$type=ticker$snippet=hide$cate=0

औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री ही घोडचूकः डॉ. राजन

मुंबई/प्रतिनिधीः चलनविषयक धोरणाच्या चौकटीत कोणताही बदल केला तर त्याने बाँड बाजार प्रभावित होऊ शकतो, असा इशारा जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ....


मुंबई/प्रतिनिधीः चलनविषयक धोरणाच्या चौकटीत कोणताही बदल केला तर त्याने बाँड बाजार प्रभावित होऊ शकतो, असा इशारा जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी दिला. खासगीकरणावरील सरकारचे रेकॉर्ड हे चढ-उतार असलेले आहे. औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री करणे ही घोडचूक ठरू शकते, असा इशारा त्यानी दिला.  


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान सरकार या वर्षी दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करणार असल्याचे म्हटले होते. सरकारने 2019 मध्ये एलआयसीमधील आयडीबीआय बँकेच्या मोठ्या हिस्स्याची विक्री केली होती. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. यापैकी दोन बँकांचे खासगीकरण 2021-22 या आर्खिक वर्षात करण्यात येणार आहे. या खासगीकरणानंतर सरकारी बँकांची संख्यी दहा राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. राजन यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्स करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य हे आकांक्षेपेक्षा अधिक आहे. याची योग्य प्रकारे गणनाच केली गेली नाही, असे ते म्हणाले. भारताची आर्थिक धोरणांची चौकट चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास आणि विकासास प्रोत्साहन देण्यास मदत करते. कोणताही मोठा बदल बाँड बाजारावर परिणाम करू शकतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले. माझा विश्‍वास आहे, की (चलनविषयक धोरण) चौकटीने महागाई कमी करण्यास मदत केली आहे. रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी थोडीशी लवचिकता दाखवली आहे. माझा असा विश्‍वास आहे, की चलनवाढीची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक धोरण प्रणालीने मदत केली आहे. रिझर्व्ह बँकेला अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासही वाव आहे. ही रचना जर नसती, तर आपल्याला इतकी मोठी वित्तीय तूट कशी सहन करावी लागली असती, याची कल्पना करणेही कठीण आहे, असे ते म्हणाले. चलनवाढीच्या धोरणांतर्गत दोन ते सहा टक्के महागाईच्या उद्दीष्टाच्या आढावा घेण्यास आपण अनुकूल आहात का, असा सवाल त्यांना करण्यात आला. किरकोळ महागाई चार टक्के (दोन टक्क्यांपेक्षा अधिक किंवा कमी) ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांंच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक दर ठरवत असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. राजन यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात खासगीकरणावर जोर देत असल्याचे म्हटले. खासगीकरणाबाबत सरकारचा रेकॉर्ड हा चढ उतार असलेला आहे; परंतु या वेळी तो वेगळा असू शकतो. अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात खर्च आणि मिळकतीबाबत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. यापूर्वीच्या अर्थसंकल्पांमध्ये हे दिसत नव्हतं, असेही त्यांनी नमूद केले.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री ही घोडचूकः डॉ. राजन
औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री ही घोडचूकः डॉ. राजन
https://img.etimg.com/thumb/width-1200,height-900,imgsize-228505,resizemode-1,msid-67035016/news/economy/policy/urjit-patels-resignation-is-a-note-of-protest-raghuram-rajan.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_460.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_460.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content