$type=ticker$snippet=hide$cate=0

भारतातील ’पॉवर प्ले’ चीनच्या पथ्थ्यावर

चीन हा देश कुठल्याही थराला जाऊ शकतो. चिनी हॅकर्स जगभर धुमाकूळ घालीत असतात. भारतातही औषध आणि ऊर्जा खात्याच्या संगणकप्रणाली हॅक करण्याचा प्रयत...

चीन हा देश कुठल्याही थराला जाऊ शकतो. चिनी हॅकर्स जगभर धुमाकूळ घालीत असतात. भारतातही औषध आणि ऊर्जा खात्याच्या संगणकप्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न त्यानं केला. त्याची आपल्याला गंधवार्ताही नव्हती. अमेरिकन तज्ज्ञांनी हे गुपित फोडल्यानं आपल्या यंत्रणाचं अपयश ढळढळीतपणे पुढं आलं. त्याचं चिंतन करण्याऐवजी आणि पुढं हॅकर्सपासून वाचण्यासाठी काय करायचं, यावर लक्ष्य केंद्रीत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकारला खोटं पाडण्याचा चंग जसा बांधला जात आहे, तसंच आपण मित्रराष्ट्राचं म्हणणंही खोट ठरवित आहोत, याचं भान केंद्र सरकारला राहिलेलं नाही.


    जगात जसं कुठंही हिंसक कृत्य, दहशतवादी हल्ला झाला, तर पाकिस्तानकडं बोट दाखविलं जातं, तसंच जगात कुठंही सायबर हल्ले झाले, तरी त्यात चीनचा हात असावा, असं मानलं जातं. चीननं आतापर्यंत जगात अनेक ठिकाणी सायबर हल्ले केले. एखाद्या देशाशी आमने सामने लढता येत नसेल, तर अशा हल्ल्यातूनही युद्ध करता येतं. गेल्या दोन दिवसांच्या बातम्या भारतात चिनी हॅकर्सच्या हल्ल्यानं चिंता वाढवणार्‍या होत्या. चीनची पार्श्‍वभूमी लक्षात घेता त्याची तज्ज्ञांकडून चौकशी करून नंतरच त्यावर भाष्य करायला हवं होतं. चिनी हॅकर्सकडून औषध आणि ऊर्जा खात्यात मॉलवेअर सोडून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झालं आहे. अमेरिकेच्या एका संस्थेनं त्याबाबत वाच्यता करेपर्यंत मात्र भारताला त्याची गंधवार्ता असू नये, याचंच आश्‍चर्य वाटतं. चीनच्या मुद्यावरून ही राजकारण व्हावं, यासारखं दुर्दैव नाही. राजकारणासाठी कितीतरी विषय पडले असताना राष्ट्रापुढच्या संकटाचंही राजकारण करण्यात राजकीय पक्ष धन्यता मानीत आहेत. सायबरतज्ज्ञांपेक्षाही राजकारण्यांनाच मॉलवेअरबाबत जास्त कळतं, असं वाटण्याचा संभव आहे. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा ’न्यूयार्क टाईम्स’ आणि अमेरिकेतील अन्य दैनिकात त्याबाबत काय छापून आलं, याची तसदी घेतली असती, तर बरं झालं असतं. चिनी हॅकर्स काहीही करू शकतात, हे गेल्या दोन दिवसांतील बातम्यांमुळं स्पष्ट झालं असताना चीनला ’क्लिन चीट’ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं चालविला आहे. दोन दिवस चीन काहीच प्रतिक्रिया देत नव्हता; परंतु भारताच्या ऊर्जामंत्र्यांनीच ’क्लिन चीट’ दिल्यानंतर त्यालाही कंठ फुटला. महाराष्ट्रात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात त्यावरून कलगीतुरा रंगला असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये आता ’पावर प्ले’ रंगला आहे. चीनच्या सायबर हल्ल्यामुळं मुंबईतील ’पावर कट’ झाल्याचा अंदाज महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केला आहे, तर चीनच्या सायबर हल्ल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. एवढंच नव्हे, तर केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह  यांनी मुंबईतील ’पावर कट’ची घटना ही ’मानवी चूक’ असल्याचं सांगितलं. चीनच्या सायबर हल्ल्याचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून ते देशातही होऊ शकतो, असा इशारा देशमुख यांनी दिला होता. ’न्यूयॉर्क टाइम्स’नं यासंदर्भात वृत्तही दिलं होतं. मुंबईचा वीजपुरवठा खंडीत करण्यामागं चीन हॅकर्स असल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. यानंतर गृहमंत्रालयानं ऊर्जा विभागाला यासंबंधी केलेल्या तपासाचा अहवाल दिला. या वेळी देशमुख यांनीही चिनी हॅकर्सनं सायबर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला; पण आता केंद्र सरकारनं अशा कुठल्याही सायबर हल्ल्याचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. चोरी करताना, सायबर हल्ला करताना चोर जणू पुरावा मागं सोडून जात असतो, असं केंद्र सरकारला वाटत असावं. मुंबईतील ’पावर कट’ संबंधी तपास करण्यात आला. ही एक मानवी चूक आहे. हा सायबर हल्ला नाही. पहिल्या पथकानं तपासानंतर दिलेल्या अहवालात तसं म्हटलं आहे. सायबर हल्ला झाला होता; पण त्याचा मुंबईतील वीजपुरवठ्याशी काहीही संबंध नाही, असं दुसर्‍या पथकानं तपासानंतर दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे.

 एकाच घटनेच्या तपासानंतर दोन तपास पथकंवेगवेगळे अहवाल देत असतील, तर संभ्रम आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं चीनसारख्या देशांचं फावतं. आपल्या तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेविषयी शंका घ्यायला जागा उरते. देशातल्या उत्तर आणि दक्षिण भागातील वितरण केंद्रांवर हल्ले झाले होते; पण मॉलवेअर आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पोहोचू शकले नाही, असं सिंह यांनी सांगितलं. याचा अर्थ चीननं प्रयत्न केला होता, असाही निघू शकतो. या सायबर हल्ल्यामागं जो हॅकर्स ग्रुप आहे, तो चीनचा आहे, असं काही जण सांगत आहेत; पण आपल्याकडं यासंबंधी कोणतेही पुरावे नाहीत. यामुळं चीन त्याचा इन्कारच करेल, असं सिंह यांच्या सांगण्याची चीन जणू वाटच पाहत होता. त्यानं अपेक्षेप्रमाणं पुराव्याशिवाय बोलू नका, असं सांगितलं. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दहा-बारा तास वीजपुरवठा ठप्प होता. यापूर्वी एवढा प्रदीर्घकाळ मुंबईत कधीही ब्लॅकआऊट झाला नव्हता. चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला करून हा वीजपुरवठा खंडीत केला होता, असं वृत्त ’न्यूयॉर्क टाइम्स’नं दिलं. गलवानमधील भारत-चीन सैनिकांमधील रक्तरंजित संघर्षानंतर हा हल्ला केला गेला, असं वृत्तात म्हटलं आहे. चिनी हॅकर्स ग्रुप एपीटी 10 नं हा सायबर हल्ला केल्याचं म्हटलं गेलं. या प्रकरणी महाराष्ट्राच्या सायबर विभागानं केलेल्या तपासाचा अहवाल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला. दोन्ही मंत्र्यांनी चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला. ’न्यूयार्क टाईम्स’च्या वृत्तानंतरही महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी फक्त संशय व्यक्त केला होता. त्याबाबत मुंबईच्या सायबरतज्ज्ञांचं मत विचारात घेण्यात आलं होतं; परंतु केंद्र सरकार महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातून आपण शत्रूराष्ट्राला ’क्लिन चीट’ देत आहोत, याचं भान केंद्र सरकारला राहिलेलं नाही. त्याऐवजी मौन पाळलं असतं, तर बिघडलं नसतं; परंतु वादग्रस्त विधानं करायची सिंह यांची परंपरा लक्षात घेतली, तर त्यांच्या विधानांनी आश्‍चर्य वाटायचं काहीच कारण नाही. चीन कुठल्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांचा निषेध करतो, असा साळसूदपणाचा आव चीननं आणला. अशा प्रकरणांमध्ये संशय घेण्यास काहीही अर्थ नाही. कुठल्याही पुराव्यांशिवाय आरोप करणं हा हलगर्जीपणा असल्याचं चीननं म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरनं केलेल्या तपासाचा अहवाल सादर झाला असून, दुसरीकडं ’रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनॅलिसिस’ या अमेरिकन कंपनीनंही 28 फेब्रुवारीला एक अहवाल जारी केला. यात त्यांनी म्हटलं आहे, की मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीननं मालवेअर (व्हायरस) टाकल्याची शक्यता आहे. चीनच्या कुरापतीमुळं मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्यानं भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील, तर केंद्र सरकारनं या संदर्भात नेमलेल्या सुरक्षा एजन्सीकडून देण्यात आलेल्या इशार्‍यावर चोख काम करण्याची गरज आहे. आपल्या वीज प्रकल्पातील चीनचं सॉफ्टवेअर काढून दुसर्‍या देशाचं उत्तम सॉफ्टवेअर वापरायला हवं, असं मत सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं; परंतु केंद्र सरकारनंच नेमलेल्या सुरक्षा एजन्सीच्या सल्ल्याचा विसर पडला आहे. केंद्र सरकारची नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर सेंटर या नावाची एजन्सी आहे. ती माहिती, तंत्रज्ञान कायदा 2000 आयटी अ‍ॅक्टअंतर्गत बनवली. त्यांचं काम हे ऊर्जा, बँका, रेल्वे यांसारख्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणं हे आहे. ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ नावाची केंद्र सरकारची आणखी एक संस्था आहे. या संस्थेनं महाराष्ट्र ग्रीडला चिनी मालवेअरबाबत इशारा दिला होता, हे सिंह यांनी एकदा वाचायला हवं होतं. दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ला चीननं केल्याचं समोर आल्यानं केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागायला हवी. यावर उपाय म्हणजे सॉफ्टवेअर बदलणं किंवा आपल्या सरकारी यंत्रणांनी चोख काम करणं गरजेचं आहे. एका संस्थेकडं हल्ला होणार अशी माहिती होती किंवा त्यांनी तसा इशारा दिला होता, तर दुसर्‍या संस्थेकडं हल्ला थोपविण्यासाठी जी उपाययोजना लागते, ती होती की नव्हती? असाही प्रश्‍न उपस्थित होतो. या निष्काळजीमुळे मुंबईच नाही तर देशभरातील शहरांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भारतातील ’पॉवर प्ले’ चीनच्या पथ्थ्यावर
भारतातील ’पॉवर प्ले’ चीनच्या पथ्थ्यावर
https://1.bp.blogspot.com/-26WgQh4zXxQ/YD9VjpiqBfI/AAAAAAABot0/VNvvFN-N-VAqstRE8QmdW62ybDNXi1tdQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-26WgQh4zXxQ/YD9VjpiqBfI/AAAAAAABot0/VNvvFN-N-VAqstRE8QmdW62ybDNXi1tdQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_61.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_61.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content