$type=ticker$snippet=hide$cate=0

टोलमध्ये झोल कसा होतो?

मुंबई/प्रतिनिधीः राज्य आणि केंद्र सरकारकडे जेव्हा पैशाची कमतरता असते, तेव्हा खासगीकरणातून कामे करून घेऊन लोकांकडून त्याचे पैसे वसूल केले जात...


मुंबई/प्रतिनिधीः राज्य आणि केंद्र सरकारकडे जेव्हा पैशाची कमतरता असते, तेव्हा खासगीकरणातून कामे करून घेऊन लोकांकडून त्याचे पैसे वसूल केले जातात. रस्त्यांच्या या कामांना बोल्ट (बांधा, वापरा व हस्तांतरण करा) असे म्हटले जाते. राज्यात व देशांत अनेक कामे करण्यात आली. त्या कामावर होणारा खर्च, त्याची भांडवली गुंतवणूक, त्यावर द्यावे लागणारे व्याज आदींचा विचार करून टोलवसुली करायला हवी; परंतु प्रत्यक्षात ही टोलवसुली जिझिया कर वसुली ठरली आहे. कसे ते मुंबई-पुणे रस्त्याच्या टोलवसुलीवरून लक्षात यायला हरकत नाही. 


रस्त्यांची कामे खासगीकरणातून करताना या रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांचे प्रमाण लक्षात घेतले जाते. त्यावरून रस्ता किती रुंद असायला हवा, हे ठरते. रस्त्याच्या बांधकामाचा एकूण खर्च विचारात घेता आणि त्यावरची भांडवली गुंतवणूक लक्षात घेऊन दररोज जाणार्‍या वाहनांची संख्या आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन टोलवसुली किती काळ सुरू ठेवायची, हे निविदा काढतानाच निश्‍चित केले जात असते. त्यात रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीच्या खर्चाचाही समावेश असतो. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्याच्या कामाकडे पाहावे लागेल. या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च आला. त्यावरचे सरासरी व्याज जरी गृहीत धरले, तर वर्षाला दोनशे कोटी रुपये व्याज पडेल. दहा वर्षांत दोन हजार कोटी रुपये व्याज झाले असते. अर्थात नंतरच्या काळात व्याज कमी झाले; परंतु सरासरी दहा टक्के व्याज पकडले, तरी एवढी रक्कम होते. त्यातही सर्वंच भांडवल कर्जारुपाने घेतले असे नाही. या रस्त्यावरून जाणार्‍या वाहनधारकांकडूनआजवर सहा हजार 773 कोटी रुपये टोल वसुलीतून मिळविण्यात आले. प्रत्यक्षात ही वसुली 4 हजार 330 कोटी रुपयांपर्यंत वसूल करणे आणि रस्ता हस्तांतरित करणे अपेक्षित होते. एकदा टोल वसुली संपली, की महाराष्ट्र  राज्य महामार्ग विकास मंडळाने (एमएसआरडीसी) रस्ता ताब्यात घ्यायला हवा होता; मात्र या रस्त्यासाठी झालेला खर्च परतावा म्हणून अद्याप 22 हजार 370 कोटी रुपये वसू होणे बाकी आहे असे महामार्ग विकास मंडळाला वाटते, तसे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्याच प्रतिज्ञापत्रात रस्ता तयार करण्यासाठी किती खर्च आला आहे, हे सांगण्याचा मात्र सोईस्कर विसर पडलेला दिसतो. रस्ता बांधणार्‍या कंत्राटदारास अद्याप नऊ वर्षे (2030 पर्यंत) टोल वसुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे सांगितले गेले. आजवर वसूल केलेला टोल आणि नऊ वर्षे होणार्‍या संभाव्य वसुलीचा आकडा तीस हजार कोटींच्या पुढे जातो. ही तर सामान्य जनतेच्या पैशांची लूट आहे.दोन हजार कोटींच्या रस्त्याला तीस हजार कोटी रुपये जनतेने मोजणे आणि ते एका कंत्राटदाराच्या खिशात जाणे म्हणजे जनतेला लुटण्याचा अधिकृत परवाना दिल्याचा प्रकार आहे. रस्ता तयार करायचा खर्च, त्याची निगा करण्याचा खर्च आदींचा हिशेब चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. ठेका वसुलीचा कालावधी निश्‍चित करण्यासाठी अपेक्षित वाहनांची वर्दळ कमी दर्शविली जाते. प्रत्यक्षात अधिक वाहने धावतात. एकदा खर्च तयार झाल्यावर त्याचा एकूण परतावा किती असणार याची आकडेवारी आधीच म्हणजे टोल वसुलीला प्रारंभ करताना जाहीर केली पाहिजे; मात्र यात सर्व गोलमाल आहे. त्यात रस्ते विकास महामार्ग मंडळाने योग्य भूमिका जनतेच्या बाजूने घेणे अपेक्षित असताना कंत्राटदार आणि टोल वसुलीच्या ठेकेदारांच्या पाठीशी ते उभे राहते. कोणत्या आधारे मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्यासाठीअद्याप 22 हजार 370 कोटी रुपये वसूल करायचे बाकी आहे, हे कुणीही सांगत नाही.  

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: टोलमध्ये झोल कसा होतो?
टोलमध्ये झोल कसा होतो?
https://static.toiimg.com/thumb/63482181.cms?resizemode=75&width=1200&height=900
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_574.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_574.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content