$type=ticker$snippet=hide$cate=0

बोठे आणि वाझे दोघांही जातेगाव घाटाशी संबंध

अहमदनगर/प्रतिनिधीः मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना क्राईम बँचमधून हलविण्यात आले आहे, तर सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे गेल...

अहमदनगर/प्रतिनिधीः मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना क्राईम बँचमधून हलविण्यात आले आहे, तर सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार आहे. विशेष म्हणजे दोघांचीही कुप्रसिद्धी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटामुळेच झाली आहे.  


मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेल्या गाडीचा तपास क्राईम बँचचे पोलिस  अधिकारी सचिन वाझे करीत होते. मुंबई पोलिस दलात चकमेक फेम अधिकारी म्हणून जे अधिकारी गाजले, त्यात वाढे यांचा समावेश आहे. आता त्यांचे नाव स्फोटके भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात घेतले जात आहे. जिलेटिन असलेले वाहन वाझे वापरीत असल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने वाझे पुन्हा चर्चेत आहे. तब्बल 63 गुन्हेगारांचा एन्काउंटर केल्याचे रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. मुंबईतील गुन्हेगारी संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास वाझेच करीत होते; परंतु त्यांना ख्वाजा युनूस प्रकरणी घरी बसावे लागले होते. वाझे मुंबईत, घाटकोपर बाँबस्फोट प्रकरण मुंबईतील; परंतु या प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस प्रकरण नगर जिल्ह्यात घडले होते. मुंबईतील घाटकोपर येथे डिसेंबर 2002 मध्ये बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. या प्रकरणात ख्वाजा युनूस याला अटक झाली. ख्वाजा हा मूळ परभणी जिल्ह्यातील होता. इंजिनिअर असलेला ख्वाजा दुबईत नोकरीला होता; मात्र बॉम्बस्फोटात त्याचे नाव येताच त्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी अटक केली. जानेवारी 2003मध्ये त्याला अधिक तपासासाठी औरंगाबाद येथे पोलिस वाहनातून नेले जात होते. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात आल्यानंतर पोलिसांची गाडी उलटली. समोरून येणार्‍या वाहनाच्या डिप्परमुळे पोलिस वाहनाचा ड्रायव्हर गोंधळला. त्यामुळे पोलिसांचे वाहन रस्त्याकडेला जाऊन उलटले. यात वाहनातील अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. या अपघाताचा फायदा घेऊन ख्वाजा बेडीसह पळून गेला; मात्र त्याच्या नातेवाइकांनी ख्वाजा याला वाझे यांनीच बनावट चकमकीत मारले आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला होता. तो पोलिस दप्तरी फरार आहे. ते प्रकरणही न्यायालयात आहे. या प्रकरणात पुढे 2004 मध्ये वाझे यांना निलंबित करण्यात आले, तेव्हापासून वाझे पोलिस दलातून बाहेर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते क्राईम ब्रँचमध्ये दाखल झाले.  पारनेर तालुक्यातील या जातेगाव घाटानेच बोठे याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. एका छोट्या वृत्तपत्रात आलेल्या घाटेवाडी अल्कोहोल प्रकरणाचा बोठे याने पाठपुरावा केला. सकाळ हे मोठे वृत्तपत्र होते. त्यामुळे त्याची दखल घेतली गेली. बोठे याचे नाव या प्रकरणामुळेच राज्यभर झाले. त्यानंतरच त्याची पोलिसांत उठबस वाढली. घाटेवाडी ही जातेगाव घाटापासून जवळच आहे. त्याच जातेगाव घाटाची गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची याच जातेगाव घाटात हत्या झाली. बोठे याचा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आले. बोठे याचा जातेगाव घाटाशी असा दोनदा संबंध आला. 


उमेशचंद्र यादव विशेष सरकारी वकील

रेखा जरे हत्याकांडात अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जरे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून आतापर्यंत पाच आरोपीना जेरबंद करून भक्कम पुराव्याच्या आधारे आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील सूत्रधार बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तो कधी सापडणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बोठे आणि वाझे हे दोघेही सध्या पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बोठे आणि वाझे दोघांही जातेगाव घाटाशी संबंध
बोठे आणि वाझे दोघांही जातेगाव घाटाशी संबंध
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQbSAeWSWtqNOSsIfl5GB330knTE5GA09zE4fiuJJgpNjGDwtsFqACGycqlFxcCh8x1BjU&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_776.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_776.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content