$type=ticker$snippet=hide$cate=0

पंकजा मुंडे यांचा निकटवर्तीय नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

बीड/प्रतिनिधीः बीड भाजपमधील माजी आमदार, पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकील...


बीड/प्रतिनिधीः बीड भाजपमधील माजी आमदार, पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे हा पंकजा यांना धक्का समजला जात आहे. भाजपाच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदरच बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची पीछेहाट होत असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

    विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आंधळे यांनी तीन मिनिटांचे भाषणसुद्धा ठोकले. या वेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत, आ.संदीप क्षीरसागर आ. बाळासाहेब आजबे आदी उपस्थित होते. त्यामुळे भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा असून लवकरच प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. आंधळे हे गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष होते तसेच ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी आता या माजी आमदारांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला माजी आमदारांची हजेरी हे त्याचे उदाहरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येदेखील भाजपला हवे तेवढे यश मिळवता आले नाही. आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतदेखील पीछेहाट होत असल्याने भाजपची व बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकद कमी तर होत नाही ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.



आगामी निवडणुकात भाजपची कसोटी

या निवडणुकीचे येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्येदेखील पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच सहकारी संस्थांमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी वैजनाथ बँकेच्या निवडणुकादेखील या कालावधीमध्ये होणार आहे. त्या दृष्टिकोनातून पंकजा यांनी या संदर्भात ठोस भूमिका नाही घेतली, तर भविष्यात या निवडणुकीत भाजपला जड जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. 

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पंकजा मुंडे यांचा निकटवर्तीय नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
पंकजा मुंडे यांचा निकटवर्तीय नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/gallery_md_100/public/news-story/cover-images/3Andhale_Keshavrao.gif?BYZ5t4mMwVhGotaOX2jGSSIU4QGHbpNN&itok=BKmO0DRT
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_568.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_568.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content