$type=ticker$snippet=hide$cate=0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा उदारमतवादी चेहरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची दोन दिवशीय बैठक प्रथमच नागपूरबाहेर बंगळूरला झाली. या बैठकीत सरसंघचालकांनंतरचं दुस...


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची दोन दिवशीय बैठक प्रथमच नागपूरबाहेर बंगळूरला झाली. या बैठकीत सरसंघचालकांनंतरचं दुसर्‍या क्रमांकाच्या पदावर सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रय होसबाळे यांची निवड करण्यात आली. होसबाळे यांची निवड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणीतील बदल तसंच भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची वाटचाल सुकर करण्याचं पाऊल आहे, असं म्हणता येईल. 


    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक विचारसरणी आहे. या संघटनेची कार्यपद्धती ठरलेली असते. तिथंल्या निवडीच्या वेळाही ठरलेल्या असतात. कधी कधी पुढची परिस्थिती पाहून मुदतवाढ देणं आलं किंवा नव्या व्यक्तीची निवड करणं हे ठरत असतं. यापूर्वी भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह होते. त्यांची मुदत 2017 लाच संपली होती; परंतु लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ती गेल्या वर्षी संपली. त्यानंतर कोरोनामुळं राष्ट्रीय काही दिवस निवड लांबणीवर पडली. तीन दिवसांऐवजी प्रथमच दोन दिवसांची बैठक झाली. त्यातही दीड हजार प्रतिनिधींऐवजी मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. आभासी पद्धतीने काही प्रतिनिधी सहभागी झाले. संघ प्रमुखांच्या नंतर दोन क्रमांकाच्या मानल्या जाणार्‍या या पदावर दत्तात्रेय होसाबाळे यांची निवडणूक एकमतानं झाली त्यंची ही निवड संघाच्या विचारसरणीत बदल म्हणून पाहिलं जात आहे. होसबाळे यांच्याकडं संघाचा तुलनेने उदार चेहरा म्हणून पाहिलं जातं. होसबाळे यांना संघाच्या कारभाराची खडा न खडा माहिती आहे. यापूर्वी काही व्यक्तींची सर्वोच्च पदावर निवड झाली, तेव्हा त्यांनी संघाचं सुरुवातीच्या टप्प्यातील कामकाज पाहिलेलं नव्हतं. होसबाळे यांचं तसं नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांचा संघ परिवाराशी या ना त्या कारणानं संबंध आला. होसबाळे यांच्या अगोदर भैय्याजी जोशी या पदावर 12 वर्षे होते. 2019 मध्येही होसाबळे यांचं नाव या पदासाठी आलं होतं; पण त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोंडी झाली होती कारण होसाबाळे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा एक मोठा हिस्सा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना व्यतीत केला. नंतर ते संघाच्या मुख्य प्रवाहातील कार्याशी संबंधित होते. संघाच्या कारभारावर लक्ष ठेवणार्‍या तज्ज्ञांचं मत आहे, की अशा परिस्थितीमुळे मदनदास देवीसुद्धा सरकार्यवाह होऊ शकले नाहीत.

केंद्रीय प्रतिनिधी मंडळानं शनिवारी होसबाळे यांना पुढील तीन वर्षांसाठी सरकार्यवाह म्हणून निवडलं. यापूर्वी ते सहयोगी संस्थांची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांची सरकार्यवाह या पदावर निवड झाली आहे.  त्यांची निवड झाली  म्हणजे लगेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आमुलाग्र बदल होईल, असं नाही; परंतु काळानुरूप संघ बदलत असतो. तसा तो थोडा बदलायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही महत्त्वाची पदं तरुणांच्या ताब्यात दिली जाऊ शकतात. सरकार्यवाहपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच अरुण कुमार यांच्यासारख्या अखिल भारतीय प्रचारप्रमुखांचं पद सुनील आंबे यांच्याकडं सोपविण्यात आलं. राज्यसभेचे खासदार आणि संघाचे नेते राहिलेल्या राकेश सिन्हा यांनीही हे बदल मान्य केले आहे. ते म्हणतात, ’आधुनिक-समकालीन कल्पनांमध्ये समेट करण्याची आश्‍चर्यकारक क्षमता होसाबाळेमध्ये आहे. नवीन पिढीशी त्याचा संबंध आहे आणि सर्व प्रकारच्या विचारवंतांशी संवाद साधण्यात ते माहीर आहेत. तथापि, संघाच्या कार्यकारिणीत किंवा त्याच्या प्रतिमेमध्ये कोणताही फरक पडेल हे सिन्हा यांनी स्पष्टपणे नकारलं. त्यांचे म्हणणे आहे की संघातील स्थान हे ’शक्ती’ चं प्रतीक नसून ’जबाबदारीचे’ आहे. संघ कोणत्याही व्यक्तीबरोबर नव्हे, तर सामूहिक भावनेने कार्यरत आहे. होसाबाळे हे संघात असा एक चेहरा आहेत, जे थोडेसे उदारमतवादी आणि जरा आधुनिक दिसत आहेत. होसाबाळे उदारमतवादी आहेत. म्हणूनच ते संघाची उदारमतवादी प्रतिमा निर्माण करण्यात मदत करतील आणि विद्यमान भाजप सरकारचा उदारमतवादी-लोकशाही चेहरा ठरतील. संघाशी संबंधित अनेक विषयांच्या तज्ञांचं मत आहे, की संघ जितका उदारमतवादी व आधुनिक होईल, तितकं केंद्रातील भाजप सरकारचं कार्य करणं अधिक सुलभ होईल. होसाबाळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अगदी निकट मानले जातात. तसंच सध्याचं वातावरण पाहता होसाबाळे यांचं व्यक्तिमत्त्वही संघावरील पुरातन विचारांचा प्रभाव बदलण्यास उपयुक्त ठरेल. संघाची प्रतिमा बदलल्यास सत्ताधारी भाजपची प्रतिमा आपोआप बदलेल. नवीन सरकार्यवाह होसाबाळे यांच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आहे. होसबाळे कर्नाटकातील आहेत. ते कन्नड, तामीळ, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा भाषांमध्ये जाणकार आहे. भाजपला दक्षिण भारतात आपलं अवकाश आणखी वाढवायचं आहे. अशा परिस्थितीत होसाबाळे संघाच्या महत्त्वाच्या पदावर आल्यानंतर भाजपला दक्षिणेकडील दिग्विजयासाठी आणखी मदत होईल. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि संघाच्या स्थापनापूर्व शताब्दी वर्षात संघाच्या महत्त्वाच्या पदावर होसबाळे असणं हे संघ आणि भाजप दोन्हींसाठीही उपयुक्त ठरणारं आहे. ते वयाच्या 13 व्या वर्षी स्वयंसेवक झाले. त्यांना अनेक परदेशी भाषादेखील अवगत आहेत. कन्नड भाषेतील मासिक  ‘असीमा’ चे ते संस्थापक आणि संपादकही आहेत. 1975-77 दरम्यान जयप्रकाश नारायण यांनी सुरू केेलेल्या चळवळीत होसाबाळेदेखील सहभागी होते आणि मिसा कायद्यांतर्गत 21 महिन्यांचा तुरूंगवास त्यांनी भोगला. तुरुंगात त्यांनी दोन हस्तलिखित जर्नल्स संपादित केली. 1978 मध्ये ते विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. त्यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि नेपाळचा दौरा केला आहे. 2004 मध्ये, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख केलं गेलं. भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागात शिरकाव केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संपूर्ण लक्षण दक्षिणेकडं असतं. अशा परिस्थितीत कर्नाटकातील रहिवासी होसाबाळे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. आगामी काळात दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत. कर्नाटकातील रहिवासी होसाबाळे यात मदत करू शकतात.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा उदारमतवादी चेहरा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा उदारमतवादी चेहरा
https://1.bp.blogspot.com/-fAq28J3Q-Cw/YFc_SmdP8YI/AAAAAAABpJE/Cg7eOt4eqWMc9ZZ_rZ0FMwWqB7Xe0T8bgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-fAq28J3Q-Cw/YFc_SmdP8YI/AAAAAAABpJE/Cg7eOt4eqWMc9ZZ_rZ0FMwWqB7Xe0T8bgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_829.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_829.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content