$type=ticker$snippet=hide$cate=0

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या ; ठाण्याच्या न्यायालयाचा एटीएसला आदेश; सरकार अडचणीत

  मुंबई/प्रतिनिधीः मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू झाला होता. या प्रकरणाचा तपास ह...

 

मुंबई/प्रतिनिधीः मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू झाला होता. या प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले असूनही एटीएसने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. एवढेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतरदेखील एटीएसने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मंगळवारी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली होती. अखेर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊनदेखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करीत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला हे आदेश दिले आहेत. एटीएसने आत्तापर्यंत केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे आणि त्यासोबतच अटक करण्यात आलेले दोन आरोपी, निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर या दोघांना देखील एनआयएच्या ताब्यात देण्यात यावे, असेदेखील न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरणदेखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे.  मंगळवारी एटीएसने पत्रकार परिषद घेऊन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचे स्पष्ट केले होते. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असेदेखील एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून वाझे यांच्यावर यूपीए कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. एनआयए वाझेंविरोधात यूएपीएची कलम लावण्याची तयारी सुरू केली आहे. एनआयएच्या हाती नुकतेच वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. यूएपीए कायदा लागल्यास यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा कायदा सहसा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणार्‍यांवर लावला जातो.



Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11717,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,809,देश,4761,नगर,4,नाशिक,850,पुणे,1049,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18672,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,145,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16239,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4538,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1771,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या ; ठाण्याच्या न्यायालयाचा एटीएसला आदेश; सरकार अडचणीत
हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या ; ठाण्याच्या न्यायालयाचा एटीएसला आदेश; सरकार अडचणीत
https://www.policekaka.com/uploads/news_images/748401680_20210317143753.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_631.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_631.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content