नवीदिल्लीः सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसे आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. म...
नवीदिल्लीः सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसे आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे वर्ग करून घेण्याची मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, की ही केस क्राईम ब्रँचकडे घेण्याचे कारण नव्हते. बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो; सर्व हायप्रोफाईल केसेस याच शाखेकडे जात होत्या. पोलिस आयुक्तानंतर कोणाचा वट किंवा कद होता तो सचिन वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांच्या जवळ, गृहमंत्र्यांच्या जवळ किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. वाझे यांना वसुली अधिकार्याच्या रुपात बसवण्यात आले. मुंबईत डान्सबार सुरू ठेवण्यात सूट आणि सर्वाचे इन्चार्ज वाझे होते. मनसुख हिरेन यांना वाझे पहिल्यापासून ओळखत होते. स्कॉर्पिओ त्यांनी हिरेन यांच्याकडून घेतली; पण पैसे दिले नाहीत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात त्यांच्याकडे होती. हिरेन यांनी वाझे यांच्याकडे पैसे मागितले होते. पैसे द्या नाही तर गाडी परत द्या, असे सांगितले होते. काही दिवस गाडी वापरुन वाझे यांनी ती परत केली. स्कॉर्पिओ गाडी चोरी झाली असती, तर काहीतरी टेम्परिंग वगैरे झाले असते. म्हणजे मनसुख यांना हे सांगितले होते, गाडी तिथे लाव आणि चावी आणून दे.. ही चावी वाझे यांनी घेतली. त्यांना सांगितले, उद्या जाऊन तुम्ही तक्रार दाखल करा, पोलिस चोरी झाल्याची. कुर्ला पोलिसात तक्रार दाखल केली. तिथल्या ड्युटी ऑफिसरला वाझे यांनी फोन करून गुन्हा दाखल करायला लावला, असे आरोप फडणवीस यांनी केले. मनसुख यांना वकिलामार्फत पत्र लिहून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवले. त्यात वाझे यांनी स्वत:चेही नाव लिहिले. ज्या दिवशी मनसुख यांना रात्री फोन आला. गावडे यांनी तुम्हाला बोलावले आहे. हा तोच एरिया जिथे वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. हिरेन यांना तिथेच मारुन, मृतदेह खाडीत फेकला. भरतीमुळे त्यांचा मृतदेह बाहेर आला. अन्यथा, तो बाहेर आला नसता.शवविच्छेदनात बर्याच गोष्टी आहेत. इतके रुमाल तोंडात कसे होते, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. एटीएसने या प्रकरणावर तपास केंद्रीत करायला हवा होता; परंतु तसा तो केला नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. एटीएसने आधी अटक करुन त्यांना एनआयएकडे ताब्यात द्यायला हवे होते. कारण ही दोन्ही एकमेकांशी संलग्न प्रकरणे आहेत. त्यामुळे एटीएसकडे जे प्रकरण आहे, ते एनआयएने टेकओव्हर करावे. माझा एटीएसवर अविश्वास आहे असे नाही; मात्र त्यांच्याकडून आवश्यक कारवाई होत नाही. त्यांच्यावर दबाव असावा, असे ते म्हणाले.