अहमदनगर/प्रतिनिधी- अहमदनगर पाटबंधारे विभागाच्यावतीने 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पा...
अहमदनगर/प्रतिनिधी- अहमदनगर पाटबंधारे विभागाच्यावतीने 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाणी बचत, योग्य वापर व नियोजनाची माहिती देऊन जागृती केली जाणार आहे. यानिमित्ताने बोलताना कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी थेंब, थेंब पाणी बचतीमधून जलक्रांती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने सुरु असलेल्या जलजागृती सप्ताहतंर्गत अहमदनगर पाटबंधारे विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ कार्यकारी अभियंता नान्नोर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सुनील जगताप, उपअभियंता विकास शिंदे, शाखा अभियंता जे.जी. देशमुख, अभियंता कोल्हे, स्थापत्य अभियंता राणा, पुनम बनकर, जालिंदर बोरुडे, उमेश डावखर, जालिंदर तोडमल, वैशाली बोडखे, सोमनाथ पोटे, शिल्पा ताजणे, राजेश जाधव, जालिंदर गोरे, गणेश कवडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. थेंब, थेंब पाणी बचतीमधून जलक्रांती होणार आहे. पाणे हेच जीवन आहे. भरपूर पाणी असले तरी त्याचा दुरुपयोग होता कामा नये. पुढच्या पिढ्यांचा विचार करुन पाणी बचत व योग्य नियोजन ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, पाणी बचत स्वत:पासून सुरु झाली पाहिजे. सरकारपेक्षा सर्वसामान्यांनी जल बचतसाठी पुढाकार घेतल्यास ही चळवळ यशस्वी होणार आहे. जल प्रदूषण थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. शाश्वत विकास जल बचतीवर अवलंबून असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक उप कार्यकारी अभियंता सुनील जगताप यांनी केले. अहमदनगर पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत असून, या अभियानाच्या माध्यमातून पाणी बचत, योग्य वापर व नियोजनाची माहिती देऊन जागृती केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी उपस्थितांना जल बचतची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश डावखर यांनी केले. आभार जालिंदर बोरुडे यांनी मानले.