$type=ticker$snippet=hide$cate=0

कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा : रमेश देशमुख

पंचायत समिती मासिक सभा : लसीकरणाची उदिष्ट पुर्तीकडे वाटचाल कराड / प्रतिनिधी : ऑनलाईन शिक्षण प्रणाली चांगली असल्याचे शिक्षण विभागानेही सांगि...


पंचायत समिती मासिक सभा : लसीकरणाची उदिष्ट पुर्तीकडे वाटचाल

कराड / प्रतिनिधी : ऑनलाईन शिक्षण प्रणाली चांगली असल्याचे शिक्षण विभागानेही सांगितले होते. मात्र, अजूनही परीक्षा झाल्या नसल्याबाबत विचारणा केली असता, ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी मुजावर यांनी दिली. यावर ऑनलाईन असो वा ऑफलाईन, तात्काळ परीक्षा सुरु करा. कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून कोरोना येईल-जाईल, आधी मुलांना शिकवा, अशाप्रकारे शिक्षण विभागाची कानउघाडणीच उपसभापती रमेश देशमुख यांनी केली.

येथील पंचायत समितीच्या सभाग्रहात बुधवार, दि. 3 रोजी मासिक सभा झाली. सभापती प्रणव ताटे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेदरम्यान, शिक्षण विभागाचा आढावा गट शिक्षण अधिकारी मुजावर यांनी सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रखडलेल्या परीक्षांबाबत विचारणा करताना उपसभापती रमेश देशमुख यांनी शिक्षण विभागाची कानउघाडणी केली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत असल्याने शाळा काही काळ चालू-बंद ठेवाव्या लागत आहेत. परंतू, शाळा बंद असल्याच्या कालावधीत मुलांना शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण दिले. ही प्रक्रिया चांगली असल्याचेही मध्यंतरी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. असे असताना अजूनही परीक्षा का घेण्यात आल्या नाहीत? याबाबतची विचारणा उपसभापती देशमुख यांनी शिक्षण विभागाकडे केली. यावर ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती मुजावर यांनी दिली. त्यांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करत उपसभापती देशमुख म्हणाले, कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना काहीच येत नसल्याची परिस्थिती सांगत परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन घ्या, परंतु, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, असेही उपसभापती देशमुख यांनी यावेळी शिक्षण विभागाला सुनावले आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी मुजावर म्हणाल्या, जिल्ह्यात सध्या 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. त्यामध्ये ऊसतोड, बांधकाम व्यावसायिकांसह अन्य शाळाबाह्य मुलांचाही समावेषा होत असून त्यांचा सर्व्हे सुरु आहे. त्यासाठी नियुक्त 29 शिक्षक हजर झाले आहेत. तसेच जि. प. शाळेतील 6 शाळांची मॉडर्न स्कूल म्हणून निवड करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या 5 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु असून शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील दररोज 5 शाळांना नियुक्त पथकांमार्फत भेटी दिल्या जात आहेत. तसेच शाळांच्या शिष्यवृत्ती परीक्षांसह अन्य परीक्षाही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून त्याबाबतची तयारी सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायत आढाव्यावेळी अधिकार्‍यांनी तालुक्यात सरासरी 65.88 टक्के करवसुली झाल्याचे सांगितले. करवसुलीच्या मुद्यावरून उपसभापतींसह सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कालवडे ग्रामपंचायतीच्या करवसुलीवर बोट ठेवत चालू वर्षी 1 रुपयाचीही वसुली झाली नसल्याचे गटातील सदस्यांनी नमूद केले. हा मुद्दा घेऊन संपूर्ण करवसुली प्रक्रियेवर सभाग्रहात नाराजी व्यक्त करण्यात आली.

डॉ. लोखंडे यांनी तालुका आरोग्य विभागाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू असून लसीकरणाची उदिष्ट पुर्तीकडे वाटचाल सुरु आहे. यासाठी वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव केंद्र असून त्याठिकाणी 60 वर्षावरील लोकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी प्रत्येकांनी सेल्फ रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून रजिस्ट्रेशन झालेल्यांनाच याठिकाणी लस देण्यात येईल. या केंद्रावर रजिस्ट्रेशननुसार लसीकरण होत असल्याने गर्दी होत आहे. त्यासाठी शासनाने येथील कृष्णा, सह्याद्री, एरम व कोळेकर हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरु केले असून तात्काळ लस घेण्यारयांना त्याठिकाणी 250 रुपये देऊन लस घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नामदेव पाटील यांनी वारुंजी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी केली. त्यासाठी जागा उपलब्ध झाली असून त्यानुसार शासनास प्रस्ताव पाठवण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा : रमेश देशमुख
कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा : रमेश देशमुख
https://1.bp.blogspot.com/-vMTJGiOn9hA/YEDj0Z-2t3I/AAAAAAABowc/RuFK2ZTMaxYJaSnEKoIvQjkybxK0X7eaACLcBGAsYHQ/s320/Karad%2BPanchayt%2Bsamiti.jpg
https://1.bp.blogspot.com/-vMTJGiOn9hA/YEDj0Z-2t3I/AAAAAAABowc/RuFK2ZTMaxYJaSnEKoIvQjkybxK0X7eaACLcBGAsYHQ/s72-c/Karad%2BPanchayt%2Bsamiti.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_64.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_64.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content