मुंबई : महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या शिवाय काही भागांत विजा आणि गारपीटीची ...
मुंबई : महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या शिवाय काही भागांत विजा आणि गारपीटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असे होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.