$type=ticker$snippet=hide$cate=0

मैं क्या यहा दहेज लेने आया हूँ... ; बिजयकुमार यांनी जलयुक्त शिवारमध्ये कृषी विभागाला धरले धारेवर

अहमदनगर/प्रतिनिधीः भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खुल्या चौकशीसाठी आलेले समितीचे अध्यक्ष व सेवानिवृत्त ...

अहमदनगर/प्रतिनिधीः भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खुल्या चौकशीसाठी आलेले समितीचे अध्यक्ष व सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव बिजयकुमार यांनी कृषी विभागासह लघु पाटबंधारे विभाग तसेच अन्य संबंधित विभागांची जोरदार झाडाझडती घेतली. मै क्या यहा दहेेेजे लेने आया हूँ.... जो सून कर तुम रुठ जाओगे....और बजार जाओगे....ऐसा है क्या ...अशा संतप्त शब्दात त्यांनी कृषी विभागाला धारेवर धरले. 


जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, कागदपत्रे सापडत नाही, अधिक चौकशी केली तर सगळाच अनागोंदी कारभार दिसतो आहे, असे स्पष्ट करताना, आम्ही कोणाला दोषी ठरवायला आलेलो नाही. जर तुमचे डोळे उघडणार नसतील, तर हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला तर मग तुम्हाला लक्षात येईल, त्यामुळे तुम्ही चौकशी समितीला सहकार्य करा, अशी सूचना बिजयकुमार यांना वारंवार करावी लागली. नगर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांबाबत असलेल्या तक्रारींची खुली चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आली. या चौकशी समितीचे अध्यक्ष, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव बिजयकुमार यांच्यासह समिती सदस्य जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, समितीचे सदस्य सचिव असलेले मृद व जलसंधारण संचालक बी. एन. शिसोदे यांनी ही चौकशी केली. या वेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे कृषी उपसंचालक जांबुवंत घोडके, नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, आत्माचे कृषी उपसंचालक विलास नलगे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे आदी उपस्थित होते. या वेळी समितीने जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या विविध कामांची माहिती घेतली. सलग समतर चर, कंपार्टमेंट चर, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव, विहिर पुनर्भरण गॅब्रियन बंधारा, केटी वेअर दुरुस्ती अशा विविध कामांचे प्रकल्प आराखडे, पूर्तता आराखडे, थर्ड पार्टीइनस्पेक्शन जीपीएस फोटोसह अनुषंगिक माहिती घेतली. अधिकार्‍यांकडे अनेक कामांची योग्य माहिती नव्हती, तक्रारदारांनी केेलेल्या तक्रारींच्या प्रतीही नव्हत्या व या तक्रारीनुसार आवश्यक माहितीही नव्हती. त्यामुळे बिजयकुमार यांनी सर्वांना धारेवर धरले. प्रकल्प आराखड्यात नसलेली अनेक कामे केल्याचे दिसल्याने या कामांना कोणी मंजुरी दिली, त्याचा सुधारित आराखडा मंजूर आहे काय, असा सवाल त्यांनी केले. बहुतांश प्रश्‍नांवर अधिकारी निरुत्तर झाले. तक्रारदाराचे अर्ज तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही परस्पर कशी चौकशी केली व  अहवाल कसा पाठवला, अशी विचारणा त्यांनी केली. सर्व माहिती घेऊन चौकशीच्यावेळी सादर करण्याचे आदेश असताना तुम्ही माहिती घेऊन येत नसाल तर काय उपयोग? समितीने असा चौकशी अहवाल जर वर पाठवला व तुमची लाचलुचपत खात्याद्वारे चौकशी झाली तर काय असते ते कळून येईल, असा इशारा सुद्धा बिजयकुमार यांनी अधिकार्‍यांना दिला.



जिल्ह्याने हरताळ फासलाःभद्रे

जलयुक्त शिवार योजनेतील कामांबाबत तक्रारी करणारे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सुधीर भद्रे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या उद्देशाला नगर जिल्ह्याने हरताळ फासल्याचा आरोप केला. कोणत्याही शेतकर्‍याला या योजनेची माहिती दिली नाही. त्यांच्या सह्या घेतल्या नाहीत. परस्पर कामे झाल्याचे त्यांनी दाखवले आहे. ई-निविदा ज्यांना द्यायची होती, त्यांना न देता परस्पर दुसर्‍याला दिली, असा आरोप करून भद्रे यांनी बिजयकुमार यांना त्याची प्रत दिली. 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मैं क्या यहा दहेज लेने आया हूँ... ; बिजयकुमार यांनी जलयुक्त शिवारमध्ये कृषी विभागाला धरले धारेवर
मैं क्या यहा दहेज लेने आया हूँ... ; बिजयकुमार यांनी जलयुक्त शिवारमध्ये कृषी विभागाला धरले धारेवर
https://cdn.s3waas.gov.in/s306409663226af2f3114485aa4e0a23b4/uploads/2018/04/2018040652-1024x576.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_97.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_97.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content