$type=ticker$snippet=hide$cate=0

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी

 मुंबई/प्रतिनिधीः सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या मुद्द्यावरुन सरकारला घेरले आहे. महाविकास आघाडीतही या मु...

 मुंबई/प्रतिनिधीः सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या मुद्द्यावरुन सरकारला घेरले आहे. महाविकास आघाडीतही या मुद्द्यांवरुन मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहे; मात्र वाझे प्रकरणावरून राष्टवादी काँग्रेसच्या गृहखात्याला टार्गेट केले जात असले, तरी भाजपचा खरा ब्लेमगेम शिवसेनेवर आहे.  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सुरुवातीला भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले; परंतु नंतर मुंडे यांचे प्रकरण फारसे लावून धरले नाही. पूजा चव्हाण प्रकरणात मात्र भाजप फारच आक्रमक झाला होता. 


वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. या दोन्ही प्रकरणापासून काँग्रेस दोन हात दूरच राहिली. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीन भरलेली गाडी, तिचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू यावरून राष्ट्रवादीच्या ताब्यातील गृहखाते वादात सापडले. विधिमंडळात काही कारवाई करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केले होते; परंतु शिवसेनेनेच तसे करू दिले नाही. भाजपनेही बाब उघड केली. न्यायालयाचा आदेश असतानाही वाझे यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेना कसा दबाव आणीत होती, असे सांगून देवेेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याभोवती संशयाचे जाळे विणले. वाझे प्रकरण अंगलट येताच शरद पवार यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी चर्चा केली. अनिल देशमुख तसेच मुंबईच्या पोलिस आयुक्तापैकी कुणा एकाचा बळी जाईल, असे चिन्ह दोन दिवस दिसत होते. त्याच वेळी गृहमंत्री देशमुख किती सालस आहेत, ते किती प्रामाणिक आहेत, त्यांच्यावर कोणतेही आरोप कसे नाहीत, हे सांगायला आणि माध्यमांत तशा बातम्या यायला सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नबाब मलिक यांनी देशमुख यांची पाठराखण केली. त्यामुळं भाजपनं कितीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली, तरी मुंंडे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी आपल्या नेत्याचा बळी जाऊ देणार नाही, हे उघड झाले. वाझे प्रकरण सरकारवर तापणार असे दिसत असताना वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आज सरकारमधील मंत्र्यांसोबत बैठक झाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. सरकारमध्येही मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर पवार म्हणाले, की कोणाला मंत्रीमंडळात ठेवायचे कोणाला काढायचे हे त्या पक्षाचे काम असते. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पवार यांचे हे वक्तव्य देशमुख यांना काढणार नाही, याचे दिशादर्शक आहेत. मुंडे याच्या वेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाची वाट न पाहता त्यांना वगळण्याची तयारी केली होती; परंतु आता ठाकरे यांना तसे करता येणार नाही. ’महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच सांगितले आहे. कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यात कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि सरकारही तसे अजिबात करणार नाही,’ असे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचे अजिबात काही कारण नाही. दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामा नये हीच आमची, सरकारची भूमिका आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे. याचा बिटवीन द ला़ईन अर्थ सहज कुणालाही कळू शकेल.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी
वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी
https://static.toiimg.com/thumb/imgsize-8848,msid-15762589,width-400,resizemode-4/15762589.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_812.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_812.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content