मुंबई : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी मुंबईच्या जे...
मुंबई : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी मुंबईच्या जे जे रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीची पहिली मात्रा घेतली.
या संदर्भात ट्वीटरद्वारे नागरिकांना आवाहन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, " जे जे रुग्णालयात जाऊन मी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली . ही लस पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे. देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मार्चला कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हैदराबादच्या भारत बायोटेक द्वारा निर्मिती लस देण्यात आली. वॅक्सीन मैत्री या अभियानाद्वारे भारत अनेक देशांना भारत निर्मित कोरोना लस पुरवीत आहे. केंद्र सरकारने 16 जानेवारी पासून देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले. पुण्याच्या सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे.