$type=ticker$snippet=hide$cate=0

नव्या शेतकरी कायद्यांची नगरला केली जाणार होळी

अहमदनगर/प्रतिनिधी- दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली ...

अहमदनगर/प्रतिनिधी- दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 23 मार्चला शहिद दिनी मोदी सरकारचा निषेध केल्यानंतर 28 मार्चला शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व वीज विधेयकाची होळी नगरमध्ये केली जाणार आहे. अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती व जन आंदोलनाच्या संघर्ष समितीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 


    दीर्घकाळापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत असताना येत्या शुक्रवारी (26 मार्च) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती व जन आंदोलनाच्या संघर्ष समिती या भारत बंद मध्ये सहभागी होणार आहे. तर मंगळवारी (23 मार्च) शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन करुन मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तसेच रविवारी (28 मार्च) रोजी होळीनिमित्त शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व वीज विधेयक 2020 ची होळी करण्यात येणार असल्याचे हमाल पंचायत येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी दिली. भारतीय महिला फेडरेशन अध्यक्षा स्मिता पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष व मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, अ‍ॅड. सुभाष लांडे, किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अ‍ॅड. बन्सी सातपुते, महेबुब सय्यद, आयटकचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे रामदास वागस्कर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, सरकारी कर्मचारी नेते रावसाहेब निमसे, आर्किटेक्ट अर्शद शेख, युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज शेख, सतीश पवार, भाऊसाहेब थोटे, दीपक शिरसाठ, कार्तिक पासलकर आदी उपस्थित होते.


दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास 26 मार्चला चार महिने पूर्ण होत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठ्या व शेतकरी-कामगार जनसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे दीर्घकाळ चाललेल्या देशातील पाचशेच्यावर शेतकरी संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनात आतापर्यंत 250 च्यावर शेतकरी आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत. भाजप वगळता सर्व पक्ष व जनसंघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी आंदोलनास पाठबळ देण्यासाठी 26 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती उतरणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच मंगळवारी 23 मार्च रोजी शहीद दिनी पत्रकार चौकातील शहिद भगतसिंग स्मारक येथे शहिद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन करुन मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तर 28 मार्चला होळीला शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व वीज विधेयक 2020 ची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.



Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नव्या शेतकरी कायद्यांची नगरला केली जाणार होळी
नव्या शेतकरी कायद्यांची नगरला केली जाणार होळी
https://d282wbz2keffpz.cloudfront.net/wp-content/uploads/2020/12/07183723/Delhi-Farmer-protest-And-modi.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_541.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_541.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content