$type=ticker$snippet=hide$cate=0

मित्र...शत्रू आणि पुन्हा मित्र ; नितीशकुमार-उपेंद्र कुशवाहचा राजकीय प्रवास

पाटणा : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधकांची फारशी कमी नाही. हे विरोधकही वेळोवेळी बदलत आहेत. लालू प्रसाद यादव, जे एका...


पाटणा : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधकांची फारशी कमी नाही. हे विरोधकही वेळोवेळी बदलत आहेत. लालू प्रसाद यादव, जे एका टप्प्यावर त्यांचे सहयोगी होते, ते आज त्यांचे मोठे विरोधक आहेत आणि संयुक्त जनता दलमधील जीतन राम मांझी नितीशकुमार यांच्यापासून दुरावले आणि पुन्हा एकत्र आले. एकेकाळचे सहकारी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांचा आणि नितीशकुमार यांना असलेला विरोध चांगलाच गाजतो आहे. त्याच वेळी राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मात्र शत्रुत्व विसरून नितीशकुमार यांची गळाभेट घेतली. एवढेच नाही, तर त्यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष संयुक्त जनता दलात विलीन केला.  


कुशवाह यांनी राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे संयुक्त जनता दलात विलीनीकरण करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय जनता दलाने कुशवाह यांच्यावर सरड्यासारखे रंग बदलल्याचा आरोप केला. नितीशकुमार 15 वर्षे बिहारच्या सत्तेत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते मुख्यमंत्री आहेत. मांझी यांच्या अल्पशःकाळाचाच काय तो अपवाद. विकास आणि सुशासन तसेच विकास आणि सामाजिक सुधारणा या त्यांच्या दोन लोकप्रिय घोषणा आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नितीनकुमार पुन्हा मुख्मयंत्री झाले असले, तरी त्यांचा पक्ष थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते; परंतु त्यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या घटली. कमी जागा मिळाल्यामुळे नितीशकुमार यांचे मुख्यमंत्री बनणे भाजपवर अवलंबून राहिले. नितीशकुमारांना भाजपने मुख्यमंत्री केले असले, तरी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या  सुशीलकुमार मोदी यांना केंद्राच्या राजकारणात हलवून आपला हेतू स्पष्ट केला. 

बिहारमध्ये भाजप संयुक्त जनता दलाला एकामागून एक धक्के देत आहे. बिहारमध्ये तयार केलेले नवीन सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. भाजपची अनेक धोरणे संयुक्त जनता दलाला अस्वस्थ करीत आहेत. भाजप सरकारमध्ये सहभागी असतानाही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाजप प्रश्‍न विचारत आहे. गृहमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडे आहे. अरुणाचल प्रदेशातील संयुक्त जनता दलाचे सात आमदार भाजपने फोडले. भाजपच्या उदासीनतेमुळे मंत्रिमंडळ विस्तारही दीर्घकाळ लटकला. स्वत: नितीशकुमार यांनी याकडे लक्ष वेधले होते. अनेक मंत्र्यांची नेमणूक बाकी आहे. 

बिहारमध्ये पूर्वीपेक्षा भाजपची भूमिका जास्त निर्णायक आहे. अशा परिस्थितीत संयुक्त जनता दलाने आपला पक्ष अधिक बळकट करून भाजपला शह द्यायचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून लव्ह-कुश समीकरणा’ ची आवश्यकता पुढे आली. बिहारमधील लव्ह-कुश युतीचा इतिहास जुना आहे. नितीशकुमार-कुशवाह यांची युती म्हणजे लव-कुश युती. नितीशकुमार यांची व्होट बँक पाहिल्यास या समीकरणाच्या साहाय्याने त्यांनी सत्तेत स्वत: ला बळकट केले आहे. कुशवाह समाजाला बरोबर घेऊन युतीचे समीकरण आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांनी केला आहे. 


चौकट

नितीशकुमार-कुशवाह दोघांचाही फायदा

कुशवाह हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मोठे विरोधक होते. आता ते एकत्र आले आहेत. कुशवाहा यांनाही नितीशकुमारसोबत येण्याचा फायदा आहे. 2012-2013 मध्ये कुशवाह यांनी आपला पक्ष स्थापन केला. नरेंद्र मोदी च्या उदयाचा हा काळ होता. त्यात भाजपने कुशवाह यांना प्रोत्साहन दिले. पुढे कुशवाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा लढवून तिन्ही जागा जिंकल्या. ते मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कट्टर विरोधक राहिले. नितीशकुमार यांच्याविरूद्धचे त्यांचे राजकराण यशस्वी झाले नाही. नंतर ते महाआघाडीत गेले. तिथेही ते फार काळ राहिले नाहीत. पक्षाच्या विलीनीकरणानंतर कुशवाह यांना काय मिळते हे अजून ठरलेले नाही. त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व किंवा राज्यात मंत्रिपद मिळू शकते.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मित्र...शत्रू आणि पुन्हा मित्र ; नितीशकुमार-उपेंद्र कुशवाहचा राजकीय प्रवास
मित्र...शत्रू आणि पुन्हा मित्र ; नितीशकुमार-उपेंद्र कुशवाहचा राजकीय प्रवास
https://www.jagranimages.com/images/newimg/03032021/03_03_2021-upendra_kushwaha_nitish_kum_21424118.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_801.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_801.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content