इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या तरूणीने शनिवारी सकाळी राहत्या घरी साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. आ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या तरूणीने शनिवारी सकाळी राहत्या घरी साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
कु. अंकिता धनंजय कांबळे (वय 23, रा. डांगे कॉलेज बस थांब्याजवळ, रावळ कॉलनी, आष्टा, मुळ गाव बिळाशी, ता. शिराळा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. अंकिता हिचे आई-वडील मुंबईत असतात. लहानपणापासूनच ती मामा भानुदास कांबळे यांच्याकडे आहे. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.