$type=ticker$snippet=hide$cate=0

क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी कायदा करणार

  मुंंबई/प्रतिनिधीः क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कठोर कायदे करणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्था रॉ...

 



मुंंबई/प्रतिनिधीः क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कठोर कायदे करणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, जे लोक क्रिप्टोकरन्सी ठेवतात, व्यापार करतात आणि अशा लोकांना जेलवारी आणि दंड भरावा लागू शकतो.  


    एका अहवालानुसार, सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी कायदा करणार आहे. क्रिप्टोवर बंदी घालणारे कायदे डिजिटल करन्सी बिल 2020 मंजूर केल्यास कायदा करून क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणारा भारत पहिला देश ठरेल. 2019 मध्ये, सरकारने स्थापन केलेल्या समितीने क्रिप्टोकरन्सीचा व्यापार करणार्‍या, ते बाळगणार्‍यांना किंवा दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित करणार्‍यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिफारस केली होती; परंतु खासगी डिजिटल चलनावर बंदी घालणार्‍या विधेयकात शिक्षेची तरतूद जोडली गेली आहे की नाही, हे सूत्रांनी सांगितले नाही; परंतु विधेयकावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. गुंतवणूकदारांना त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावित विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे, की भारतीय कंपन्या आणि सामान्य लोक डिजिटल चलन स्वरूपात मालमत्ता गोळा करू शकणार नाहीत. तथापि, बिटकॉइनसारख्या खासगी क्रिप्टोकर्न्सीवरील बंदीपूर्वी, केंद्र सरकार आपल्या गुंतवणूकदारांना यातून बाहेर पडण्याची संधी देईल; परंतु क्रिप्टो मालमत्ता कायदेशीर करण्यासाठी गुंतवणूकदारांना भारी दंड भरावा लागेल. 

वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, की क्रिप्टो मालमत्तेला कायदेशीरपणा देण्यासाठी किती दंड भरावा लागेल हे अद्याप ठरलेले नाही. डिजिटल चलन विधेयकाचा उद्देश आरबीआयद्वारे जारी केलेला अधिकृत डिजिटल चलन किंवा सरकारी क्रिप्टोकरन्सी तयार करण्यासाठी कायदेशीर मार्ग तयार करणे हा आहे. केंद्र सरकार मुक्त मनाने नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यास तयार आहे आणि या नवीन तंत्रज्ञानामध्ये क्रिप्टोकरन्सीचा समावेश आहे, असे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते. ब्लॉकचेन हे नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे. अनुराग ठाकूर यांचे हे विधान सरकारच्या क्रिप्टोकरन्सीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणताना दिसत आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकर्न्सीचा तज्ज्ञ भविष्यकालीन चलन म्हणून उल्लेख करतात. शनिवारी पहिल्यांदाच बिटकॉईनने सर्व विक्रम मोडले आणि साठ हजारांचा टप्पा गाठला. एका बिटकॉईनची किंमत वाढून, 61 हजार 556 म्हणजेच 44.77 रुपये झाली. मार्च 2020 मध्ये एका बिटकॉईनची किंमत फक्त पाच हजार डॉलर होती, जी आता 61 हजार डॉलर्सच्या पुढे गेली आहे. म्हणजेच, एका वर्षात बिटकॉइनच्या किंमती 1100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी कायदा करणार
क्रिप्टोकरन्सी रोखण्यासाठी कायदा करणार
https://www.majhapaper.com/wp-content/uploads/2019/07/libra.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_545.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_545.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content