$type=ticker$snippet=hide$cate=0

कष्टातून उभे केले साम्राज्य

नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी कष्टातून आपले साम्राज्य उभे केले. अर्थात त्यामागे एकत्रित कुटुंबाची ताकद त्यांच्यासमवेत होते. जगण्यासाठी...


नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी कष्टातून आपले साम्राज्य उभे केले. अर्थात त्यामागे एकत्रित कुटुंबाची ताकद त्यांच्यासमवेत होते. जगण्यासाठी व कुटुंब चालवण्यासाठी कष्ट करणे गरजेचेच होते. पण ते करीत असताना गांधींनी आपल्या कष्टाला समाजकार्याची जोड दिली. त्यामुळेच नगरच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी लौकिक मिळवला. 



फ्रुट ज्यूसच्या हातगाडीपासून ते हॉटेल व्यवसाय ते नंतर आधुनिक व्यवसाय असा प्रवास गांधींचा झाला. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत दिलीप गांधी यांचा यशस्वी प्रवास झाला, तोे केवळ एकत्र कुटुंब पध्दतीमुळे शक्य झाल्याचे हे कुटुंब सांगते. कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र कुटुंब संकल्पना सर्वांनी बाळगली पाहिजे, असे गांधी परिवार नेहमी सांगतो. गांधी परिवार हा मूळचा नेवासा तालुक्यातील रस्तापूर या गावातील. दिलीप गांधी यांचे आजोबा श्रीमल गांधी हे पोटापाण्यासाठी नगर शहरात स्थायिक झाले. कोळशाच्या व्यवसायापासून या कुटुंबाची सुरुवात झाली. नगरमध्ये त्या काळी प्रसिध्द असलेला टांगा व्यवसाय या कुटुंबाने केला. एकाच व्यवसायात न राहता काळानुसार बदलत नवीन व्यवसाय केले. खासदार गांधी यांचे वडील मनसुखलाल यांनी ट्रक व्यवसाय सुरू केला. ते स्वतः ड़्राइव्हर म्हणून काम करत. ते राज्यात-परराज्यात माल वाहतूक करत होते. दिलीप गांधी यांनी दादा चौधरी विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर महिंद्रा शोरुममध्ये नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली. त्या पुढे त्यांचे भाऊ अशोक व अनिल या तिघा कुटुंबाने एकत्र राहत व्यवसाय सुरू केला. आशा टॉकीज चौकात गांधी यांनी तिघा भावांबरोबर मिळून समर्थ कॅन्टिन सुरू केले. 1972 मध्ये या कुटुंबाने न्यू इंडिया फ्रूट ज्युसची गाडी सुरू केली. गांधी हे करीत असलेली मस्तानी त्या काळी नगरमध्ये प्रसिध्द होती. या गाडीवर नगरचे तत्कालीन राजकीय नेते, कार्यकर्ते हे ज्युस पिण्यासाठी येऊन राजकीय गप्पाचे फंड रंगवत होते. त्याचवेळी दिलीप गांधी नगरपालिकेच्या राजकारणात ओढले गेले. नगरच्या प्रसिध्द कापड बाजारात 1986 मध्ये त्यांनी देवेंद्र हॉटेलची सुरुवात केली. गुजराथी थाळी या हॉटेलची प्रसिध्द होती. कापड बाजारातील व्यावसायिक, ग्राहकांचा तिला प्रतिसाद होता. जनता पार्टीतून गांधी याचा प्रवास भाजपमध्ये होऊन ते नगर दक्षिणचे तीनवेळा खासदार झाले. अर्बन बँकेचे ते चेअरमन होते. त्यांचा मुलगा सुवेंद्रही राजकारणात आला. ते महानगरपालिकेत नगरसेवक होते. हे कुटुंब राजकारणात असले तरी व्यवसायाकडे त्यांनी मात्र दुर्लक्ष केले नाही. राजकारणाबरोबर व्यवसायात हे कुटुंब प्रगती करीत आहे. हे सर्व एकत्र कुटुंबामुळे राजकारण व व्यवसायाकडे या कुटुंबाची वाटचाल झाली आहे. इंटेरिअर डिझायनचा व्यवसाय, एमआयडीसीमध्ये एलईडी लाइट कारखाना सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पाण्याची नाईनफ्रेश अक्वा ही कंपनी या परिवाराकडून चालविण्यात येत आहे. राजकारणात असले तरी मतदारसंघातील तरुणांचा राजकारणासाठी वापर करण्यापेक्षा ते त्यांना नोकरीच्या संधी कशी देता येईल, याचा प्रयत्न गांधी परिवाराकडून सुरू आहे. माजी खासदार गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जॉब फेअरचे आयोजन करून नगरसह मोठ्या शहरातून कंपन्या यासाठी आमंत्रित करण्यात येतात व जॉब फेअरच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. गांधी परिवाराचे बारा जणांचे कुटुंब एकत्र राहत आहे. एकत्र कुटुंबामुळे समाजात कसे वागायचे, याचे धडे नव्या पिढीला मिळतात. मुलांवर संस्कार चांगले होतात. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेक अडचणींना तोंड देता येते, असे या कुटुंबाला वाटते. दिलीप गांधी यांच्या निधनाने या कुटुंबाचा आधार निखळला आहे.

...आणि, प्रगतीला लागले ग्रहण

स्थानिक पातळीवर राजकीयदृष्ट्या अडचणीत आले की दिलीप गांधी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील आणि दिल्लीतील आपल्या संपर्काचा वापर करुन मात देण्याचा प्रयत्न करीत. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या प्रगतीला ग्रहण लागले. त्यामुळे राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी आता गांधी काय भूमिका घेणार, त्यांचे जुने सहकारी आणि नव्याने तयार झालेले काही ’मित्र’ त्यांच्या मदतीची परतफेड करण्यासाठी धावून येतात का, याकडे लक्ष लागले होते. त्यांचे त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू होते. पण राजकारणात पुन्हा उभारी घेणे त्यांना शक्य झाले नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार असताना दिलीप गांधी यांचे तिकीट पक्षाने कापले होते. त्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या नगर अर्बन बँकेवरही प्रशासक नेमला गेल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीला ग्रहण लागले. त्या काळात त्यांच्याकडे फक्त पक्षाचे नगर शहर जिल्हाध्यक्षपद राहिले होते व त्याचीही मुदत संपल्याचे तेही पद गेले. या पार्श्‍वभूमीवर गांधींच्या भविष्यातील राजकीय अपेक्षांची पूर्तताही दोलायमान झाली.


मनपा निवडणुकीपासून उतरती कळा

2018 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढवणार्‍या गांधींना अपेक्षित यश आले नाही. अवघे 14 नगरसेवकच निवडून आले. त्यानंतर खासदारकीच्या निवडणुकीत काँग्रेसमधून आलेल्या डॉ. सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने गांधींचा उमेदवारीचा पत्ता कट झाला. अशा स्थितीत, विखेंच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधींना आश्‍वस्त केले व पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. त्यामुळे राज्यसभा वा विधान परिषद सदस्यपद मिळेल, अशी गांधी समर्थकांना आशा होती. पण ती धुळीस मिळाली. कारण, गांधीच अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासकच नेमल्याने यातून गांधींसह त्यांच्या भारतीय जनता पक्षाचीही प्रतिमा खालावली आहे. त्याचा फटका गांधींच्या आगामी राजकीय वाटचालीला बसला. त्यानंतर त्यांच्या हातात शहर जिल्हाध्यक्षपद तसेच सावेडी, भिंगार, केडगाव व मध्य शहर या चार मंडलांवरचे वर्चस्व राहिले होते. यातून शहरातील राजकारणात त्यांना तग धरता येणार होते. पण नंतर शहर जिल्हाध्यक्षपद गेले व चारही मंडलेही हातून गेली. यांनी व त्यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरात लावून धरलेल्या नगरची विधानसभेची जागा भाजपला घेण्याच्या मागणीला त्यानंतर पुरेसे बळ मिळाले नाही. शिवाय, गांधींच्या पक्षांतर्गत विरोधकांकडूनही उचल खाल्ली गेल्याने गांधींना पुन्हा नगरच्या राजकारणात कमबॅक करणे दिवसेंदिवस अवघड होत गेले.


दोनदा तिकीट कापले

नगर नगरपालिकेचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष या पदांनंतर थेट 1999मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या गांधींना त्यानंतर पाच वर्षांनी थोडासा ब्रेक लागला. 2004मध्ये केंद्रीय मंत्री असताना त्यांचे तिकीट कापले गेले. पण ते पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने 2009 व 2014मध्ये त्यांना पुन्हा खासदार होता आले. खासदारकीच्या तीन टर्म त्यांनी केल्या. पण या दरम्यान दोनवेळा त्यांचे तिकीट कापले गेले. 2004मध्ये मंत्री असताना व आता 2019मध्ये खासदार असताना त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. हाताशी खासदारकी असताना 111 वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेवरही त्यांनी वर्चस्व मिळवत ही नागरी बँक थेट मल्टीस्टेट करून टाकली. एकीकडे अशा दमदार राजकीय वाटचालीसह शहरातील पक्षावरही शहर जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून पकड मिळवली. एकाचवेळी खासदार, बँक अध्यक्ष व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अशी तीन महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. पण महापालिका निवडणूक व त्यातील निकाल जाहीर झाल्यावर तसेच या निकालानंतर भाजपचा महापौर होण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेण्याचा स्थानिक स्तरावर निर्णय झाल्यानंतरच गांधींच्या राजकीय वाटचालीला ग्रहण लागण्याच्यादृष्टीने वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे लोकसभा उमेदवारीचे तिकीट कापताना त्यांना कळवण्याचे सौजन्यही पक्षाने दाखवले नाही. त्यानंतरच त्यांना पक्ष विचारांचा अंदाज आला व चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी लोकसभेच्यावेळी बंडखोरी करण्याची केलेली तयारी त्यांनी थांबवली. अर्थात यासाठी विखे पिता-पुत्रांनाही त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागला होताच. अशा सगळ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर नगर अर्बन बँकेची आर्थिक सत्ताही प्रशासक नियुक्तीने धुळीस मिळाल्याने आगामी राजकीय वाटचाल दमदारपणे करण्याचे आव्हान गांधींसमोर होते. पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. खासदारकी, बँकेचे अध्यक्षपद व पक्षाचे शहरजिल्हाध्यक्षपद ही तीनही महत्त्वाची पदे हातून गेल्याने नगरच्या राजकारणात गांधींना फारसा व्हॉईस राहिला नाही. त्यात नंतर नगर अर्बन बँकेसंदर्भातील तक्रारींची चौकशी सुरू झाल्याने त्यामुळेही गांधी अडचणीत आले. या बँकेसंदर्भात गुन्हे दाखल झाल्याने गांधींच्या अडचणीत वाढ झाली होती. या अडचणींतून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी दिल्ली गाठली होती. पण तेथे गेल्यावर त्यांना कोरोनाने गाठले व नगरचा लढवय्या राजकारणी काळाने ओढून नेला.


Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कष्टातून उभे केले साम्राज्य
कष्टातून उभे केले साम्राज्य
https://1.bp.blogspot.com/-bei9ZCo7BbM/YFIKHSLuoVI/AAAAAAABpC0/Yjtc8h7_noQgc4zmALcAEYtl0JmPGMUYQCLcBGAsYHQ/s320/17-dilip%2Bgandhi-12.jpg
https://1.bp.blogspot.com/-bei9ZCo7BbM/YFIKHSLuoVI/AAAAAAABpC0/Yjtc8h7_noQgc4zmALcAEYtl0JmPGMUYQCLcBGAsYHQ/s72-c/17-dilip%2Bgandhi-12.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_804.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_804.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content