पुणे/प्रतिनिधीः सरकार मनसुख हिरेन, सचिन वाझे ही प्रकरणे दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पोलिसही आघाडीच्या दबावाखाली आले आहेत. र...
पुणे/प्रतिनिधीः सरकार मनसुख हिरेन, सचिन वाझे ही प्रकरणे दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पोलिसही आघाडीच्या दबावाखाली आले आहेत. राज्य चालवणे आता सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. आम्ही तमाशा बघायला जमलो; पण साक्षात सिनेमातला प्रसंग घडत आहे. या सरकारने राज्याचा तमाशा करून टाकला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, की मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला, त्याच ठिकाणी दुसरा मृतदेह सापडला. एवढी मोठी घटना हे सरकार दाबून टाकत आहे, ही लज्जास्पद बाब आहे. वाझे यांनी दरमहा 100 कोटी जमवून द्यावेत, असे देशमुख यांनी त्यांना सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. वाझे अजून काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे खरे असण्याची शक्यता आहे, याची खोल चौकशी होत नाही. सरकारमध्ये सगळी घोटाळेबाजी चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे यांना अडचणीत आणत आहे. त्याामुळे अशा प्रकरणाची मुख्यमंत्री सखोल चौकशी करत नाहीत, अशी टीका करून राज्यपाल जर तत्वनिष्ठ असतील, तर राज्यपाल राष्ट्रपतींना माहिती देतील. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.