$type=ticker$snippet=hide$cate=0

अंबानी यांच्या घरापुढील स्फोटकं आणि त्यानंतरचं राजकारण

देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटिन भरलेली कार आणि त्यामागं कुणाचा हात आहे, हे कशासाठी केलं, याच...


देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटिन भरलेली कार आणि त्यामागं कुणाचा हात आहे, हे कशासाठी केलं, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना वेळ द्यायला हवा; परंतु त्यात अचानक ज्यांची गाडी होती, त्या मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानं या घटनेतलं गूढ वाढलं आहे. मुंबई पोलिस हे गूढ उकलण्यास सक्षम आहेत; परंतु आता विधिमंडळाच्या अधिवेशनात यावरून झालेली चर्चा पाहिली, तर हे गुंतागुतीचं प्रकरण सुटावं, यापेक्षा त्यातलं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनाही महत्त्वाचं वाटतं.

गेल्या आठवडयात रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी आढळली. काश्मीरस्थिती जैश-ए-उल-हिंद नावाच्या कथित संघटनेनं अगोदर या स्फोटकानं भरलेल्या गाडीची जबाबदारी स्वीकारली. गाडीत मिळालेलं पत्र पाहता त्यात आणखी गंभीर घटनांचा इशारा दिला होता. बिटकॉन या आभासी चलनाची मागणी करण्यात आल्यानं ही संघटना त्यामागं नसावी, हे प्रथमदर्शनी दिसतं. सुरुंग उडवण्यासाठी ज्या जिलेटिनच्या कांड्या वापरल्या जातात आणि त्या नागपूरच्या कंपनीकडून घेण्यात आल्या होत्या, हे पोलिसांनी उघडकीस आणलं; परंतु त्या कुणी आणि कशासाठी खरेदी केल्या होत्या, हे तपासातून पुढं येण्याची आवश्यकता असताना आता या प्रकरणानं वेगवेगळी वळणं घेतली आहेत. आता त्यावरून राजकारण सुरू झाल्यानं या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. ज्या कथित दहशतवादी संघटनेनं या स्फोटकांची जबाबदारी स्वीकारली, बिटकॉनसारख्या आभासी चलनाची मागणी केली, ते पत्रच नंतर संबंधित संघटनेनं नाकारलं. एकीकडं ही घटना समोर आली असताना दुसरीकडं ज्यांच्या गाडीत ही स्फोटकं सापडली, त्या स्कार्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनसेनं ही तसेच आरोप केले आहेत. वाझे यांनी आरोप फेटाळले असले, तरी एकूणच या प्रकरणातील गांभीर्य वाढत चाललं असताना त्यातील राजकारणही वाढलं आहे. फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा करताना अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली गाडी मनसुख हिरेन यांची होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली, तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथं ते एका व्यक्तीला भेटले, ती व्यक्ती कोण? हे या प्रकरणाचं मूळ आहे. ही गाडी जिथं सापडली, तिथं स्थानिक पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली, असे सवाल फडणवीस यांनी विचारले. वाझे यांच्याभोवती संशयाचा भोवरा निर्माण करताना मुंबई पोलिसांच्या हातून हे प्रकरण काढून घेण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात गुंतागुंत असल्याचं सांगून आणि अशा गुंतागुंतीचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं सोपविण्याची मागणी त्यांनी केली हे करताना मुंबई पोलिसांवर अविश्‍वास दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही, तर जी गाडी चोरी होऊन ज्या मार्गानं आली आणि तिथं पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना तपास अधिकारी नेमले, असं सांगताना त्यांनी योगायोगाच्या गोष्टी नक्कीच नाहीत, असं सांगण्यावर फडणवीस यांचा भर होता. सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचले. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्‍चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये 2020 मध्ये वाझे यांचं हिरेन यांच्यांशी संभाषण झालं होतं, असं फडणवीस यांनी सांगितलं; परंतु वाझे यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ते नव्हे, तर स्थानिक अधिकारी अगोदर पोहचले होते आणि हिरेन यांच्यांशी त्यांचं कधीही संभाषण झालं नाही. अंबानी यांच्या घरासमोर ज्यांच्या गाडीत स्फोटकं आढळली, त्या मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी फडणवीस एकीकडं विधानसभेत करीत असताना नेमकं त्याच वेळी त्यांचा मृतदेह मुंब्र्याजवळच्या रेतीबंदरात सापडला. त्यामुळं हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट वाझे यांच्यावर आता मनसेनं टीका केली आहे. शिवसेनेत 2008 मध्ये प्रवेश केलेल्या आणि पुन्हा नोकरीत घेतल्यानंतर वाझे यांच्याकडं सर्वंच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत, असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळं आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आले आहेत. सगळ्या महत्वाच्या केसेस या वाझे यांच्याकडं का सोपवल्या जातात? शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात, असे सवाल देशपांडे यांनी केले आहेत. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट वाझे यांच्यावर आरोप केल्यानंतर तुम्ही कुणाला वाचवत आहात, असा सवाल फडणवीस यांनी करताच अर्णव गोस्वामींना आत टाकले, म्हणून तुमचा वाझे यांच्यावर राग आहे का, असा पलटवार देशमुख यांनी केला. हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर फडणवीस यांनी या प्रकरणावर काही प्रश्‍न उपस्थित केले. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहेत. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. तसंच क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वांत आधी वाझे पोहोचले कसे? वाझे यांच्याकडंच या प्रकरणाचा तपास कसा? असे सवाल फडणवीस यांनी केले. त्यावर सापडलेली गाडी हिरेन यांच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मित्राची गाडी होती. हिरेन यांचे हात बांधलेले नव्हते. ठाण्यात शवविच्छेदन अहवालातून सर्व माहिती पुढं येईल तसंच या प्रकरणाचा तपास वाझे करीत नसून नितीन अलकनुरे करत आहेत, असे सांगत देशमुख यांनी फडणवीसांचे सर्व मुद्दे खोडून टाकले. त्यानंतर पुन्हा फडणवीस यांनी उभं राहून गृहमंत्र्यांच्या निवेदनाला आक्षेप घेतला आणि त्यांनी थेट हिरेन यांनी पोलिसांना दिलेला कबुली जवाब वाचून दाखवला. हिरेन यांनी ही गाडी विकत घेतली असल्याचं कबुली जबाबात म्हटलं आहे. पोलिस तुम्हाला माहिती देत नाही का? पोलिस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करत आहेत का, असा सवाल फडणवीस यांनी केला. तसंच अलकनुरे यांच्याकडं तीन दिवसांपूर्वी तपास दिला आहे. सात दिवस तर वाझेच तपास करत होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या आरोपावर देशमुख यांचा पारा अधिकच चढला. सचिन वाझे, सचिन वाझे काय घेऊन बसला आहात. अर्णव गोस्वामींना आत टाकलं होतं, म्हणून तुमचा सचिन वाझे यांच्यावर राग आहे का? वाझे यांनी अन्वय नाईक प्रकरणात गोस्वामी यांना अटक केली आणि आत टाकलं, म्हणून तुम्ही राग काढत आहात का? तुमच्याकडं काहीही माहिती असेल, तर आम्हाला द्या. पोलिसांना द्या. तपासाला मदतच होईल, असं देशमुख यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलिस सक्षम आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडं तपास देण्याची गरजच नाही, असंही देशमुख यांनी सांगितलं.

गृहमंत्र्यांच्या उत्तरावर फडणवीस यांचाही पार चढला. कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्यानं काय केलं किती एन्काऊंटर केलं, त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत या प्रकरणाचे माझ्याकडं पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळं तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. त्यावर सुशांत सिंह प्रकरणाच्यावेळीही तुम्ही असाच आवाज उठवला. त्यानंतर सीबीआयला प्रकरण दिलं. आज सहा महिने झाले. त्यात काहीच झालं नाही. तुमच्याकडून ब्र शब्दही निघाला नाही. त्यावर बोला ना, असा टोला देशमुख यांनी फडणवीसांना लगावला. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. वाझे हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पोलिस दलात परतले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घरात घुसून उचलणारे अधिकारी सचिन वाझे हेच होते. वाझे हे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते; मात्र दोन दिवसापूर्वीच त्यांच्याऐवजी हा तपास सहायक पोलिस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडं सोपवण्यात आला.

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलं आहे. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आलं होतं. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला; मात्र तपास सुरू असल्यानं तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचं पुस्तक मराठीत लिहिलं होतं. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अंबानी यांच्या घरापुढील स्फोटकं आणि त्यानंतरचं राजकारण
अंबानी यांच्या घरापुढील स्फोटकं आणि त्यानंतरचं राजकारण
https://1.bp.blogspot.com/-6IFcNy28r8I/YENnOqT6XXI/AAAAAAABoyI/0iIOOWNYD2gsCruLyG2Cox_-H9-J_QKQgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-6IFcNy28r8I/YENnOqT6XXI/AAAAAAABoyI/0iIOOWNYD2gsCruLyG2Cox_-H9-J_QKQgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_646.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_646.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content