$type=ticker$snippet=hide$cate=0

परमवीर सिंह यांच्या पत्राचं टायमिंग

राज्यात सरकार बदललं, की सरकारमधील नेत्यांना हवे ते अधिकारी हव्या त्या ठिकाणी घेतले जातात. विश्‍वासू अधिकारी ओळखता आले नाही, की काय होतं, याच...



राज्यात सरकार बदललं, की सरकारमधील नेत्यांना हवे ते अधिकारी हव्या त्या ठिकाणी घेतले जातात. विश्‍वासू अधिकारी ओळखता आले नाही, की काय होतं, याचा अनुभव सध्या राज्य सरकार घेतं आहे. गेल्या काही वर्षांत सरकारमध्ये उजव्या विचारांच्या अधिकार्‍यांची संख्या वाढली आहे. हे अधिकारी संधी मिळाली, की आपल्या विचारधारेला अनुकूल असं वागून सरकारची कोंडी करतात, हे परमबीर सिंह यांच्या प्रकरणानं स्पष्ट झालं आहे.

भाजप-शिवसेनेचं सरकार जाऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हवे ते अधिकारी उच्चपदावर नेमले. अजूनही संघ विचारधारेचे अनेक अधिकारी प्रशासनात आहेत. त्यांना खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूर करायला हवं होतं; परंतु फडणवीस यांनी ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्याच अधिकार्‍यांना ठाकरे यांनी जवळ केलं. हे अधिकारी मग सरकारमधील बारीकसारीक माहिती फडणवीस यांना देत राहिले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात ना मुख्यमंत्र्यांना यश आलं ना गृहमंत्रालयाला. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन भरलेली गा़डी ठेवण्याच्या घटनेला आता एक महिना पूर्ण होत आहे. त्यानंतर घडलेल्या घटनांवर एक रंजक मसालेदार चित्रपट होऊ शकेल, एवढी कथानकं, उपकथानकं त्यात घडली. विधानसभेत फडणवीस अगदी शेरलॉक होम्ससारखं वागले. सचिन वाझे यांचं कॉल डिटेल्स त्यांना मिळतात, यावरून पोलिसांत कुणी घरभेदी होता, हे स्पष्ट होतं. ते ही दुसरं तिसरं कुणी नाही, तर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह. त्यांच्याच कार्यालयात स्फोटकं ठेवण्याचा कट होतो. वाझे यांच्यानंतर त्यांचंही नाव येऊ शकतं, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. भाजपचे नेते दत्ता मेघे यांचे व्याही असलेले परमबीर सिंह दिल्लीत जातात. त्याअगोदर फडणवीस दिल्ली वारी करतात. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये टार्गेट दिल्याचा आरोप होतो. शरद पवार म्हणतात, त्याप्रमाणं पत्राचं टायमिंग हे विचार करायला लावणारं आहे. आता पत्र लिहिणं, फेब्रुवारीत शंभर कोटींचं टार्गेट दिल्याचं सांगणं आणि जानेवारीत पोलिस आयुक्तालयात स्फोटकं ठेवण्याचा कट शिजणं हे सर्व पाहिलं, तर त्यात नक्कीच शंका घ्यायला वाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडं अंबानी यांच्या घरासमोरील गाडी प्रकरणाचा तपास असताना या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडं होता. हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं सोपविण्याचा निर्णय झाला असतानाच दहशतवादविरोधी पथकानं मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे पोलिस महासंचालक शिवदीप लांडे यांनी दिली आहे. अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण एटीएस पोलिस फोर्समधील सहकार्‍यांना सॅल्यूट करतो. ही केस माझ्या संपूर्ण पोलिस करिअरमधील सर्वांत जटील केसमधील एक आहे, असं लांडे यांनी म्हटलं आहे. हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं दोन आरोपींना अटक केली आहे. त्यात एक बुकी आणि एका माजी पोलिस कर्मचार्‍याचा समावेश आहे. नरेश धरे असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे, तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल आहे. शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. एनकाऊंटरफेम प्रदीप शर्मा यांच्या पथकात तो होता. त्याचे सचिन वाझे यांच्यांशी संबंध आहेत. शर्मा आणि शिंदे या दोघांनाही न्यायालयानंच शिक्षा दिली होती. त्यांचे परमबीर सिंह यांच्यांशीही सलोख्याचे संबंध होते आणि त्यांनी पोलिस आयुक्तालयात बसूनच अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन भरलेली गाडी ठेवण्याची योजना आखली, असं आता एटीएस आणि एनआयए या दोन्ही संस्थांच्या तपासात पुढं आलं आहे. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता एका निलंबित पोलिस अधिकार्‍यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र पाठवून नवा लेटरबॉम्ब टाकला आहे. चुकीचे आदेश देऊन आपल्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाब गावदेवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला; मात्र डांगे यांचंच निलंबन करण्यात आलं. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आणि मोक्का कायदा अंतर्गत शिक्षा झालेल्या आरोपीसोबत सिंग यांचे कसे घरोब्याचे संबंध आहेत, याची माहिती आता डांगे यांनी दिली आहे. आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी सिंह यांच्याविरोधात तेच हत्यार वापरलं असून अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्याविरोधात केलेल्या चौकशी प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परमबीर सिंग हे या प्रकरणातील नाहक बळी आहेत, की निर्दोष, की अपयशी, की मूक संमती असलेले होते, की लाभार्थी, की गुन्हेगार? की कळसूत्री बाहुली पूर्ण तपासांती समजेल. आपल्या एका कनिष्ठ अधिकार्‍याला आपल्या हद्दीतून पैसे गोळा करायला सांगितलं, हे समजल्यावर आयुक्त काय करू शकतो? स्पष्ट तोंडी नकार देवू शकता. लेखी पत्र देवून नकार कळवू शकतो.मंत्री व अधिकार्‍यांना दिलेल्या सूचनांची लेखी नोंद कोणत्याही एका अगर सर्वच पोलिस ठाण्याच्या डायरीमध्ये करू शकतो. कारण पोलिस ठाण्यातील नोंद हा एकमेव पुरावा अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ग्राह्य धरला जातो. ताब्यातील अधिकार्‍यांना परस्पर बोलविण्याचा आणि तपासाबाबत वाजवी कायदेशीर सूचना देण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना असतो. मंत्र्यांनी दिलेल्या सूचना तपासी अंमलदारांवर बंधनकारक नसल्या तरी तपासी अंमलदार त्या सूचनांची नोंद केस डायरीमध्ये करणं बंधनकारक असतं. केस डायरीतील नोंद याला पुराव्याच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. गृहमंत्र्यानी केलेल्या हस्तक्षेपाच्या नोंदी परमबीर सिंग यांनी केलेल्या आहेत का? मोहन डेलकरांचा गुन्हा मुंबईत दाखल न करण्याचा परमबीर यांचा युक्तिवाद हा घटनाबाह्य आणि पोरकट आहे. आत्महत्येचा गुन्हा मुंबईत घडला म्हणजे गुन्हा मुंबईतच दाखल झाला पाहिजे हे गृहमंत्र्याचं म्हणणं योग्य आहे.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10901,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17561,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14883,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: परमवीर सिंह यांच्या पत्राचं टायमिंग
परमवीर सिंह यांच्या पत्राचं टायमिंग
https://1.bp.blogspot.com/-lZjW9f6hy80/YFhXjtettmI/AAAAAAABpKA/yUHKk04NYnQIcw7JkwjqeyVIdC8Rk_wGQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-lZjW9f6hy80/YFhXjtettmI/AAAAAAABpKA/yUHKk04NYnQIcw7JkwjqeyVIdC8Rk_wGQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_859.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_859.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content