$type=ticker$snippet=hide$cate=0

कोविड महामारीने शाश्वत विकासाच्या उद्दीष्टच्या अंमलबजावणीचे महत्व जगासमोर आणले : डॉ. नीलम गोऱ्हे

  मुंबई : जागतिक महिला आयोगाच्या ६५ व्या वर्षानिमित्त स्त्री आधार केंद्र ने समांतर चर्चा सत्र आयोजित केले होते. या मध्ये कोविड महामारी या जा...

 



मुंबई : जागतिक महिला आयोगाच्या ६५ व्या वर्षानिमित्त स्त्री आधार केंद्र ने समांतर चर्चा सत्र आयोजित केले होते. या मध्ये कोविड महामारी या जागतिक संकटाचे शाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती साठी व स्त्री पुरुषसमानता निर्माण करण्यासाठी संधीत रूपांतर कसे करता येईल याबाबत ऑन लाईन चर्चा सत्र रविवारी आयोजित केले होते. या चर्चा सत्रात महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, नेपाळ मधून चांदनी जोशी, अपर्णा वाईकर ,शांघाय चीन, अजय झा, अपर्णा पाठक पुणे,जेहलम जोशी ,भारत व सुत्रसंचालक म्हणुन सतलज दिघे, मिनेसोटा अमेरिका ह्यांन चर्चासत्रात भाग घेतला होता. 


डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चा सत्राची सुरुवात करताना उपसभापती विधान परिषद म्हणून काम करताना आलेले विविध प्रकारचे अनुभव सांगितले. यामध्ये विविध देशात अडकून पडलेले विद्यार्थी,पर्यटक याना भारतात आणताना केलेल्या विविध स्तरावरील प्रयत्नाबाबत सविस्तर विवेचन केले. भारतातील विविध ठिकाणी अडकून पडलेले व्यक्ती यांना आपापल्या गावी चालत अथवा वाहनाने किंवा रेल्वे ने परत सोडत असताना शासनाने केलेली विविध प्रकारची मदत व सामाजिक संस्थांचे योगदान यामुळे हा अचानक निर्माण झालेल्या आपत्ती मध्ये सर्व यंत्रणांचा कस लागला. या कालावधीत अनेक प्रश्न सर्वाना सहन करावे लागले विशेषतः महिला वर्गाचे काम व त्रास तिप्पटपेक्षा ज्यास्त झाला. महिलांना घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. मानसिक दडपण व भिती निर्माण झाली. घरकामगारांपैकी जवळपास ८५% लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी हे ४०/५० दिवस घरी जाऊ शकले नाहीत. उपसभापती कार्यालयाने स्थानिक स्थरावर रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, रुग्णांची चाचणी करणे व त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविणे,औषधे उपलब्ध करून देणे,रुग्णाचे नातेवाईकांना धीर देणे याप्रकारची कामे केली. या कालावधीत जे आपापल्या गावी गेले त्यांच्यासाठी गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी विभागाची बैठक घेऊन चालना दिली. त्यामुळे जवळपास २० लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला.त्यामध्ये ८ लाख महिला एकल कुटुंब प्रमुख होत्या . या महामारीमुळे नवीन मित्र म्हणून मास्क,सॅनिटीझर,आँक्सीमीटर,हातमोजे,लस मिळाले. स्थानिक विकास निधीमधून ३ रुग्णवाहिका (प्रत्येकी १२ लाख),२५ लाख पीपीई किट साठी ७२लाख निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये आपली संसाधने योग्य प्रमाणात व प्रकारे वापरावी व आपल्या कुटुंबाची,अन्नाची किंमत समजली असे प्रतिपादन केले. चांदनी जोशी यांनी काठमांडू, नेपाळ वरून बोलताना गरीब,पीडित, असंघटीत कामगार यांचे प्रश्न मांडले. त्यांनी सर्व समाज्यात भीतीचे वातावरण होते व जग आता संपेल अशी धारणा होती असे सांगितले. महिलांना घरगुती हिंसाचारला व असमानतेला सामोरे जायला लागले.महिलांसाठी ही महामारी एक संयमाची परीक्षा घेणारी ठरली. त्यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दीस्थांचे महत्व खूप अधोरेखित झाले. डिजिटल ऐक्याची आवश्यकता व सर्वानी एकत्र येऊन समानता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर भर दिला. शाश्वत विकास उद्दिष्ट्ये ही सर्व मान्य उद्दिष्ट्ये असून ती सर्वांच्या प्रयत्नाने साध्य होऊ शकते असेही सांगितले. अजय झा यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टमध्ये काम अत्यंत कमी झाले आहे. त्याची गरज महामारीमध्ये स्पष्ट जाणवली असे सांगितले. महिलांचे आर्थिक जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. वातावरणातील बदल हा मोठा प्रश्न असून यावरती काम करणे आवश्यक आहे. तसेच समानता आणण्यासाठी नियोजन करावे लागेल असेही अधोरेखित केले. अपर्णा वाईकर ह्या शांघाय चीन मधून जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी कोविड महामारी चीन मधून सुरू झाली. पण त्याचे वाईट परिणाम ही तात्काल दिसायला लागले. त्यांनी महिलांची मानसिक परिस्थितमधील बदल,कामात झालेली प्रचंड वाढ,शैक्षाणिक प्रश्न यामुळे महिलांना आलेली निराशा याबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक समुपदेशन गट करून,WA द्वारे,टेलिफोन द्वारे गट करून, व्हीडिओ व टेलिफोन कॉन्फरन्स द्वारे महिलांना समुपदेशन केल्याचे सांगितले. 


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5967,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,396,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,81,satara,291,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10847,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17467,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14775,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोविड महामारीने शाश्वत विकासाच्या उद्दीष्टच्या अंमलबजावणीचे महत्व जगासमोर आणले : डॉ. नीलम गोऱ्हे
कोविड महामारीने शाश्वत विकासाच्या उद्दीष्टच्या अंमलबजावणीचे महत्व जगासमोर आणले : डॉ. नीलम गोऱ्हे
https://d282wbz2keffpz.cloudfront.net/wp-content/uploads/2020/09/08123647/Shivsena-Dr-Neelam-Gorhe.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_685.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_685.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content