$type=ticker$snippet=hide$cate=0

कोरोनाचा वाढतोय गुंता... नागरिकांना ना भय-ना चिंता ; नियमांची ऐशीतैशी, कठोर कारवाईची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. परंतु नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्...

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. परंतु नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावून त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली. शहरातील बस स्थानके, कापड बाजार, बाजार पेठ, स्विमिंग टँक, हॉटेल, रेस्टॉरंट, भाजी मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवता नागरिक गर्दी तर करतातच, पण त्यांच्या तोंडाला मास्क देखील नसतो. शहरात ठिकठिकाणी असे चित्र दिसते. मागील 15 दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या नगरमध्ये वाढत आहे. 


     महापालिका व जिल्हा प्रशासनाने 19 ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेेंट झोन केले आहेत. रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे. पण नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून नियम धाब्यावर बसवताना दिसतात. प्रशासनाकडून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई होते. तरीही मास्क विना व सामाजिक अंतराचे भान तरुणाईच नव्हे तर मध्यमवयीनही ठेवत नाही. काही होत नाही यार असे बेफिकिरीने बोलून घोळक्याने वावरतात. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी कशी तोडणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरातील नेहमीच रहदारी व गर्दी असलेल्या माळीवाडा, पुणे बस स्थानक, तारकपूर बस स्थानक, कापड बाजार, मोची गल्ली, नवी पेठ, चितळे रस्ता, दिल्लीगेट, शहाजी रोड, गंज बाजार, पाचपीर चावडी, भाजी मार्केट, कांदा मार्केट येथे नेहमीच गर्दी असते. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून कुणीही उभे राहत नाही की मास्कही व्यवस्थित लावत नाही. एसटी बसेस, खासगी लक्झरी बसेसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस स्थानकात उभे असलेल्या प्रवाशांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व मास्क केवळ नावापुरता कानाला अडकवलेला दिसतो. म्हणजे नागरिकांना कोरोनाचे भय व गांभीर्य नसल्याचे दिसते. नागरिक स्वतःच्या जिवाबरोबर कुटुंबाला व समाजाला अडचणीत आणत आहोत, याचे भान कोणाला असल्याचे दिसत नाही.


माहिती लपवली जाते

नगरमधील नागरिकांनो, आतातरी गांभीर्याने राहून सावध राहा, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगावसे वाटते. परंतु बेफिकीर व मुजोरीत राहणार्‍या नागरिकांच्या कानापर्यंत आवाज पोहोचेल की नाही अशी शंका येते. निष्काळजीपणाने वावरणे, मास्कचा वापर न करणे, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या कमी नसताना ती माहिती लपविली जाते, हे दुर्दैव आहे. जिल्ह्यात शंभराच्या पटीत रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून होणार्‍या कारवाईच्या वेळेव्यतिरिक्त विनामास्क व अंतर न पाळणे हे सर्वत्र दिसत आहे.


लॉकडाऊन नको

कोरोना नियमाचे पालन करणारे व हातावरचे पोट असणार्‍या कष्टकर्‍यांना लॉकडाऊन नको. कारण, ते परवडणारे नाही. आधीच कोरोनाने गरीब जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. पण काही व्यावसायिकांसह बेफिकीर नागरिक व तरुणाईला नियमाचे पालन करणे नको आहे. गरीब जनता उपासमारीने, बेरोजगारीने मरु नये म्हणून धडपडत असतानाही त्यांना स्वतःच्या व इतरांच्या संरक्षणाकरिता नियम पाळणे योग्य वाटते तर तरुणवर्ग व पैशाचा टेंभा असणार्‍यांना नियम नकोत. अशा परिस्थितीत समाजाला घातक अशी परिस्थिती निर्माण होत आहे.


रिक्षा चालकांकडून नियमांचा फज्जा

तीन आसनी रिक्षात दाटीवाटीने 7 ते 8 प्रवासी भरून विना मास्क असणारे रिक्षा चालक कोरोना नियमांची पायमल्ली करीत अवैध वाहतूक करताना दिसतात. दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांच्या तोंडाला मास्क नसतोच. असला तरी हनुवटीवर असतो. रिक्षा चालक रिक्षा थांब्यावर घोळक्याने किंवा एकाच रिक्षात चार-पाच जण बसून गप्पा मारतात. त्यांना कोरोना नियमाबाबत विचारले की त्यांचा मुजोरपणा जागा होतो. अशा मुजोर रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस का कारवाई करू शकत नाही, हा संशोधनाचा भाग आहे. या रिक्षा चालकांना प्रबोधनाची नव्हे तर त्यांच्यावर कडक कारवाईची गरज आहे यात वादच नाही.


सायंकाळी बाजारपेठ हाऊसफुल

नगरची बाजारपेठ दिवसभर गजबजलेली असते. यात कापड बाजार, गंज बाजार, मोची गल्ली, माणिक चौक, आडते बाजार, चितळे रस्ता, दिल्लीगेट यासह पाचपीर चावडी, माळीवाडा परिसर नेहमीच गर्दीने गजबलेला असतो. विशेषतः कापड बाजार, गंजबाजार, मोचीगल्ली हा परिसर सायंकाळी गर्दीने हाऊसफुल्ल असतो. अशा ठिकाणी कोरोना नियमांचा कोणी विचारच करीत नाही. पोलीस अथवा तपासणी पथक आले तर लगेच मास्क लावण्याची गडबड सुरू होते. पोलीस तपासणी पथक निघून जाताच परिस्थिती जैसे थे होते. तसेच नगर मधील पोहण्याचे तलाव सुरू असल्याने तेथेही गर्दी होवून सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नाहीत. एवढेच काय की पोलीस ठाण्यात खुद्द पोलीसच विनामास्क वावरताना दिसतात. वरिष्ठ अधिकारी आले की लगेच सर्व नियमात येतात.


कारवाईचा कालावधी वाढवावा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार पोलीस व मनपा प्रशासन मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर सायंकाळी कारवाई करते. पण मग दिवसभर तर नियमाचा बिनधास्तपणे फज्जा उडवला जातो. म्हणून अशा बेशिस्त बेफिकीर नागरिकांवर कारवाई करण्याचा कालावधी वाढवायास हवा. दिवसभर व दिसेल येथे कारवाई करण्याचे आदेश द्यायला हवे. सातत्याने कारवाई झाल्यास नागरिकांसह कोरोनाही आटोक्यात येईल, यात शंका नाही.


उपनगरातही नियमाची पायमल्ली

शहरासह केडगाव, सावेडी, सारसनगर, भूषणनगर अशा उपनगरातही सार्वजनिक ठिकाणी व भाजी मार्केट येथे गर्दी होते. अशा वेळी नो मास्क-नो सामाजिक अंतर अशी अवस्था नागरिकांची असते. विशेष म्हणजे उपनगरात पोलीस नेहमीच गस्त घालून पाहणी करू शकत नाही, याचाच फायदा बेफिकीर वृत्तीचे नागरिक घेतात. शहरात 19 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन झाले आहे. याचा अर्थ नगरचा धोका वाढलाय. जिल्ह्यात शुक्रवारी 661 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. यावरून तरी नागरिकांनी दक्ष राहून स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. सर्वच नागरिक बेफिकीर व बेजबाबदार नाही तर नियमाचे पालन करणार्‍यांची संख्या कमी नाही. जागरूक नागरिकही समाजात कमी नाही. त्यांच्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होते, अशा नागरिकांचा कित्ता गिरवणे आजच्या परिस्थितीत गरजेचे आहे. नियमाचे पालन न करता स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या जीवाशी खेळणार्‍यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे.


संचारबंदी, तरी रस्त्यावर गर्दी

नगरमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी आहे. पण या वेळेतही रस्त्यांवर वाहनांचीच नव्हे तर जेवण करून फिरणारांचीही गर्दी असते. पानटपर्‍या काही ठिकाणी सुरू असतात. बहुतांश चौकांतील दुकाने बंद असली तरी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, दुधाच्या गाड्या चौकांऐवजी आडबाजूला कोठे तरी थांबून ग्राहकांची सेवा करीत असतात. रात्रीच्या संचारबंदीत पूर्वीच्या लॉकडाऊन काळात पोलिस रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍यांना अडवून विचारपूस करीत होेते. मात्र, आता रात्रीही कोणीही कोणाला काहीही विचारत नसल्याने रात्रीची संचारबंदी नावालाच उरली असल्याचे दिसते आहे.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोरोनाचा वाढतोय गुंता... नागरिकांना ना भय-ना चिंता ; नियमांची ऐशीतैशी, कठोर कारवाईची मागणी
कोरोनाचा वाढतोय गुंता... नागरिकांना ना भय-ना चिंता ; नियमांची ऐशीतैशी, कठोर कारवाईची मागणी
https://1.bp.blogspot.com/-xYMAk07GYaA/YFYG_XpDJLI/AAAAAAABpHk/tHnt06v2pB0ytu41XDw9lCPTslRbqBYOQCLcBGAsYHQ/s320/20-rastyavr%2Bgardi%2Bvadhli.jpg
https://1.bp.blogspot.com/-xYMAk07GYaA/YFYG_XpDJLI/AAAAAAABpHk/tHnt06v2pB0ytu41XDw9lCPTslRbqBYOQCLcBGAsYHQ/s72-c/20-rastyavr%2Bgardi%2Bvadhli.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_765.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_765.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content