$type=ticker$snippet=hide$cate=0

देवभूमीतील ऑपरेशन

मोठ्या, लोकप्रिय नेत्याला दूर ठेवून कुणाच्याही गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली, तर ती कशी अंगलट येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तराखंडच्...

मोठ्या, लोकप्रिय नेत्याला दूर ठेवून कुणाच्याही गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली, तर ती कशी अंगलट येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तराखंडच्या उदाहरणावरून लक्षात यावं. नोकरशाहीवर पकड ठेवली, तर राज्यकर्त्यांना नीट प्रशासन करता येतं. धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करून घेता येते; परंतु नोकरशाहीनं राज्यकर्त्यांवर मात करायची ठरविली, तर वादालाच निमंत्रण दिलं जातं. 


उत्तराखंडमध्ये नेमकं तेच झालं. काँग्रेसनं आतापर्यंत जनमाणसातील लोकप्रिय नेत्यांना बाजूला ठेवून संघ परिवारातील नेत्यांना किंवा नोकरशाहीतील महत्त्वाची पदं दिली जातात. पक्षाचा हा निर्णय किती गैरलागू ठरतो, हे हरयाणा, उत्तराखंडसह अन्य राज्यांतील उदाहरणावरून लक्षात येतं. सामान्यांना मुख्यमंत्री करण्याचा कितीही आव आणला जात असला, तरी त्याला त्या पदावर नीट काम करताच येतं  असं नाही. भारतीय जनता पक्षानं नोकरशाहीतून आलेल्यांच्या हाती पदं सोपविली, तर ते राज्यकर्ते म्हणून काम करण्यापेक्षा नोकरशाहीसारखंच काम करतात आणि त्यामुळं नोकरशाही मजबूत होते. राज्यकर्त्यांची प्रशासनावर मांड नसली, तर मग प्रशासन नीट काम करू देत नाही. उत्तराखंडचे मावळते मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना हा अनुभव आला आहे. कितीही चांगलं काम केलं, तरी पक्षाचा आणि नेत्यांचा विश्‍वास गमावला, तर काय होतं, हे रावत यांच्या राजीनाम्यावरून लक्षात येतं. त्यातही रावत यांच्या काही निर्णयामुळं पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला होता. त्यातच भाजपच्या आमदारांची नाराजी एकवेळ पक्षश्रेष्ठींनी सहन केली असती; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी पक्षश्रेष्ठी कधीच सहन करीत नसतात. रावत यांनी नुकत्याच झालेल्या हिमस्खलनात प्रशासन गतिमान केलं होतं; परंतु ते काम त्यांना वाचवू शकलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यांशी दोन बैठका, प्रदीर्घ चर्चा करूनही त्यांना पद वाचविता आलं नाही. राजीनाम्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया नाराजी व्यक्त करणारी आहे. भाजपनं राजीनामा का घेतला, हे दिल्लीला गेल्यानंतरच कळेल, असं ते म्हणाले. रावत यांनी पक्षानं आपल्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री देऊन एक सुवर्णसंधी दिली होती. आपण एका साध्या कुटुंबातून, गावातून, सैनिकाच्या घरातून मुख्यमंत्रिपदापर्यंत आलो होतो, हे पक्षानं दिलेल्या संधीमुळं असं ते म्हणाले. उत्तराखंडचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याची चाचपणी करण्यासाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह आले आहेत. ते पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आता राज्यातल्या सर्व आमदारांची व नेत्यांची भेट घेत आहेत. रमण सिंह डेहराडूनमध्ये शनिवारपासून आले आहेत. शनिवारीच रावत यांचा राजीनामा घेतला जाईल अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर रमण सिंह यांनी रावत यांचा राजीनामा हा विषय नसून पक्षातील काही मतभेद उफाळून आल्यानं आपण परिस्थिती पाहण्यासाठी येथे आलो आहोत, असे प्रसार माध्यमांना सांगितलं होतं. येत्या 18 मार्च रोजी उत्तराखंड येथे भाजपचं सरकार स्थापन होऊन चार वर्षे पुरी होत असल्यानं पक्ष कार्यकारिणीची बैठक 13 व 14 मार्चला होणार असल्याचंही रावत यांनी सांगितलं होतं; पण प्रत्यक्षात सोमवारी रावत यांना तातडीनं दिल्लीस बोलावलं व मंगळवारी त्यांना राजीनामा द्यावा लागला. रावत यांचा तातडीनं राजीनामा का घ्यावा लागला याची अनेक कारणं आहेत. रावत यांच्या एकूण कार्यशैलीवरून पक्षातील बहुसंख्य आमदार, खासदार, कार्यकर्ते व नेते नाराज असल्याची चर्चा आहे. रावत यांना तसंच पदावर राहू दिल्यास पक्षात बंडखोरी होण्याची भीती व नेते आम आदमी पक्ष किंवा काँग्रेसकडं जाण्याची शक्यता वाढली होती. पुढील वर्षी विधान सभा निवडणुका होत असल्यानं भाजपच्या अध्यक्षांना रावत यांनाच पदावरून हटवणं हा पर्याय होता. उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं 70 पैकी 57 जागा मिळवल्या होत्या. त्या नंतर रावत यांचं एकाएकी नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढं आले. रावत हे राज्य भाजपचा एक बडा नेता म्हणून कधीच प्रकाशझोतात नव्हते, तरीही काही आमदारांच्या बळावर ते मुख्यमंत्री झाले; पण गेल्या चार वर्षांत ते पक्षातील सर्व आमदारांना खूश करू शकले नाहीत. काही मोजक्याच आमदारांसोबत त्यांचे निकटचे संबंध होते व त्यांच्या सल्ल्यानुसार ते काम करत होते, असं चित्र होते. रावत यांनी केवळ भाजप नव्हे, तर संघ परिवाराचीही नाराजी ओढवून घेतली होती. त्यांनी राज्याचं प्रशासन अधिक सुलभ व्हावं, म्हणून कुमाउँ व गढवाल या दोन प्रशासकीय विभागाशिवाय अन्य एक प्रशासकीय विभाग गैरसैनची निर्मिती केली. त्यांनी राज्याची उन्हाळी राजधानी असलेल्या कुमाऊंमधील अल्मोराचा भाग गैरसैनला जोडला, त्यानं कुमाऊँमधील अनेक नेते नाराज झाले होते. रावत यांच्या या निर्णयाला नैनितालचे भाजपचे खासदार अजय भट्ट यांनी जोरदार विरोध केला होता. रावत यांनी हा निर्णय घेताना भट्ट यांच्याशी चर्चा केली नाही, असं बोललं जात आहे. त्याचबरोबर उन्हाळी राजधानी गैरसैनला हलवताना त्यांनी अनेक जणांशी चर्चाही केली नसल्यानं त्यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढीस लागला होता. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडातील चार धाम यात्रेअंतर्गत असलेल्या सर्व मंदिरांना देवस्थान बोर्डा अंतर्गत आणल्यानं संघ परिवार नाराज झाला होता. त्याचबरोबर रुद्रप्रयागमध्ये एक डिस्टलरी प्रकल्पाला दिलेली परवानगी व हरिद्वार येथील कुंभमेळावर आणलेले काही निर्बंध यामुळं भाजप व संघ परिवारातील नेते नाराज झाले होते. 


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: देवभूमीतील ऑपरेशन
देवभूमीतील ऑपरेशन
https://1.bp.blogspot.com/-_A5mwiSIVCE/YEiqsj-L1nI/AAAAAAABo2I/m5BtzKu4i4EwnYfYb5VrhthnCoKNg1w-wCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-_A5mwiSIVCE/YEiqsj-L1nI/AAAAAAABo2I/m5BtzKu4i4EwnYfYb5VrhthnCoKNg1w-wCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_732.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_732.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content