कोपरगाव शहर प्रतिनिधी- दलित शोषितांना पिण्याच्या पाण्यावर हक्क नव्हता त्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- दलित शोषितांना पिण्याच्या पाण्यावर हक्क नव्हता त्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुवादी मानसिकता असलेल्याना मारलेली जोरदार थप्पड होती असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
भारतीय मानसिकता मनुवादी व्यवस्थेने बरबटलेली होती कुत्रे व जनावरे बिनधास्त पणे विहीर व तलावाचे पाणी पीत होते त्यावेळी सर्व समान्य दलित व्यक्तीस हक्काने पाणी पिऊ दिले जात नव्हते दलितांच्या पाणी पिण्याने विहिरी तलाव बाटले जात होते त्यातून अनेक दलितांना आपले जीव गमवावे लागले होते अशा वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला या सत्याग्रहा च्या वेळी मोठा गदारोळ झाला प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना दगड,व लाठ्या काठ्या झेलाव्या लागल्या पिण्याच्या पाण्यासाठी कदाचित जगातील हा पहिला सत्याग्रह होता मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या सत्याग्रहात नुसते पाणीच पेटवले नसून वर्षानुवर्षे मनुवाद्यांच्या भीती पोटी आपल्या न्याय हक्का पासून वंचित असलेल्या समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्का करीत संघर्षासाठी मने पेटवली
त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक शोषण मुक्त समाज निर्मितीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होत गेले
महाडचा सत्याग्रह हा मनुवादी मानसिकतेला मारलेली जोरदार थप्पड आहे
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने महाड सत्याग्रह दिनाचे स्मरण करण्यात आले
या वेळी सोमनाथ म्हस्के गौतम बनसोडे, सुजल चंदन शिव राजू रोकडे गोपीनाथ ताते आदी उपस्थित होते