$type=ticker$snippet=hide$cate=0

पूजा चव्हाण प्रकरणातील दोन्ही दावे फेटाळले ; भाजपच्या नगरसेवकाला लॅपटॉपप्रकरणी नोटीस

पुणे/प्रतिनिधी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात भाजप वकील आघाडी आणि लीगल जस्टीस सोसायटीतर्फे दाखल झालेले दोन्ही अर्ज फेटाळण्...


पुणे/प्रतिनिधी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात भाजप वकील आघाडी आणि लीगल जस्टीस सोसायटीतर्फे दाखल झालेले दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. अर्ज मंजूर करण्यासंबंधीचे कोणतेही अधिकार मला नाहीत. पोलिसांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे असे सांगत न्यायाधीश रोहिणी पाटील यांनी अर्ज फेटाळले. दरम्यान, पूजा चव्हाणप्रकरणात आता भाजपच्या नगसेवकाचे नाव अधिकृतरीत्या पुढे आले असून पूजाचा लॅपटॉप जमा करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. 

पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी करावी आणि त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजप वकील आघाडीने न्यायालयात धाव घेतली होती.  या प्रकरणात राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. वानवडी पोलिसांनी तपास सुरू करावा आणि तक्रार दाखल करावी यासाठी 156 (3) या कलमाखाली भाजप वकील आघाडीतर्फे लष्कर कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वी लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अ‍ॅड. भक्ती पांढरे यांनीदेखील लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दोन्हीही अर्जांमध्ये कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नव्हते; मात्र हे दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. आम्ही हा अर्ज फेरविचारासाठी सत्र न्यायालयात दाखल करणार आहोत, असे अ‍ॅड. ईशानी जोशी यांनी सांगितले. लष्कर न्यायालयाने दोन्ही अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना आमचा तपास योग्य दिशेने चालला असल्याचे पटले आहे, असे उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी आता भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चव्हाण आणि राठोड यांच्यातील संभाषणाच्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. पूजाचा लॅपटॉप घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी धनराज घोगरे यांनी नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी या नोटिशीतून केली आहे.

ऑडिओ क्लीप बाहेर कशा आल्या?

या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या, याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या वेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचे समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. अखेर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच नोटिशीमध्ये भाजपच्या नगरसेवकाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहेत.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पूजा चव्हाण प्रकरणातील दोन्ही दावे फेटाळले ; भाजपच्या नगरसेवकाला लॅपटॉपप्रकरणी नोटीस
पूजा चव्हाण प्रकरणातील दोन्ही दावे फेटाळले ; भाजपच्या नगरसेवकाला लॅपटॉपप्रकरणी नोटीस
https://images.thequint.com/thequint%2F2021-02%2F24430212-6068-4ed3-8ccd-a2cabbba990f%2FUntitled_design___2021_02_16T120046_375.jpg?rect=0%2C0%2C1920%2C1080&auto=format%2Ccompress&fmt=webp&w=480&dpr=2.6
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_935.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_935.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content