$type=ticker$snippet=hide$cate=0

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडण्यात यश : धनंजय मुंडे

  बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मुत्सद्दी खेळीस जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडी प्रण...

 



बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मुत्सद्दी खेळीस जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला ६ पैकी ५ जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले राजकिशोर (पापा) मोदी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान केवळ ८ जागांवर निवडणूक होत असताना देखील जिल्हा बँकेशी संलग्न मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालून, आपल्याच मतदारांवर अविश्वास दाखवत त्यांना राखण बसणाऱ्या भाजपची मक्तेदारी या निकालाने मोडीत निघाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांनी सर्वच नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय येणाऱ्या काळात घेतले जातील, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे.


१९ पैकी ८ जागांवरच निवडणूक झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीने ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे यांच्या रूपाने धनंजय मुंडे यांचा प्रतिनिधी प्रथमच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेला आहे.

भाजप नेत्यांनी ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता. परंतु माजी पालकमंत्री यांच्या आदेशाला झुगारत जवळपास ६०% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानापैकी ९५% पेक्षा अधिक मतदान हे महाविकास आघाडीला मिळाल्याचे एकूण चित्र आहे. महाविकास आघाडीचे भाऊसाहेब नाटकर (४२ मते), अमोल आंधळे (२२३ मते), रवींद्र दळवी (७२० मते), कल्याण आखाडे (७१६ मते), सूर्यभान मुंडे (७१० मते) मिळवून विजयी झाले तर गंगाधर आगे यांना ३६ मते मिळाली, याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले आहेत. अवघ्या काही तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या धनंजय मुंडे यांचा सूर्यभान मुंडे या जिवलग सहकाऱ्याच्या रूपाने जिल्हा बँकेतील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या पाठोपाठ जिल्हा बँकेतील भाजपचे वर्चस्व मोडीत काढून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे. सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचे निकाल कळत नसतील तर ते त्यांचे अज्ञान - अमरसिंह पंडितांचा विरोधकांना टोला महाविकास आघाडीतील प्रत्येक शिलेदाराने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिकिरीने लढली. प्रत्त्येक मतदारापर्यंत पोहचून आम्ही सर्वांनी काम केले. परंतु ऐनवेळी बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मात्र या निकालाने नामुष्की आली आहे. 'सहकार क्षेत्रातील यांना काही कळत नाही' असं म्हणणाऱ्या विरोधकांना मुंडे यांनी मुत्सद्दी खेळी करत चारी मुंड्या चित केले. सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या माजी मंत्र्यांनी निबंधक, हायकोर्ट ते अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत खेटे घातले मात्र इथे जो निकाल दिला होता तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, तरीही विरोधक सत्तेच्या वापराचा राग आळवत असतील तर हे त्यांचे अज्ञान आहे, असा मिश्किल टोला माजी आ. अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे. माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, प्रा. सुशीलाताई मोराळे, वाल्मिक अण्णा कराड, रामकृष्ण बांगर, भाऊसाहेब कराड, सतीश बडे यांसह आघाडीचे सर्वच नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. दरम्यान आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा शिरसाठ, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे, रामकृष्ण बांगर यांसह महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडण्यात यश : धनंजय मुंडे
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडण्यात यश : धनंजय मुंडे
https://cdn.dnaindia.com/sites/default/files/styles/full/public/2019/08/04/855561-dhananjay-munde-dna.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_670.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_670.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content