$type=ticker$snippet=hide$cate=0

शरद पवारांना चुकीची माहिती देऊन टी वदवून घेतली : फडणवीस

  मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चुकीची माहिती दिली. तसेच शरद पवार यांच्या तोंडून चुकीची ...

 



मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चुकीची माहिती दिली. तसेच शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली. त्यामुळे देशमुखांना पाठिशी घालण्याचा पवारांचा प्रयत्न फसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते मंगळवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागाच्या कागदपत्रानुसार कोरोनाची लागण झाली त्यादरम्यान अनिल देशमुख कुठे-कुठे गेले याची माहिती मिळतेय. त्यानुसार अनिल देशमुख 17 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख निवासस्थानी जाणार असल्याची माहिती कागदपत्रात नमूद आहे. या कार्यक्रमानुसार ते गेले की नाही याची माहिती नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अनिल देशमुख 15 ते 27 फेब्रुवारी या तारखेदरम्यान आयसोलेशनमध्ये नव्हते. त्यांना या काळात अनेक मंत्री, अधिकारी भेटले आहेत. अनिल देशमुख यांना या काळात कोण कोण भेटले ही माहिती शोधून काढणे सहज शक्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचे रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकले. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही ? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे दिले होते मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केलेली नाही असे फडवीस यांनी म्हटले. तसेच या फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय गृह सचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटले आहे. मी आज दिल्लीला जात असून केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना 2017 मध्ये मला माहिती मिळाली की. मुंबईतल्या हॉटेलमध्ये डिलींग होतेय व मुंबई पोलिस अधिकारीही या डिलींगमध्ये सहभागी आहेत. मी लगेच कमिशनरना मध्ये घेतले व त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. सर्व पुरावे असल्याने ही कारवाई करण्यात आली, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणाचा संदर्भ देत पुढे फडणवीस यांनी, जे त्यावेळी उपलब्ध होतं ते आताही उपलब्ध आहे. मात्र आपले सरकार वाचवण्यासाठी त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. माझ्या आधी आर. आर. पाटील असतानाही रश्मी शुक्ला होत्या. त्या सुद्धा अनुभवी होत्या. त्यांना या प्रकरणामध्ये मंत्र्यांची तसेच अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याचे समजले. तसेच बदल्यांसाठी पोलिसांची बोलणी सुरू आहेत असेही त्यांना समजले. त्यांनी डीजी साहेबांना यासंदर्भात सांगितले. हे सगळे नंबर इंटरसेप्ट करायला सांगितले गेले. जेव्हा कॉल रेकॉर्डिंग सुरू झाले तेव्हा अनेक बडे अधिकारी काही राजकारणी यांची नावे चर्चेत यायाला लागली. हे सगळं लक्षात यायला लागल्यावर याचा संपूर्ण अहवाल सीओआयने तयार केला व 25 ऑगस्ट 2020 रोजी डीजींना दिला. तर 26 तारखेला डीजींनी हा अहवाल सीताराम कुंटेंना फॉरवर्ड केला. तसेच 26 तारखेला हे मुख्यमंत्र्यांच्या लगेच लक्षात आणावं व सर्वसमावेशक चौकशी सीआयडीकरून करावी. त्याचप्रमाणे या प्रकरणासंदर्भात गुप्तता पाळली जावी असे स्पष्ट पत्र डीजींनी लिहिल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.

यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, माझ्या माहितीनुसार त्याच्यानंतर संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात चिंताही व्यक्त केली होती. मात्र पुढे काही झालं नाही असं फडणवीस म्हणाले. "6.3 जीबीचा डेटा माझ्याकडे आहे. ज्याच्यामध्ये इंटरसेप्ट केलेले सगळे कॉल्स आहेत. लेटर व कॉल्सचे ट्रान्स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे," असेही फडणवीस यांनी सांगितले. मात्र एवढी माहिती देण्यात आल्यानंतरही काहीच कारवाई होत नाहीये असे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांना दिला गेला. त्यानंतर कारवाई झाली कुणावर तर कमिशनर इंटेलिजन्सवर. त्यांचे प्रमोशन थांबवण्यात आले. त्यांच्या हाताखालच्यांना प्रमोशन देण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यांचे रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ होते. त्यांनी डीजी सिव्हिल डिफेन्स पदावर प्रमोशन दिले परंतु, ती पोस्टच अस्तित्वात नाहीय, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्यात येण्यामागे हे रिपोर्ट इंटरसेप्शन कारणीभूत ठरल्याचा दावा फडणवीसांना केलाय. हे सर्व इटरसेप्शन चुकीचे ठरले असते कारण सगळे लोक उघडे पडले असते, तसेच 25 ऑगस्ट 2020 पासून इतक्या महत्त्वाच्या रिपोर्टवर कारवाई का नाही झाली ?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये ज्यांची नावे आली त्यांना तीच पोस्टिंग दिली गेली, असेही फडणवीस यांनी सांगितले. 


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शरद पवारांना चुकीची माहिती देऊन टी वदवून घेतली : फडणवीस
शरद पवारांना चुकीची माहिती देऊन टी वदवून घेतली : फडणवीस
https://i0.wp.com/www.socialnews.xyz/wp-content/uploads/2020/11/28/feca46e72753796712df55ea872eea22.jpg?fit=2000%2C1333&quality=80&zoom=1&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_742.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_742.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content