$type=ticker$snippet=hide$cate=0

वाझे यांचा सहकारीच होणार माफीचा साक्षीदार ; आणखी काही अधिकार्‍याच्या चौकशीची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे ...

मुंबई/प्रतिनिधी: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


    काझी हे वाझे यांचे गुप्तवार्ता विभागातील निकटचे सहकारी होते. वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, वाझे यांच्या सांगण्यावरून काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करून आणल्या होत्या. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास वाझे यांच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश होणार आहे. वाझे यांना ताब्यात घेतल्यावर एनआयएने लगेच काझी यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यांना सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात आले. या तिन्ही दिवशी त्यांची जवळपास दहा तास चौकशी झाली. आतापर्यंतच्या चौकशीत काझी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये वाझे यांच्या सांगण्यावरून केलेल्या गोष्टींची कबुली त्यांनी दिली आहे. हा सगळा घटनाक्रमक पाहता याप्रकरणात काझी माफीचे साक्षीदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे वाझे यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणी आता आणखी एका पोलिस अधिकार्‍याला अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाझे यांच्यासोबत मिळून हा सर्व गुंतागुतीचा कट याच अधिकार्‍याने रचला आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याची जबाबदारीदेखील याच अधिकार्‍यावर असल्याचे समजते. सध्या हा अधिकारी एनआयएच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. वाझे यांच्या अटकेनंतर हा पोलिस अधिकारीदेखील महत्त्वाचा मानला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या पोलिस अधिकार्‍याने स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणी अनेक पुरावे नष्ट केले आहेत. तसेच तपासात अनेक महत्त्वाच्या साक्षीदेखील त्याने नोंदवल्या नाहीत. अनेक साक्षीदारांना धमकावून घडलेल्या घटनेच्या विरुद्ध साक्षी द्यायला भाग पाडल्याचा संशय एनआयएच्या अधिकार्‍यांना आहे. जिलेटिनच्या कांड्या आणण्यातदेखील याचा महत्वाचा सहभाग होता. धमकीचे पत्र लिहिण्याचे डोकेदेखील याच पोलिसाने लढवले आहे. गाड्यांचे नंबर प्लेट बोगस बनवणे तसेच या नंबर प्लेट ज्यांनी बनवलेल्या आहेत, त्यांचे सर्व रेकॉर्ड सीसीटीव्ही ताब्यात घेऊन मिटवणे ते कामदेखील यानेच केल्याचा एनआयएला संशय आहे. मनसुख हिरेन यांच्या गायब होण्यामागेदेखील याच व्यक्तीचा हात आहे, असे देखील म्हटले जाते आहे. त्यामुळे एनआयएने ताब्यात घेतलेल्या या पोलिसांमुळे मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कटदेखील उघडकीस येऊ शकतो, असा विश्‍वास एनआयएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वाझे यांचा सहकारीच होणार माफीचा साक्षीदार ; आणखी काही अधिकार्‍याच्या चौकशीची शक्यता
वाझे यांचा सहकारीच होणार माफीचा साक्षीदार ; आणखी काही अधिकार्‍याच्या चौकशीची शक्यता
https://images.outlookindia.com/public/uploads/articles/2021/3/15/Untitled_design_570_850.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_914.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_914.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content