$type=ticker$snippet=hide$cate=0

एक असं आहे....

नगरच्या आनंदऋषीजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागील रस्त्यावरील देवेंद्र बंगला. दिवसभर तेथे नेहमी माणसांचा राबता. सिंहासनासारख्या खुर्ची...

नगरच्या आनंदऋषीजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागील रस्त्यावरील देवेंद्र बंगला. दिवसभर तेथे नेहमी माणसांचा राबता. सिंहासनासारख्या खुर्चीवर व्यक्तिमत्व विराजमान झालेले...समोर पदाधिकारी व कार्यकर्ते बसलेले..विविध विषय चर्चेत सुरू आहेत..आणि अचानक त्यांचा आवाज येतो...एक असं आहे.. अशी संभाषणाची वा भाषणाची सुरुवात ‘त्यांनी’ केली की, एका प्रचंड आत्मविश्‍वासी व धाडसी व्यक्तिमत्त्वाचे वैचारिक पैलू उलगडू लागतात. नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचा संवाद सुरू होतो. प्रत्येकाच्या विषयाची माहिती घेऊन त्या विषयातील इन-आऊटस समोरच्याला समजून सांगण्याची त्यांची हातोटी. 


त्यांनी विषय उलगडून दाखवला की, ऐकणाराही समाधान पावत असे. समाजाच्या वेदना समजून घ्यायला वा त्या सोडवायला उच्च शिक्षणच हवे, हा राजकीय दावा कृतीतून खोडताना- केवळ मनात संवेदना असतील तर समोरच्याच्या वेदना जाणवतात व त्या सोडविण्याची प्रेरणाही देतात, हे दाखवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते दिलीप गांधी. तीन वेळा नगरसेवक, एकदा उपनगराध्यक्ष, नगर अर्बन बँकेसारख्या शतक महोत्सवी बँकेचे तीन वेळा संचालकपद व दोनवेळा अध्यक्षपद, तीन वेळा खासदारकी, यात एकदा केंद्रीय राज्यमंत्रीपद अशी धडाकेबाज राजकीय वाटचाल असलेल्या गांधींना एकदा पराभव पाहावा लागला आहे व तो म्हणजे हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत. अर्थात त्यावेळी या संस्थेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. पण ते त्यांना पुढे राखता आले नाही. 1985 मध्ये नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करताना नगरच्या विकासाचे महापुरुष मानल्या गेलेल्या नवनीतभाई बार्शीकरांचा केलेला पराभव व त्यातून ‘जायंट किलर’ची निर्माण झालेली प्रतिमा, 1999मध्ये प्रथम खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना नगरला आणण्याचा लावलेला धडाका, त्या काळात म्हणजे पहिल्या खासदारकीच्यावेळी मतदारसंघातील प्रत्येक गावात छोटे-मोठे केलेले काम तसेच राज्यातील तत्कालिन प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे या पक्षीय ताकदीला ‘बायपास’ करून मिळवलेले मंत्रीपद, त्यानंतर 2004मध्ये खासदारकीचे कापले गेलेले तिकीट, त्यातून आलेला राजकीय विजनवास, अशा स्थितीत अन्य पक्षांचे निमंत्रण असतानाही भारतीय जनता पक्षाशी दाखवलेली निष्ठा, ही दिलीप गांधींच्या पहिल्या टप्प्यातील राजकीय वाटचालीची गाथा. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 2009मध्ये पुन्हा मिळालेली खासदारकी व नंतर 2014मध्ये मोदी लाटेने दिलेली तिसरी खासदारकी अशी वादळी राजकीय वाटचाल असलेल्या गांधींनी गेल्या 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांवरही काम केले व स्वतःच्या धाडसी स्वभावाचा, आक्रमकतेने निर्णय घेण्याच्या सवयीचा नित्य प्रत्ययही दिला.


लढवय्येपणातून सुरुवात

दिलीप गांधींच्या राजकारणाची सुरुवात लढवय्येपणातून झाली. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर कौटुंबिक गरज म्हणून 1968मध्ये नगरमधीलच एका खासगी दुकानात त्यांनी नोकरी धरली. तीन-चार वर्षे ती केल्यावर अंगभूत धडपड्या स्वभावातून स्वतःची ज्युसची गाडी सुरू केली. नगरच्या प्रसिद्ध कापड बाजारात रोज रात्री 9च्या पुढे (आजही) चौपाटी भरते. येथील विविध खाद्यपदार्थांच्या व गरम मलई दुधाच्या आस्वादासाठी शहरभरातून अनेकजण आवर्जून येतात. या चौपाटीवर गांधींची ज्युसची गाडी असायची. चार-पाच वर्षांच्या या वाटचालीत जनसंघाच्या मुशीत तयार झालेल्या या व्यक्तिमत्त्वाने चौपाटी व्यावसायिकांची संघटना बांधली, अध्यक्षपदही भूषविले. रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने पकडून देण्याच्या धाडसाने 1976-77च्या त्या काळात एका रात्रीत नगरमध्ये लोकप्रियता लाभलेल्या दिलीप गांधींना नंतर या लढवय्येपणाचा स्वतःच्या राजकीय कारकीर्दीची पायाभरणी करण्यासाठी फायदाच झाला. युवा मोर्चा अध्यक्षपद, भाजप जिल्हा महासचिव, संयुक्त सचिव अशी संघटनात्मक पदे मिळाली. पुढे नगरसेवकपदाचे तिकीट मिळाले. त्यानंतर ते तीन वेळा नगरसेवक झाले. एकदा उपनगराध्यक्षपदही भूषवले.


पहिला अल्पसंख्याक खासदार

दिलीप गांधी यांची राष्ट्रीय स्तरावरील राजकीय कारकीर्दीची सुरुवातही मजेशीर आहे. 1999मध्ये श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली होती. पण नंतर ती लोकसभेची उमेदवारी अचानक रद्द झाली व गांधींना संधी मिळाली व सहकार सम्राटांच्या नगर जिल्ह्यात पहिला अल्पसंख्याक खासदार झाला. दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात एकदा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविलेल्या या व्यक्तिमत्त्वाला 2014मध्ये देशात आलेल्या ‘अब की बार मोदी सरकार’मध्ये मंत्रिपदाची संधी मिळण्याची अपेक्षा होती. तसे त्यांनी सर्व तर्‍हेने प्रयत्नही केले होते. पण ते झाले नाही. तसे जर झाले असते तर तर तो त्यांच्या राजकीय जीवनाचा कळसाध्याय ठरला असता. पण त्यांच्या मंत्रीपदाचे भाग्य त्यांच्या व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे नव्हते.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: एक असं आहे....
एक असं आहे....
https://1.bp.blogspot.com/-8DTmnbFzJXY/YFIJq75jrxI/AAAAAAABpCw/qa0YGBTPK_QDs08Ur4acJQX_7KSoXP1ygCLcBGAsYHQ/s320/17-dilip%2Bgandhi-10.jpg
https://1.bp.blogspot.com/-8DTmnbFzJXY/YFIJq75jrxI/AAAAAAABpCw/qa0YGBTPK_QDs08Ur4acJQX_7KSoXP1ygCLcBGAsYHQ/s72-c/17-dilip%2Bgandhi-10.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_498.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_498.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content