$type=ticker$snippet=hide$cate=0

मनपा स्थायीच्या सभापतीपदी घुले बिनविरोध ; शिवसेनेची पुन्हा माघार, तिघेजण राहिले अनुपस्थित

 अहमदनगर : महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व भाजपच्या मैत्रीचा फटका शिवसेनेला गुरुवारी पुन्हा बसला. शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी म...

 अहमदनगर : महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व भाजपच्या मैत्रीचा फटका शिवसेनेला गुरुवारी पुन्हा बसला. शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी माघार घेतल्याने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अविनाश घुले यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, सभापती निवडीच्या या सभेस शिवसेनेचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने त्याचीही जोरदार चर्चा मनपामध्ये आहे. 


स्थायी समिती सभापती निवडीसाठी महापालिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी व पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही निवडणूक प्रक्रिया केली. जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, मनपाचे नगर सचिव एस. बी. तडवी यावेळी उपस्थित होते. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे घुले यांचे दोन तर शिवसेनेचे पठारे यांचेही दोन अर्ज दाखल होते. यापैकी घुले यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले. मात्र, पठारे यांच्या दोन्ही अर्जांवर सूचक म्हणून रिता भाकरे यांचीच सही असल्याने यापैकी एक अर्ज छाननीत अवैध ठरला. त्यानंतर माघारीच्या मुदतीत पठारे यांनी माघार घेतल्याने घुले यांची निवड झाल्याचे घोषीत केले, असे डॉ. भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.

शिवसेनेचे तिघे अनुपस्थित

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीकडून अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महापालिकेमध्ये महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या अगोदर राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपाचा महापौर झालेला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणे बदललेली होती. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले यांनी सभापती होण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते. तसेच बहुजन समाज पक्ष व काँग्रेस सदस्यांनीही सूचक-अनुमोदक होऊन त्यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पठारे यांनी उमेदवारी दाखल केल्यावर निवडणूक होते काय, याची उत्सुकता होती. मात्र, पठारे यांच्यासह त्यांच्या सूचक रिता भाकरे हे दोनच सेनेचे नगरसेवक सभेस उपस्थित राहिले. सचिन शिंदे, परसराम गायकवाड व श्याम नळकांडे हे सेनेचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. परिणामी, निवडणूक लढवण्याचा इरादा सेनेला सोडून द्यावा लागला व माघार घ्यावी लागल्याने घुले बिनविरोध निवडले गेले.

महाविकास व भाजप...दोघांनाही ठरले सोयीचे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे व त्यात राष्ट्रवादी व शिवसेना हे मित्र पक्ष आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा राहिल्याने महाविकास आघाडीत स्थानिक स्तरावर फाटाफूट झाली काय, असा संशय व्यक्त होत होता. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांची उमेदवारी दाखल करतेवेळी भाजपचे महापौर वाकळे उपस्थित असल्याने भाजपच्या 4 नगरसेवकांचा घुले यांना पाठिंबा आहे काय, असाही विषय झाला होता. या पार्श्‍वभूमीवर सभापती निवडीच्या सभेत सभागृहामध्ये  राष्ट्रवादी 5,  भाजपा 4 ,काँग्रेस 1, बसपा 1 व शिवसेनेचे 2 असे 13 सदस्य उपस्थित होते. सेनेचे पठारे यांनी माघार घेतल्याने घुले बिनविरोध झाले व प्रत्यक्ष मतदानाची वेळच आली नाही. परिणामी, राष्ट्रवादी व भाजप या दोघांनाही ते सोयीचे ठरले. मतदान झाले असते राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील मैत्री नगरमध्ये फुटली व नगरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले असते. तसेच निवडणुकीत घुले यांना भाजपच्या नगरसेवकांनी मते दिली असती तर राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना मैत्री, पण नगरमध्ये राष्ट्रवादी-भाजपचे साटेलोटे, असे चित्र दिसले असते व ते राज्यातील महाविकास आघाडीच्या दृष्टीने अडचणीचे होते. पण घुले बिनविरोध झाल्याने किमान राष्ट्रवादी व भाजपची तरी झाकली मूठ राहिली.

सभापती मी संपूर्ण शहराचा : घुले

सभापती निवडणुकीसाठी मी स्थायी समितिीच्या सर्व 15 सदस्यांना भेटलो होतो व मला सभापती व्हायचे आहे, त्यासाठी मला साथ द्या अशी मागणी मी केली होती. त्यानुसार सर्वांनी मला पाठिंबा दिला व मी या निवडणुकीमध्ये बिनविरोध सभापती म्हणून निवडून आलो आहे, असे नूतन सभापती अविनाश घुले यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळामध्ये शहरातील जी प्रलंबित विकास कामे आहेत, त्यांना प्राधान्य देणार आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. या माध्यमातून सरकारकडून निधी मिळवून विकास कामे करण्यात येणार आहेत. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील रस्ते, पाणी हे विषय अत्यंत महत्वाचे आहे. ते सोडवणार आहोत. शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता ते तात्काळ दुरुस्त व्हावे, या उद्देशाने आम्ही काही कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सभापतीपदी निवडून आल्यानंतर मी कोणत्या एका पक्षाचा नाही तर मी नगरचा सभापती आता झालेलो आहे, असे सूचक वक्तव्यसुद्धा घुले यांनी केले. मला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला असे त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, अविनाश घुले यांना मनपा स्थायी समितीचे सभापतीपद दुसर्‍यांदा मिळाले आहे. याआधी 2007-08मध्ये ते स्थायी समितीचे सभापती होते.

पक्षादेशानुसार अर्ज व माघार-पठारे

शिवसेनेेचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या आदेशाने मी स्थायी समिती सभापती निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती व आता त्यांच्याच आदेशाने मागे घेतली आहे, असे सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा सभापती होत असल्याने मी माघार घेतली आहे. मी माघार घेण्याचे निश्‍चित झाल्यामुळे शिवसेनेचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले आहेत. सर्व 5 नगरसेवक माझ्यासमवेतच होते व माझ्या उमेदवारी अर्जावरील सूचक-अनुमोदकांच्या सह्या बनावट नव्हत्या, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. माघार घेतल्याने मी नाराज झालेलो नाही. पक्षापेक्षा मी मोठा नाही, पक्षादेशानुसार अर्ज भरला व पुन्हा काढून घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनपात फुटली फटाक्यांची लड

स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक सुरू असताना घुले समर्थकांनी बाहेर मनपाच्या आवारात फटाके लावले, पण काही उत्साहींनी चक्क मनपाच्या पहिल्या मजल्यावरील महापौर दालनाच्या परिसरातच फटाक्याची लड पेटवून दिली. त्याच्या दणदणाटाने उपस्थित पोलिस फौजफाटा चक्रावून गेला व त्यांनी लगेच हातात काठ्या घेऊन ही गर्दी पांगवली. सर्वांना मनपाच्या आवारात पाठवून दिले. तसेच ज्यांच्या तोंडाला मास्क नव्हते, त्यांना तेथील पोलिस अधिकार्‍यांनी कारवाईचे इशारे देऊन बाहेर काढले.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मनपा स्थायीच्या सभापतीपदी घुले बिनविरोध ; शिवसेनेची पुन्हा माघार, तिघेजण राहिले अनुपस्थित
मनपा स्थायीच्या सभापतीपदी घुले बिनविरोध ; शिवसेनेची पुन्हा माघार, तिघेजण राहिले अनुपस्थित
https://1.bp.blogspot.com/-rP7ihtwpPG4/YEDpOnXdqII/AAAAAAABoxE/g7HnFdVn798TbIY3twXCI5TcLTWgFLu2wCLcBGAsYHQ/s320/Avinash%2BGhule.jpg
https://1.bp.blogspot.com/-rP7ihtwpPG4/YEDpOnXdqII/AAAAAAABoxE/g7HnFdVn798TbIY3twXCI5TcLTWgFLu2wCLcBGAsYHQ/s72-c/Avinash%2BGhule.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_78.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_78.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content