पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुण्यातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या म...
पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुण्यातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या मार्च महिन्यात घटली आहे. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दैनंदिन सरासरी १३ हजार प्रवासी ये-जा करत होते. मात्र, आता मार्चमध्ये ही संख्या आठ हजारापर्यंत खाली आली आहे.
अनलॉकमध्ये देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. तेव्हा प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यांनतर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. डिसेंबर अखेरपर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या दहा हजारांवर पोहोचली होती. त्यांनतर त्यात आणखी तीन हजारांची वाढ झाली होती. लॉकडाउनपूर्वी लोहगाव विमानतळाहून दिवसाला सरासरी १८० उड्डाणे होत होती. त्यातून सरासरी २५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. सध्या अर्धा वेळ उड्डाणे बंद असल्याने दिवसाला केवळ ८० उड्डाणे होत असून, १३ हजार प्रवासी प्रवास करीत होते. म्हणजेच, लोहगाव विमानतळाची वाहतूक पूर्ववत झाली होती. मात्र, करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रवासी संख्येत पुन्हा घट झाली आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.