$type=ticker$snippet=hide$cate=0

कृषीशास्त्रज्ञांची वाणवा

जगात वैज्ञानिक संशोधनात भारताचं स्थान फारसं समाधानकारक नाही. जी मूलभूत विज्ञानाची स्थिती, तीच शेतीतील विज्ञानाची. एकीकडं शेतकर्‍यांचं उत्पन्...


जगात वैज्ञानिक संशोधनात भारताचं स्थान फारसं समाधानकारक नाही. जी मूलभूत विज्ञानाची स्थिती, तीच शेतीतील विज्ञानाची. एकीकडं शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करायची भाषा करायची आणि ते करण्यासाठी जे करावं लागतं, त्याकडं मात्र पाठ फिरवायची, ही सध्याच्या सरकारची कार्यपद्धती आहे. कृषीशास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची पदं वर्षानुवर्षे भरली जात नसतील, तर शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार, हे सरकारच जाणो. कोरोनाच्या काळात अन्य सर्वंच क्षेत्रांनी नकारात्मक वाढ नोंदविली असताना शेती या एकमेव क्षेत्रानं चांगली वाढ नोंदविली. 


    टाळेबंदीचा फटका सर्वंच क्षेत्रांना बसला. एरवी कामासाठी गावं सो़डून शहराकडं धाव घेणार्‍यांनी कोरोनाच्या काळात मात्र गावांकडं धाव घेतली. त्यांना शेती आणि शेतकर्‍यांनीच आधार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा वारंवार करते; परंतु गेल्या सात वर्षांत शेतकर्‍यांचं उत्पन्न किती हेच सरकारला ठरविता आलं नाही, तर कधीचं उत्पन्न गृहीत धरणार आणि त्यानंतर दुप्पट म्हणजे किती उत्पन्न धरणार, याचं उत्तर मिळत नाही. शेतीप्रधान असलेल्या या देशांत शेतीकडंच सर्वाधिक दुर्लक्ष होतं. शेतीतील भांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि शेती प्रक्रिया उद्योग आदींकडं सरकारनं द्यायला हवं, तेवढं लक्ष दिलेलं नाही. जगातील अन्य देशांत शेतीसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारांत अनुदान दिलं जातं. भारतात मात्र शरद जोशी म्हणतात, त्याप्रमाणं शेतीला उणे अनुदान आहे; मात्र शेतीसाठी काही केलं, की लगेच अर्थशास्त्रीय दृष्टिकोन पुढं केला जातो. फ्रान्ससारख्या देशांत शेतीमालावर प्रक्रिया करण्याचं प्रमाण 47 टक्के आहे. भारतात मात्र ते चार टक्के आहे. शेतीमालाचं मूल्यवर्धन झाल्याशिवाय उत्पन्न दुप्पट होणार नाही; परंतु व्हॅल्यू अ‍ॅडिशनासाठी काहीही केलं जात नाही. शेतीवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष 59 टक्के लोक अवलंबून असतील, तर शेतीकडं किती गांभीर्यानं पाहायला हवं, हे लक्षात येतं. शेतीत जसे शेतकर्‍यांचं योगदान आहे, तसंच ते कृषीशास्त्रज्ञांचंही आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. बदलत्या हवामानाचा विचार करून त्यात येऊ शकणारी पिकं घेता यायला हवीत. त्यासाठी तसं संशोधन खासगी आणि सरकारी पातळीवर व्हायला हवं; परंतु त्याकडं म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही. सरकार दरबारी म्हणायला शेती हा प्राधान्याचा विषय आहे; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी पातळीवर मात्र त्याचा सर्वांत शेवटी क्रमांक लागतो.

देशात हरितक्रांती करण्यात शास्त्रज्ञांचं मोठं योगदान आहे. कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनामुळे शेती करणं आणखी सोपं झालं आहे. बियाणांपासून बाजारापर्यंतची व्यवस्था शास्त्रज्ञांशिवाय अधुरी आहे; परंतु सध्याच्या घडीला भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची तीन हजार 815 पदं रिक्त आहेत. कृषी शास्त्रज्ञाची 22.83 टक्के पदं तर तांत्रिक कर्मचार्‍यांची 34 टक्के पदं भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीवर संशोधन करणार्‍या लोकांची मोठी कमतरता आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे, की शास्त्रज्ञाशिवाय शेतीची प्रगती शक्य नाही. आयसीएआर ही शेतीसंबंधी संशोधन करणारी सर्वांत मोठी संस्था आहे. भारत शेतीमालाची आयात करणारा देश होता आणि तो आयात निर्यातदार झाला असला, तरी तेवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. जगातील अनेक देशांतील एकरी उत्पादकता भारताच्या एकरी उत्पादकतेपेक्षा कितीतरी अधिक आहे. भारतात त्यासाठी मोठं संशोधन होण्याची गरज आहे. एकरी जादा उत्पादन देणार्‍या संकरित वाणांचा शोध लावायला हवा. कृषी शास्त्रज्ञ  हे ते काम करीत असतात. त्यांच्या नियुक्तीस केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असेल, तर ती अक्षम्य चूक आहे, असं म्हटलं तर ते वावगं नाही. देशभर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेशी संबंधित 103 संशोधन केंद्रं आहेत. त्यामध्ये सहा हजार 586 कृषी शास्त्रज्ञ असले पाहिजेत; परंतु केवळ पाच हजार 82 लोक या केंद्रांची जबाबदारी सांभाळत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण एक हजार 504 पदं रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त असल्यामुळं सध्या जे शास्त्रज्ञ काम करीत आहेत, त्यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीत जेवढं योगदान शास्त्रज्ञांचं असतं, तेवढंच ते तांत्रिक कर्मचार्‍यांचंही असतं. आयसीएआरमध्ये तांत्रिक कर्मचार्‍यांची कमतरता शास्त्रज्ञांपेक्षा खूपच जास्त आहे. तांत्रिक संवर्गातील एकूण सहा हजार 756 पदं मंजूर आहेत. त्यापैकी दोन हजार 311 (34.20 टक्के) पदं रिक्त आहेत. म्हणजेच केवळ चार हजार 445 लोक तांत्रिक कामाची जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले, की पदे रिक्त होणं व त्याजागी भरती करणं ही एक सतत प्रक्रिया आहे. पद रिक्त असतं, तेव्हा ते पद भरण्यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करते. कृषी शात्रज्ञ भरती मंडळ हे काम करतं. रिक्त पदावर पात्र उमेदवार उपलब्ध होईल, यादृष्टीनं परिषद लक्ष देऊन असते. तोमर यांच्या मते, संस्थांच्या प्राधान्यक्रमातील संशोधन कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये, याकडं आयसीएआरनं गांभीर्यानं लक्ष ठेवलं आहे. राष्ट्रीय गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूनं संशोधन कार्यास प्राधान्य देण्यासाठी आयसीएआरमध्ये मानवी संसाधनांच्या चांगल्या तैनातीसह प्रभावी पावलं उचलली गेली आहेत. त्यांचं हे म्हणणं पाहिले, तर कृषी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या भरतीबाबत ते स्पष्ट काहीही बोलत नाही. ही पदं कधी भरली जातील, याबाबत त्यांनी अवाक्षर काढलं नाही. शास्त्रज्ञांच्या मंडळावर खापर फोडून ते मोकळे झाले. आयसीएआरमध्ये शास्रज्ञ होण्यासाठी पूर्वी एमटेक आणि एमएससी ही किमान पात्रता होती. म्हणजेच किमान पात्रता संबंधित विषयात मास्टर डिग्री होती. ही किमान पात्रता पीएच. डी.पर्यंत वाढवाण्यात आली आहे. या निर्णयानंतर शास्त्रज्ञांची रिक्त पदं भरणं सोपं राहिलं नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.


Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृषीशास्त्रज्ञांची वाणवा
कृषीशास्त्रज्ञांची वाणवा
https://1.bp.blogspot.com/-N3OT6Wp1t3s/YFXtsszwO5I/AAAAAAABpG8/mSo91YRWe3Mf0Ps-3EHFTbT3vV_ZEQhwwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-N3OT6Wp1t3s/YFXtsszwO5I/AAAAAAABpG8/mSo91YRWe3Mf0Ps-3EHFTbT3vV_ZEQhwwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_931.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_931.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content