$type=ticker$snippet=hide$cate=0

ड्रॅगनची आगपाखड

भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड समुहाच्या पहिल्या शिखर परिषदेमध्ये काय चांगले झाले, याचा विचार करण्याअगोदरच चीन...


भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड समुहाच्या पहिल्या शिखर परिषदेमध्ये काय चांगले झाले, याचा विचार करण्याअगोदरच चीनने आगपाखड करायला सुरुवात केली आहे. तसे ते स्वाभावीकही आहे. या चार देशांचा क्वाड समूह डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच स्थापन करण्याचा निर्णय झाला होता; परंतु त्या वेळची जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन हा गट पुढे सक्रिय झाला आहे. 


गेल्या काही वर्षांत चीनने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे हा गट अस्तित्त्वात यायला चालना मिळाले. गेल्या वर्षी वुहानमध्ये आढळलेला कोरोना हे त्याला निमित्तमात्र ठरले. आता या गटाची पहिलीच शिखर परिषद आभासी पद्धतीने झाली. तीत कोरोना लसीकरणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये कोरोनाविरोधी लसीचा पुरवठा करण्यासाठी आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारताने जगाला लसी पुरवण्यात मोठी भूमिका निभावली आहे. कोरोनाच्या भारतीय बनावटीच्या दोन लसी आता जगभरात पोचल्या आहेत. लस डिप्लोमसीत भारताने चीनवर कधीच मात केली आहे. अजून सहा लसी लवकरच जगाच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत. चीनच्या लसी नाकारून पाकिस्तानसह जगभरातील अनेक देश भारतीय लसींचा स्वीकार करीत आहेत. अशा परिस्थितीत चीनने भारताची आघाडी मान्य केली आहे; परंतु क्वाड परिषदेनंतर चीनच्या मक्तेदारीला भारत आव्हान देऊ शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना लसींचा पुरवठा करण्यामध्ये सध्या चीन आघाडीवर आहे. या क्षेत्रामध्ये चीनची मत्तेदारी निर्माण होऊ नये म्हणून क्वाड देशांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या चौघांनी क्वाड देशांच्या पहिल्याच परिषधेमध्ये ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला. मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत असे सांगितले. कोरोना लसींची योग्य पद्धतीने वितरण होण्याच्या उद्देशाने आम्ही क्वाड देशांनी परस्पर सहयोगाच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मोदी यांनी सांगितले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामधील देशांच्या मदतीसाठी भारतातील लसनिर्मितीची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मदतीने काम केले जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या परिषदेमध्ये लसीकरण सुरक्षित आणि प्रभावीपणे व्हावे या हेतूने लस निर्मिती आणि वितरणासंदर्भात लस निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचा गट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2022 संपेपर्यंत एक अब्ज डोस निर्माण करण्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे. क्वाडमधील देशांनी आपला आर्थिक पुरवठा, वितरण क्षमता आणि लॉजिस्टिकल क्षमता एकत्र वापरुन लसनिर्मितीसंदर्भात सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली आहे.

भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या पहिल्याच क्वाड परिषदेत चीनने निर्माण केलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि चीनबद्दल आमच्या मनात भ्रम नसल्याचे या चारही देशांनी स्पष्ट केले आहे. मुक्त जलवाहतूक आणि दक्षिण व पूर्व चीन सागरातील मुक्त वातावरण, उत्तर कोरियाचा आण्विक प्रश्‍न आणि म्यानमारमधील लष्कराचे बंड व हिंसक दडपशाही यासह महत्त्वाच्या प्रादेशिक प्रश्‍नांवर या चार नेत्यांनी चर्चा केली. क्वाड देशांच्या बैठकीत चीनवर चर्चा झाली. या संघटनेचा हेतू अमेरिकन हितांचे जतन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे आहे, असे सांगून ग्लोबल टाईम्सने क्वाड देशांचा निषेध केला आहे. ग्लोबल टाईम्स हे चीनचे सरकारी वृत्तपत्र आहे. त्यातील प्रतिक्रिया ही सरकारची अधिकृत प्रतिक्रिया आहे, असे मानले जाते. या वृत्तपत्राचे संपादक शिजिन यांनी भारताला लक्ष्य केले आहे. शिजिन यांनी लिहिले आहे, की क्वाड समूहातील देश चीनचे काहीही बिघडवू शकत नाही. डायोयू बेटांच्या समुद्रात तटरक्षक दल आणि तेथील जहाजांना प्रवेश करण्यापासून चीनला कुणी रोखू शकत नाही. क्वाड बैठकीपूर्वी चीन अस्वस्थ होता, त्यास माफक प्रतिसाद मिळाला. सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य आणि सामंजस्य वाढविणे हे त्याचे उद्दीष्ट असले पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, की तृतीय पक्षाला हानी न करता परस्पर हितसंबंध जोपासणे हे क्वाड सदस्य देशांचे उद्दीष्ट असले पाहिजे. क्वाड सदस्य देशांनी मोकळेपणा आणि सर्वसमावेशकतेचे सिद्धांत राखले पाहिजेत. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या हिताचे असे सकारात्मक कार्य हा समूह करेल, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली. चार देशांच्या बैठकीनंतर चीनचा तीळपापड झाला आहे. हाँगकाँगवर चीन-ब्रिटिशांच्या संयुक्त घोषणेचे उल्लंघन केल्याचा आरोप ब्रिटनने चीनवर केला आहे. चीनने हाँगकाँगला नियंत्रित करण्यासाठी संयुक्त घोषणेचे उल्लंघन केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नाव न घेता चीनला सतर्क केले. क्वाडच्या पहिल्या बैठकीत अमेरिकेने आपले हेतू स्पष्ट केले होते. बायडेन यांनी सांगितले, की भारतीय प्रदेश एक मुक्त प्रदेश असेल. चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, प्रदेशाची स्थिरता राखणे हे क्वाड देशांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतीय उपखंडात लोकशाही मूल्ये आणि स्थिरता याकरिता आपल्या भागीदारांसह संयुक्तपणे काम करण्यास वचनबद्ध आहे.. भारतीय प्रशांत क्षेत्रामधील डायओयू बेटांवर जपान आणि चीनमध्ये वाद आहे. चीन या बेटाला आपले म्हणते आणि त्याच्यावर वर्चस्वासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच या चार देशांचा चीनला विरोध आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15316,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4314,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ड्रॅगनची आगपाखड
ड्रॅगनची आगपाखड
https://1.bp.blogspot.com/-LTeqQfkI8Gk/YE32v24vyPI/AAAAAAABo8Y/14U7UODqRzAy_5_uWqtBbHdWMdZ-bdgTQCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-LTeqQfkI8Gk/YE32v24vyPI/AAAAAAABo8Y/14U7UODqRzAy_5_uWqtBbHdWMdZ-bdgTQCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_808.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_808.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content