अहमदनगर: जिल्ह्यात आज ३२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ९२५ इतकी झाली आहे. ...
अहमदनगर: जिल्ह्यात आज ३२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ९२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५२ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२७, अकोले १५, जामखेड ०१, कर्जत १४, कोपरगाव ३३, नगर ग्रामीण १७, नेवासा ०३, पारनेर ११, पाथर्डी १६, राहाता २८, राहुरी ०३, संगमनेर ३१, शेवगाव ०२, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १०, कर्जत ०१, कोपरगाव ४०, नगर ग्रामीण १२, नेवासा ०१, पारनेर ०८, पाथर्डी ०१, राहाता ४७, राहुरी ०४, संगमनेर ४४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०७, राहाता ०८, श्रीरामपूर ०१, आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०२, अकोले ०६, जामखेड ०१, कर्जत ०८, कोपरगाव १८, नगर ग्रामीण १३, नेवासा ०७, पारनेर १२, पाथर्डी ०४, राहाता ६०, राहुरी १७, संगमनेर ४२, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०७, कॅन्टोन्मेंट १० आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.