त्याचवेळी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या सर्वामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्याविरोधात पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप आहे. सर्व पुरावे समोर आलेले असताना सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांच्या पतीविरोधातील एका प्रकरणाची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली आहे. वाघ या सातत्याने पूजा चव्हाण प्रकरणात सरकारला प्रश्‍न विचारत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या प्रकरणाची आता चौकशी सुरू करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यकत्यांना त्रास दिला म्हणून आम्ही मागे हटणार नाहीत. पक्ष चित्रा वाघ यांच्या पाठीशी आहे, असे पाटील यांनी सांगितले. वाघ यांच्या पतीच्या प्रकरणात काय आर्थिक हेराफेरी झाली असेल तर चौकशी करा; पण दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला, तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या चहापानावरदेखील विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. अर्थात आता चहापानावर बहिष्कार घालण्याची प्रथाच पडली आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांचे नातेवाइक यांच्याविरोधातील गुन्हे तसेच मंत्र्यांची कारस्थाने याविरोधात आम्ही राज्य विधिमंडळ अधिवेशनात रान उठवू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक, संजय राठोड यांच्याविषयी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक होणार आहे. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीजबिल तसेच मंत्र्यांशी संबंधित प्रकरणे यावरुन भाजप महाविकास आघाडी सरकारविरोधात सभागृह दणाणून सोडण्याची शक्यता आहे. अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा भाजपचा सध्या पवित्रा दिसत आहे. दुसरीकडे विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करू नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्‍नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची गच्छंती होणार हे आता जवळपास निश्‍चित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्वीट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्वीट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो, असे सूचक तितकेच रोखठोक ट्वीट राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊत यांनी ट्वीट केले आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊत यांनी ट्वीट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. अर्थात राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप गप्प बसून कामकाज सुरळीत चालू देण्याची शक्यता नाही.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: महाविकास आघाडीची कसोटी
महाविकास आघाडीची कसोटी
https://1.bp.blogspot.com/-MjQ4aGEBKNw/YDuNGZ2OUwI/AAAAAAABopY/2ydtwaCpwjk2h9LbePE8EXa-iRg_wrWIgCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-MjQ4aGEBKNw/YDuNGZ2OUwI/AAAAAAABopY/2ydtwaCpwjk2h9LbePE8EXa-iRg_wrWIgCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_44.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_44.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content