$type=ticker$snippet=hide$cate=0

अनिल देशमुखांवर पवार नाराज ; गृहमंत्रिपद जाणार; राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी?

  मुंबई/प्रतिनिधी: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे य...

 




मुंबई/प्रतिनिधी: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. आता देशमुख यांच्याऐवजी हे संवेदनशील पद राजेश टोपे यांच्याकडे दिले जाण्याची चर्चा सुरू आहे.

पवार यांनी मागील काही दिवसांत राज्यातील काही आयपीएस अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. दिल्लीतील पवार यांच्या निवासस्थानी राज्याचे देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबते सुरू होती. पवार यांनी त्यांना त्यासाठी बोलवून घेतले होते. त्यानंतर देशमुख म्हणाले, की विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी पवार यांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी पवार यांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल. ही चर्चा करताना मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके सापडली होती, त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रिपदातील बदल तसेच अन्य बाबतीत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला असला, तरी पवार मात्र होळीनंतर खांदेपालट करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडीही करण्यात आली असली, तरी हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नसून आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा सुरू झाली आहे. पोलिस यंत्रणेच्या गलथान कारभाराबाबत यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असली, तरी शरद पवार मात्र धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. आता या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याचे समजते. टोपे यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे राज्यभरातून कौतुक करण्यात आले. 


टोपे यांच्या प्रतिमेचा विचार

गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. पवार यांनी टोपे यांना दिल्लीतही बोलावून घेतल्याची माहिती आहे. पवार यांचे स्नेही अंकुशराव टोपे यांच्या मुलाला राजकारणात चांगली संधी देऊन पक्षाचेही हीत पाहण्याचा विचार पवार करीत आहेत, असे सांगितले जाते.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1636,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अनिल देशमुखांवर पवार नाराज ; गृहमंत्रिपद जाणार; राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी?
अनिल देशमुखांवर पवार नाराज ; गृहमंत्रिपद जाणार; राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी?
https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/19/8de6bac4848408687bf295f7e23a8ff3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_930.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_930.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content