नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित आसाम आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होत असताना पंतप्रधा...
नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित आसाम आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाचे आणि सूचक विधान केले. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शनिवार-रविवारी मी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये असेन. 20 मार्चला आसाम येथे छाबुआ आणि पश्चिम बंगालच्या खडकपूर येथे जाहीर सभांना संबोधित करील. माझ्या भाषणात भारतीय जनता पक्षाच्या विकास कार्यक्रमांचा उल्लेख करील. हे स्पष्ट आहे की, दोन्ही राज्यांना आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडायचे आहे.