$type=ticker$snippet=hide$cate=0

जिल्हा बँकेची जबाबदारी शेळके-मुरकुटेंवर? ; आजच्या बैठकीत आधी निर्णय व मग बँकेत होणार निवड

अहमदनगर- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नूतन अध्यक्षपदी पारनेरचे युवा नेते व महानगर बँकेचे सर्वेसर्वा उदय शेळके यांची निवड जवळपास निश्‍चित म...

अहमदनगर- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नूतन अध्यक्षपदी पारनेरचे युवा नेते व महानगर बँकेचे सर्वेसर्वा उदय शेळके यांची निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. तसेच उपाध्यक्षपदी श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांचे नाव आघाडीवर आहे. बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला असे वाटप झाले तर मग मुरकुटेंऐवजी संगमनेरचे माधवराव कानवडे यांची वर्णी उपाध्यक्षपदी लागू शकते. अर्थात शुक्रवारी सायंकाळचे हे नियोजन होते व शनिवारी (6 मार्च) सकाळी 11 वाजता होणार्‍या बैठकीतील अंतिम चर्चेत दोन्ही पदांबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात नेते मंडळी इमारतींच्या पायर्‍या चढताना वा लिफ्टमध्ये असतानाही ठरलेली नावे बदलून ऐनवेळी दुसरेच पदाधिकारी खुर्चीवर विराजमान झाल्याचाही इतिहास आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी 1 वाजता होणार्‍या निवडणुकीतील अंतिम निवडीपर्यंत काहीही घडू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 


अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांची नुकतीच निवडणूक झाली आहे. या पैकी 17 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या व फक्त 4 जागांची निवडणूक झाली. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था, पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था, कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था व बिगर शेती संस्था मतदार संघ अशा चार जागांच्या निवडणुकीनंतर आता शनिवारी (6 मार्च) दुपारी 1 वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्यात नव्या पदाधिकार्‍यांची निवड होणार आहे.


चर्चेत राहिले सगळेच

जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे घटक पक्ष एकत्रित उतरले होते. भाजपचे 7जण जरी या निवडणुकीत निवडून आले असले तरी दोन्ही काँग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँक निवडणुकीत राबवलेल्या सहमती एक्सप्रेसमध्ये भाजपचे तब्बल 5 संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे बँकेच्या आता पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्याच्या कुकडी कारखान्याचे प्रमुख माजी आमदार राहुल जगताप व पारनेरचे उदय शेळके यांची नावे चर्चेत होती. यापेक्षाही वेगळे नाव चर्चेत येऊ शकते, असाही मतप्रवाह होता. त्यामुळे राहुरीचे अरुण तनपुरे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे किंवा मग अकोल्याचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांचीही वर्णी लागू शकते, असे बोलले जात होते. राष्ट्रवादीला अध्यक्षपद व काँग्रेसला उपाध्यक्षपद असे वाटप झाल्याचे मानले जात असले तरी अजून तरी त्यावरही शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीने दोन्ही पदांसाठी आपली नावे जवळपास निश्‍चित केल्याचे समजते.


केवळ आर्थिक शिस्तीसाठी

जिल्हा बँकेच्या मागील सत्ताकाळात बँकेची आर्थिक स्थिती काहीशी बिघडल्याचे बोलले जात आहे. अर्थात दुष्काळ, अतिवृष्टी, करोना व अन्य काही कारणाने बँकेसमोर काही अडचणी आल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच बँकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावण्याच्यादृष्टीने 4 हजार कोटींची महानगर बँक चालवणारे उदय शेळके व चार्टर्ड अकौंटंट असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या खांद्यावर बँकेची धुरा देण्याचे घाटत आहे. उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले तर मग मुरकुटेंऐवजी संगमनेरचे कानवडे यांचे पारडे जड मानले जात आहे.


आज सकाळी होणार बैठक

जिल्हा बँकेचे नवे पदाधिकारी निवडण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता लालटाकीजवळील जिल्हा परिषद वसाहतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या बंगल्यावर जिल्ह्यातील नेतेमंडळींची तसेच निवडून आलेल्या सदस्यांची बैठक होणार असून तेथे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख यांच्या आदेशानुसार नव्या पदाधिकार्‍यांची नावे निश्‍चित करून बँकेच्या सभागृहात होणार्‍या निवडणूक सभेत त्यावर शिक्का मोर्तब केले जाणार आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जिल्हा बँकेची जबाबदारी शेळके-मुरकुटेंवर? ; आजच्या बैठकीत आधी निर्णय व मग बँकेत होणार निवड
जिल्हा बँकेची जबाबदारी शेळके-मुरकुटेंवर? ; आजच्या बैठकीत आधी निर्णय व मग बँकेत होणार निवड
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1103x827/adcc-bank533_202007450769.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_913.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_913.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content