$type=ticker$snippet=hide$cate=0

केंद्र-राज्यात पुन्हा वादाची ठिणगी

कोणत्याही राज्यात काही गुन्हे घडले, तर त्याच्या तपासासाठी संबंधित राज्यांच्या यंत्रणांचा अगोदर उपयोग करून घ्यायला हवा; परंतु आता उठसूठ कोणत्...



कोणत्याही राज्यात काही गुन्हे घडले, तर त्याच्या तपासासाठी संबंधित राज्यांच्या यंत्रणांचा अगोदर उपयोग करून घ्यायला हवा; परंतु आता उठसूठ कोणत्याही घटनेचा तपास सीबीआय, एनआयएसारख्या यंत्रणांकडं सोपवून या यंत्रणांची विश्‍वासार्हता कमी करतो आहोत, याचं भान केंद्र सरकारला राहिलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयानं ज्या संस्थांचा संभावना पिंजर्‍यातला पोपट केला, त्यांनीही आपल्याला केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं होऊ दिलं.

केंद्र व राज्य सरकारांतील अधिकारांचं राज्यघटनेनं व्यवस्थित वाटप केलं; परंतु अलिकडच्या काळात केंद्र सरकार या ना त्या कारणानं राज्यांच्या अधिकारांत लुडबूड करायला सुरुवात केली आहे. पूर्वी राज्य व केंद्रात फार ताणून धरण्याचे प्रसंग फारच कमी आले. आता ते वारंवार यायला लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारं परस्परांशी शत्रूपक्षासारखी वागायला लागली आहेत. विकासकामांतही राजकारण आणलं जात आहे. अडथळे उभे केले जात आहेत. विरोधी पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांना सध्या सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्र सरकारच्या हातच्या तपास यंत्रणाचा उपयोग करून राज्यांना, तेथील नेत्यांना अडचणीत आणलं जात आहे. कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडं पोलिस, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक अशा वेगवेगळ्या यंत्रणा आहेत; परंतु त्या सर्वांवर अविश्‍वास दाखवून थेट केंद्र सरकारच्या यंत्रणाकडं तपास सोपविण्याचा आग्रह धरला जातो. राज्याच्या यंत्रणांकडून तपास काढून घेऊन तो वारंवार केंद्र सरकारी यंत्रणाकडं सोपवूनही त्यातून फार काही साध्य होतं, अशातला भाग नाही. पुणे जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आदी कितीतरी उदाहरणं लक्षात घेतली, तरी वारंवार केंद्रीय यंत्रणाकडं तपास सोपवणं योग्य नाही. सीबीआयसारख्या यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्यानंच अनेक राज्यांनी तिला प्रतिबंध घातला आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडं तपास सोपविले जात आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडं सोपवण्यात आला आहे. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या खुनाचा तपास मात्र महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाकडं आहे. घटना दोन असल्या, तरी त्या परस्परांशी निग़डीत असल्यानं त्यांचा तपास एकाच संस्थेकडं असू द्यायला हवा होता; परंतु दोन घटनांचा तपास वेगवेगळ्या दोन तपास यंत्रणा करीत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला. आता हे प्रकरण परस्पर राष्ट्रीय तपास संस्थेकडं सोपवण्यात आल्यानं केंद्र आणि राज्यात पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपासही एनआयएकडं देण्यात आल्यानंतर राज्यातील सत्ताधार्‍यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. यामागे काहीतरी काळंबेरं असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये ज्या जिलेटीन कांड्या सापडल्या, त्याचा तपास एटीएस करत होती. एटीएस चांगल्या पद्धतीनं तपास करत होती. आज एकाएकी केंद्र सरकारनं हा तपास एनआयएकडं दिला. सात महिन्यापूर्वी सुशांतसिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्र पोलिस चांगला तपास करत होते; पण सीबीआयनं त्याचा तपास हाती घेतला, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरण याचा तपास एनआयकडं द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती;पण राज्य सरकारनं ही मागणी फेटाळून लावली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिस करत असतानाच हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं. सीबीआयचे अधिकारी चौकशीसाठी मुंबईत आल्यानंतर कार्यक्षेत्र, तपास अधिकार यावरून वाद झाले. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांची चौकशी एनआयकडं सोपवण्यात आल्यानंतर देशमुख यांनी यावरून टोमणाही लगावला. सात महिने झाले अजूनही सीबीआयनं सुशांतनं आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली आहे, याचा निष्कर्ष सांगितलेला नाही. या वादानंतर राज्यातल्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दिलेली परवानगी राज्य सरकारनं मागं घेतली. यापुढं सीबीआयला तपासासाठी महाराष्ट्रात येताना राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं केलेल्या काही कारवायांनंतरही राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांमधले वाद समोर आले होते. यापूर्वीही अनेक राज्य सरकारं आणि केंद्रात संघर्ष झाला. मध्य प्रदेशात सरकार पाडलं, पुद्दुचेरीत काय झालं तेही आपण पाहिलं. या आधीही राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष झाला होता. कायदा  व सुव्यवस्था हा घटनेनुसार राज्याचा विषय आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. सीमा आणि बाहेरच्या देशांपासूनचं संरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे; पण आता सर्रास कोणताही तपास हातात घेतला जातो आणि त्याला राष्ट्रीय महत्त्व असल्याचा रंग दिला जातो. ही चुकीची प्रथा आहे. याला पोलिटिकल मोटिव्ह दिसतो. जिथं आपलं विरोधी सरकार आहे किंवा भाजपव्यक्तिरिक्त सरकार आहे, त्यांना हतबल, नाउमेद करण्यासाठी किंवा राज्य सरकारला डॉमिनेट करण्यासाठी केलेल्या या ट्रिक्स आहेत, असं वाटतं.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: केंद्र-राज्यात पुन्हा वादाची ठिणगी
केंद्र-राज्यात पुन्हा वादाची ठिणगी
https://1.bp.blogspot.com/-w0uwA4E3_04/YEd--GHc7gI/AAAAAAABo1E/abKsymBJgGwbIlCjVhuVls8IvwmDO-VJgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-w0uwA4E3_04/YEd--GHc7gI/AAAAAAABo1E/abKsymBJgGwbIlCjVhuVls8IvwmDO-VJgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_583.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_583.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content