$type=ticker$snippet=hide$cate=0

पिंपरी-चिंचवडच्या चाव्या भाजपच्या हाती ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव; भाजपतही नाराजीचा सूर

पुणे/प्रतिनिधीः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ’सांगली पॅटर्न’ फेल गेला आहे....

पुणे/प्रतिनिधीः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ’सांगली पॅटर्न’ फेल गेला आहे. भाजपचे उमेदवार नितीन लांडगे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण भालेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपच्या उमेदवाराला दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाच मते मिळाली. पक्षादेश काढूनही भाजपचा एक नगरसेवक गैरहजर राहिल्याने आता त्याच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. 


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात आज ही निवडणूक झाली. पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीतील संख्याबळानुसार, या निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित होता; मात्र तरीही भाजपतील अंतर्गत बंडाळीचा फायदा आम्हाला होईल आणि भाजपचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून नगरसेवक प्रवीण भालेकर यांना रिंगणात उतरविले. स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यात भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि एका अपक्षाचा समावेश आहे. भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे रवी लांडगे नाराज होते. त्यांनी त्यांच्या स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे दिला होता; मात्र भाजपने अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. आज निवडणुकीपूर्वी भाजपचे पक्षनेता नामदेव ढाके यांनी सर्व सदस्यांना पक्षादेश बजावला होता; मात्र रवी लांडगे निवडणुकीला गैरहजर राहिल. त्यामुळे पक्ष आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पशहावे लागणार आहे.


कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली

स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी महापालिकेच्या मुख्य इमरातीत तोबा गर्दी केली. या गर्दीत कोरोना विषयक सर्व नियम पायदळी तुडविले गेले. विशेष म्हणजे, याच गर्दीतून वाट काढत महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि इतर प्रशकीय अधिकारी सभागृहात आले; मात्र त्यांनी गर्दीकडे दुर्लक्ष केले. 

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पिंपरी-चिंचवडच्या चाव्या भाजपच्या हाती ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव; भाजपतही नाराजीचा सूर
पिंपरी-चिंचवडच्या चाव्या भाजपच्या हाती ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव; भाजपतही नाराजीचा सूर
https://i1.wp.com/mpcnews.in/wp-content/uploads/2018/10/pcmc.jpg?fit=750%2C430&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_604.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_604.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content