$type=ticker$snippet=hide$cate=0

मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील : जयंत पाटील

मुंबई : मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान...

मुंबई : मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सदस्य अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील बोलत होते. 


उच्च न्यायालयाच्या २३ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या निर्णयामध्ये समन्वय समितीच्या ऑगस्ट २००१ च्या अहवालानुसार तापी व गोदावरी खोऱ्यात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणे बाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार २३ प्रवाही वळण योजनांबाबत एका वर्षाच्या आत कार्यवाही करणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार या २३ प्रवाही वळण योजनांपैकी १२ प्रवाही वळण योजनांची कामे भौतिकदृष्टया पुर्ण झालेली असून याद्वारे १२.६६३ दशलक्ष घनमीटर (०.४४७ अघफु) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येत आहे. ५ योजनांची कामे बांधकामाधीन आहेत. एका योजनेचे काम अद्याप भूसंपादनाच्या अडचणीमुळे सुरु झालेले नाही. उर्वरीत ५ योजनांना मान्यता देणेबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. गोदावरी खो-यातील दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी व गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणामधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना शासनाच्या सुधारीत निर्णयानुसार तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये उल्हास, वैतरणा, नारपार व दमणगंगा उपखोऱ्यातून १६८ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होणे अपेक्षित होते, असे पाटील यांनी सांगितले. पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाडयात वळविणेसाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करणेसाठी कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने त्यांचा अहवाल ३१/१०/२०१९. रोजी शासनास सादर केला आहे. त्यानुसार गोदावरी खोऱ्यात कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण ८९.८५ अब्ज घन फूट पाणी वळविणेबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे. उपरोक्त पैकी २.४३ अब्ज घन फूट पाणी वळणाच्या पूर्ण / बांधकामाधीन योजना आहेत. १५.५५ अब्ज घन फूट पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून एकदरे - गोदावरी या दोन नदीजोड प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मार्फत तयार करण्यात येत आहे. ६१.८८ अब्ज घन फूट पाणी वळणाबाबतच्या योजनांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे या कामाच्या अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता देणेबाबत कार्यवाही प्रगतीपथावर आहे. या नदीजोड योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभक्षेत्र निश्चिती व त्यानुषंगाने पाणी वापर निश्चित करणे शक्य होईल. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विनायक मेटे, अमरनाथ राजूरकर, सुरेश धस आदींनी सहभाग घेतला.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील : जयंत पाटील
मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील : जयंत पाटील
https://punemirror.indiatimes.com/thumb/msid-79373668,width-1200,height-900,resizemode-4/.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_963.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_963.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content