$type=ticker$snippet=hide$cate=0

नवनिर्मितीची नसे गाथा तरी टेकावा माथा

कोणताही अर्थमंत्री काही काव्यपंक्ती, काही संतवचने सादर करून आपला अर्थसंकल्प खुलवण्याचा प्रयत्न करीत असतात. उत्पन्नाची साधने मर्यादित असतील, ...



कोणताही अर्थमंत्री काही काव्यपंक्ती, काही संतवचने सादर करून आपला अर्थसंकल्प खुलवण्याचा प्रयत्न करीत असतात. उत्पन्नाची साधने मर्यादित असतील, तर अर्थमंत्र्यांचे हात बांधलेले असतात. खिसाच फाटका असेल, तर स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. अशा वेळी जुन्या जाणत्या नेत्यांचा सल्ला आठवतो, तो म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचे; परंतु त्याचवेळी मोठे अंथरुण घेण्याची ऐपत तयार करायची. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबतीत नेमके तेच झाले आहे. कोरोनामुळे राज्याच्या महसुलात एक लाख 59 हजार कोटी रुपयांची झालेली घट, केंद्र सरकारकडून जीएसटी व अन्य विभागांची सुमारे एक लाख रुपयांचे येणे, दरवर्षी पगार आणि निवृत्तीवेतनावर खर्च होणारे एक लाख 35 हजार रुपये, व्याजावरच खर्च करावे लागणारे 35 हजार कोटी रुपये आणि राज्याच्या तिजोरीवर असलेला पाच लाख वीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा अशी स्थिती असताना मोठमोठ्या घोषणांची अपेक्षा करणेही सर्वथा अयोग्य होते. 

मनात कितीही कल्पना असल्या, तरी खिशाचा सल्ला घेतल्याशिवाय त्या चांगल्या राबविता येत नाहीत. फार मोठ्या घोषणा करता येत नसल्या, तरी राज्याला ज्या परिस्थितीतून जावे लागले, तशी परिस्थिती पुन्हा आली, तर एकदमच गांगरून जायला नको, म्हणून अगोदरच तरतूद करून ठेवलेली बरी, असा विचार करून नैसर्गिक आपत्तीच्या काळासाछी पवार यांनी अर्थसंकल्पातच तरतूद करून ठेवली. केंद्र सरकारने आरोग्याला जसे महत्व दिले, तसेच महत्व राज्यानेही दिले. प्रतिकूल परिस्थिती असली, तर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढायचा असतो. अर्थमंत्र्यांना तर लोकांच्या खिशात सहजपणे हात घालून औदार्यांच्या भावनेतून ते नाही रे घटकांना वाटता आले पाहिजे; परंतु विक्रीकर, मूल्यवर्धित कर  अशी दोन-तीनच उत्पन्नाची साधने हाती असतील, तर असा हात घालणेही अवघड बनते. मद्यावर कितीही करवाढ केली, तरी तो वर्ग कधी नाराज होत नाही  आणि कुठेही जात नाही. त्यामुळे त्यांच्याच खिशात हात घालण्याचा मार्ग पवार यांनी अनुसरलेला दिसतो. हा महाराष्ट्र आहे, हा कधी संकटापुढे झुकला नाही. संकटामुळे मागे हटला नाही. अर्थकारण हा सरकारपुढे मोठा प्रश्‍न आणि आव्हान आहे. हे आव्हान पेलताना सरकार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत डोळ्यात ठेवून काम करत आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.  कोणताही अर्थसंकल्प सर्वांचे समाधान करणारा कधीच नसतो. विरोधक त्यावर टीका करणार आणि सत्ताधारी त्याची खुशामत करणार हे ओघाने आलेच. कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करणे स्वाभावीक आहे. नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. राज्यात कर्करुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता दीडशे ग्रामीण रुग्णालयात कर्करोग उपचार सुरू करण्याची आणि त्यासाठी संबंधित रुग्णालयांना यंत्रणा आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची योजना चांगली आहे. कर्करोगासाठी यापुढे उठसूठ मुंबईला धाव घ्यायची गरज भासणार नाही. इंधनाच्या दरवाढीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार प्रत्येकी एक रुपयाने कमी करण्याची चर्चा होती; परंतु त्यामुळे राज्याच्या तिजोरीत सव्वा दहा हजार कोटी रुपयांचा पडणारा खड्डा कुठून भरून काढणार, या प्रश्‍नाचे उत्तर कदाचित पवार यांना सापडले नसावे. तसेही ते लोकानुयाच्या विरोधात असतात आणि परिणामांची पर्वा न करता शिस्तीचा विचार पुढे नेणारे आहेत. राज्यात संसर्गजन्य आजारांसाठी अद्ययावत रुग्णालयांची गरज आहे. राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा पुरवणार आहे. महापालिका परिसरात पाच वर्षात पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून या वर्षी आठशे कोटी रुपये देणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे लोकांना खासगी आरोग्यसेवेच्या हवाली न करता त्यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर त्यांनी भर दिलेला दिसतो. महिलांना केंद्रस्थानी ठेवत यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, मदत आणि इतर अनिवार्य खर्चासाठी 11 हजार 315 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. केवळ जेंडर बजेटची घोषणा करून उपयोग नसतो. त्याासाठी पावले उचलावी लागतात. मुलींना पूर्वीही शिक्षणासाठी बसप्रवास मोफत होता. त्याची पुन्हा घोषणा करण्याचे कारण काय, हे कळले नाही. शुभशकूनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, झिजतानाही दरवळणारं देवघरातील चंदन तू, स्त्री नसते वस्तू, ती नसते केवळ जननी, ती असते नवनिर्मितीची गाथा, जिथे आपण सर्वांनीची टेकावा माथा असं पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठीच्या खास तरतूदी जाहीर केल्या. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची यांनी घोषणा केली. त्यामुळे यापुढे राज्यात कोणतेही कुटुंब घर विकत घेईल, त्या घराची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाणार आहे. राज्याच्या तिजोरीवर दहा हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असला, तरी सामाजिक सुधारणेसाठी तेवढी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. 


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नवनिर्मितीची नसे गाथा तरी टेकावा माथा
नवनिर्मितीची नसे गाथा तरी टेकावा माथा
https://1.bp.blogspot.com/-0qNuTuurP8c/YEYiWNWz5HI/AAAAAAABo0c/z0nfwnanr2cjF0TcS1JHFRFortSfNNefwCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-0qNuTuurP8c/YEYiWNWz5HI/AAAAAAABo0c/z0nfwnanr2cjF0TcS1JHFRFortSfNNefwCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_681.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_681.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content