$type=ticker$snippet=hide$cate=0

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपविरुद्ध भाजप

भारतीय जनता पक्षानं पश्‍चिम बंगालमध्ये चांगलेच पाय पसरायला सुरुवात केली होती. पश्‍चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय घेऊन मै...


भारतीय जनता पक्षानं पश्‍चिम बंगालमध्ये चांगलेच पाय पसरायला सुरुवात केली होती. पश्‍चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय घेऊन मैदानात उतरलेला भाजप प्रत्यक्ष विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसशी लढण्यापेक्षा स्वकीयांशीच लढत असल्याचं चित्र पुढं आलं आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती. 


    तृणमूल काँग्रेसला भाजपनं भगदाड पाडलं. बाहेरून आलेल्या दीडशेहून अधिक उमेदवारांना तिकिटं दिली. हे पाहिलं, तर भाजपनं पन्नास टक्क्यांहून अधिक उमेदवार्‍या आयाराम, गयारामांना दिल्या. भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तेव्हाही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तोडफोड केली होती. आता दुसरी यादी जाहीर केली, तर भाजपत जणू भूंकप झाल्यासारखी स्थिती झाली आहे. पुन्हा कार्यकर्ते रस्त्यावर आले. भाजपच्या कार्यालयांचीच तोडफोड केली. इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचं सांगणारा पक्ष खरंच इतरांसारखाच झाला आहे. मालदा, जलपाईगुडी, मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगनांसह अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली. भाजपनं चौरंगी येथील शिखा मित्र आणि काशीपूर बेलगाछियातील तरुण साहा यांना तिकीट दिलं; परंतु दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास नकार दिला. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. महिनाभरापूर्वी भाजपच्या बाजूनं असलेली परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. या घटना सूचित करतात, की पक्षात सर्व काही ठीक नाही. तिकिट वाटपामुळं संतप्त झालेले भाजप कार्यकर्ते संपूर्ण बंगालमध्ये रस्त्यावर आले आहेत. उमेदवारी वाटपामुळं भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांचं मनोबल खचलं आहे. तृणमूल काँग्रेसवर लोकांची नाराजी होती. त्याचा फायदा भाजप उठवेल, असं एकूण चित्र होतं; परंतु भाजपनं उमेदवारी दिलेल्या दोन याद्या पाहून जनता आता तृणमूल काँग्रेसऐवजी भाजपवरच नाराज झाली आहे. भाजपनं उपस्थित केलेल्या विकास आणि तुष्टीकरणाच्या मुद्दयाला जनता साथ देत होती; परंतु उमेदवार याद्यानंतर नाराजी वाढत गेली. तिकिट वाटपात पक्षाचे निष्ठावंत आणि पक्ष बदलून भाजपमध्ये सामील झालेले नेते यांच्यात समन्वय असायला हवा होता; परंतु तसा तो राहिला नाही. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास नकार देणार्‍या शिखा मित्रा म्हणाल्या, की भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत. दुसरीकडं साहा यांंनी उमेदवारी नाकारताना आपण अजून तृणमूल काँग्रेसमध्येच आहोत, असं जाहीर केलं. त्यामुळं भाजपचं हसं झालं. भाजपचे राष्ट्रीय युवा नेते सौरव सिकंदर यांनी राजीनामा दिला. सौरव हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते तपन सिकंदर यांचे पुतणे आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता भाजपच्या सभांना कमी गर्दी होत आहे. जुन्या कार्यकर्त्यांचा रोषही भाजपच्या सभांमध्ये दिसून येतो. बंगाली अस्मितेचा मुद्दा निवडणुकीवर वर्चस्व गाजवतो आहे. इथल्या बहुतेक लोकांना हिंदी भाषिक भाजप नेते आवडत नाहीत. भाजपला इथल्या बंगाली संस्कृती आणि राजकारण समजलं नाही, तर त्याचं मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. तृणमूल काँग्रेसला बंगाली अस्मितेच्या विषयावर भाजपनं कोणतीही संधी द्यायला नको होती. तीन दशकांहून अधिक काळ पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि नेत्यांशी भाजपनं बोलून यादी जाहीर करायला हवी होती.. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे, की तृणमूल काँग्रेसनं एकाचवेळी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनी जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला. भाजपला हे करता आलं असतं; परंतु ते शक्य झालं नाही. त्यामुळे लोकांमध्ये संदेश गेला, की आम्ही आपले उमेदवार ठरविण्यासही सक्षम नाही. दुखापत झाल्यानंतर ममतादीदी व्हीलचेअरवरून  प्रचार करत आहेत. त्यामुळं काही लोक ममताबद्दल सहानुभूती दाखवतात. भाजपच्या नेत्यांनी ममतांवर  वैयक्तिक हल्ले करण्याऐवजी भ्रष्टाचारावर आणि विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. निवडणुकीच्या तारखा नजीक येत असतानाच भाजपचं हिंदुत्व कार्डही कमकुवत होत आहे. या वेळी भाजपनं 15 मुस्लिम उमेदवारांना तिकिटं दिली आहेत. महिनाभरापूर्वी ज्या ध्रुवीकरणाविषयी चर्चा केली जात होती, त्याची आता फारशी चर्चा होत नाही. शिवाय भाजपचा गेम प्लान यशस्वी झालेला नाही. एमआयएम पश्‍चिम बंगालमध्ये सर्वत्र उमेदवार उभे केले, तर मतविभाजन होईल आणि भाजप यशस्वी होईल, असं गणित होतं; परंतु आता एमआयएमचे पश्‍चिम बंगालच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा दिला आहे. तसंच तृणमूल काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याचा फायदा ममतांना होणार आहे. भाजप विरुद्ध भाजप आणि तृणमूल विरुद्ध भाजप अशा लढतीचा फायदा तृणमूल काँग्रेसलाच होणार आहे. भाजपनं तयार केलेलं चुरशीच्या वातावरणाचं चित्र त्यामुळं आता अस्पष्ट व्हायला लागलं आहे.



Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पश्‍चिम बंगालमध्ये भाजपविरुद्ध भाजप
पश्‍चिम बंगालमध्ये भाजपविरुद्ध भाजप
https://1.bp.blogspot.com/-xx0Du0s3VjQ/YFXvDH49T5I/AAAAAAABpHM/8-h2VtlQp4ot-KzyFgVX9sgPUq--cbYSwCLcBGAsYHQ/s320/New%2BVindo%2Blogo.jpg
https://1.bp.blogspot.com/-xx0Du0s3VjQ/YFXvDH49T5I/AAAAAAABpHM/8-h2VtlQp4ot-KzyFgVX9sgPUq--cbYSwCLcBGAsYHQ/s72-c/New%2BVindo%2Blogo.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_556.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_556.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content