$type=ticker$snippet=hide$cate=0

भाजपला चेकमेट

केंद्रीय सत्तेचा, पैशाचा वापर करून काही ठिकाणी आमदार विकत घेता आले, सत्ता उलथवून टाकण्यात यश आले, तरी प्रत्येक वेळी  ते साधतेच असे नाही. कधी...



केंद्रीय सत्तेचा, पैशाचा वापर करून काही ठिकाणी आमदार विकत घेता आले, सत्ता उलथवून टाकण्यात यश आले, तरी प्रत्येक वेळी  ते साधतेच असे नाही. कधी कधी फासे उलटेही पडू शकतात. भारतीय जनता पक्षाला तो अनुभव आता पुद्दुचेरीत यायला लागला आहे. मित्रपक्षाला बरोबर घ्यायचे, चंचुप्रवेश करायचा आणि नंतर मात्र मित्रपक्षालाच संपवायचे, ही भाजपनीती असते. ती नीती प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही.

 मित्रपक्षालाही भाजप आपला बळी घेतो, की काय अशी भीती जेव्हा वाटायला लागते, तेव्हा तेच मित्रपक्ष सावध खेळी करतात. शिवसेना, पीडीपी, अकाली दल, बिजू जनता दलासारखे प्रादेशिक पक्ष त्यातून सावध झाले. पुद्दुचेरीत केंद्रीय सत्तेचा वापर करून भाजपने तीन नियुक्त सदस्य विधानसभेत घुसविले. त्यानंतर काँग्रेस आणि द्रमुकचे आमदार फोडले. पुद्दुचेरीसारख्या छोट्या केंद्रसासित प्रदेशात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेतली. त्यांनी मावळते मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यावर टीका केली. पुद्दुचेरीत भाजपची सत्ता येईल, असा एका वाहिनीचा अंदाज आहे. दक्षिणेतील एक प्रदेश ताब्यात येण्याची चिन्हे दिसत असताना भाजपच्या प्रयत्नावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांनी थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असे रंगास्वामी यांनी म्हटले आहे. एनआर काँग्रेस थेट शिवसेनेच्याच भूमिकेत आल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा करून भाजपशी फारकत घेतली होती. भाजपने निवडणुकीत मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्‍वासन दिले होते, असे शिवसेनेने म्हटले होते, तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन दिले नसल्याचे भाजपने म्हटले होतं. याच गोष्टीचा फायदा घेत बिहारमध्ये नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपद संयुक्त जनता दलाकडेच राहणार असल्याचे भाजपकडून वदवून घेतले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर आता एनआर काँग्रेसनेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला असून भाजपकडून एनआर काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले जाईल याचे आश्‍वासन घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून एनआर काँग्रेसने थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी देऊन भाजपची कोंडी केली आहे.

पुद्दुचेरी विधानसभेच्या एकूण 30 जागा आहे. पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान होणार आहे. पुद्दुचेरी विधानसभेत एनआर काँग्रेसने मागच्यावेळी एआयएडीएमकेसोबत युती केली होती. या वेळी एनआर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या, तर एआयएडीएमकेला पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एआयएडीएमकेसोबत मिळून एनआर काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. रंगासामी हे मुख्यमंत्री झाले होते. 2001 ते 2008पर्यंत रंगासामी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. राज्यात एनआर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. एनआर काँग्रेसची राज्यावर पकड मजबूत आहे. त्यामुळे आघाडी किंवा युती करताना मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावे, असा रंगास्वामी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांनी युतीच्या चर्चेचे दरवाजे उघडे ठेवतानाच मुख्यमंत्रिपद एनआर काँग्रेसलाच देण्याची मागणी केली आहे. राज्यात भाजपला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नव्हती. त्यामुळे भाजपसोबत युती केल्यास या युतीचा भाजपलाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा होऊ नये, म्हणून रंगास्वामी यांनी आतापासूनच मुख्यमंत्रिपदाची सेटिंग लावण्यास सुरुवात केल्याचे राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले. रंगास्वामी यांच्याशी भाजपलाही युती करायची आहे. त्यामुळे भाजप नेते अमित शाह हे रंगास्वामी यांच्या संपर्कात आहेत. रंगास्वामी यांनी काँग्रेससोबत घरोबा करू नये, म्हणून शाह यांनीही प्रयत्न सुरू केला असून या दोन्ही नेत्यांची लवकरच भेट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रंगास्वामी यांनी भाजपशी युती करण्याच्या चर्चांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मी पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच भाजपसोबत युती करायची, की नाही याचा निर्णय घेणार आहे, असे सांगून रंगास्वामी यांनी सर्वांनाच बुचकाळ्यात पाडले आहे. मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठीच रंगास्वामी यांनी भाजपवर दबाव तंत्राचा वापर सुरू केल्याचेही बोलले जात आहे. रंगास्वामी हे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री आहेत. दक्षिण भारतातील वन्नियार समुदायाचे ते नेते आहेत. सरकारी विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेे. कोणत्याही सुरक्षेशिवाय आपल्या मतदारसंघात फिरणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. कोणत्याही परवानगी शिवाय राज्यातील कोणताही नागरिक कधीही रंगास्वामी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटू शकतो. के. कामराज यांच्या कामावर प्रभावित होऊन रंगास्वामी हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणाकडे आकर्षित झाले होते. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच जनतेच्या हिताची कामे सुरू केली होती. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा 1990मध्ये थत्तनचावडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांना पराभव स्वीकारावा लागला; परंतु नंतरच्या विधानसभा निडवणुकीत विजयी झाल्यानंतर थेट राज्याचे कृषी आणि सहकार मंत्री झाले. त्यानंतर 1996मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2001मध्ये पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. 2006च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 500 मते मिळाली होती. 2008मध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजकारणाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे व्ही. वैथिलिंगम हे मुख्यमंत्री झाले; मात्र 7 फेब्रुवारी 2011 रोजी रंगास्वामी यांनी ऑल इंडिया एनआर काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात झालेल्या निवडणुकीत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवून रंगास्वामी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.  रंगास्वामी यांची राजकीय ताकद पाहता भारतीय जनता पक्षाला त्यांना दुखावून चालणार नाही. गेल्या निवडणुकीतही त्यांनी सात जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. केंद्र सरकारने नियुक्त केलेले तीन सदस्य म्हणजे निवडणुकीत यश मिळण्याची खात्री नसते. काँग्रेसचे काही सदस्य हाताशी आले, म्हणजे निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यासाठी ऑल इंडिया एनआर काँग्रेसची मदत भाजपला लागणार आहे. भाजप वगळूनही ते सत्तेत येऊ शकतात; परंतु एनआर काँग्रेस वगळून भाजप सत्तेत येऊ शकत नाही. भाजपलाही याची जाणीव आहे. त्यामुळे तर रंगास्वामी यांनी भाजपची कोंडी केली आहे. भाजपला ही कोेंडी सोडविता आली नाही, तर भाजपला सत्तेपासून दूर राहावे लंनी भाजपची कोंडी केली आहे. भाजपला ही कोेंडी सोडविता आली नाही, तर भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागेल. काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. काँग्रेस सत्तेबाहेर गेली आहे. पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता दिसत नसताना भारतीय जनता पक्ष आणि एनआर काँग्रेस यांच्यात अभेद्य युती व्हायला हवी. भारतीय जनता पक्षाला मात्र मित्रपक्षाला काहीच देण्याची इच्छा नाही. सत्तेसाठी तो मित्रपक्षालाही दूर ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तर रंगास्वामी यांनी भाजपची कोंडी केली आहे. या कोंडीतून भाजप कसा मार्ग काढतो, हे पाहायचे. दक्षिणेत स्वबळावर सत्ता आली नाही, तरी मित्रपक्षाच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी भाजप घालवितो का, स्वबळावर सत्तेत येण्यासाठी आणखी काही व्यूहरचना आखतो, याकडे आता लक्ष लागले आहे. 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भाजपला चेकमेट
भाजपला चेकमेट
https://1.bp.blogspot.com/-5jqzrNyEr2g/YENnc5kP8CI/AAAAAAABoyM/Mn3KeHkXvo4Y9yW52v5rM0-CcWvcwSLCgCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-5jqzrNyEr2g/YENnc5kP8CI/AAAAAAABoyM/Mn3KeHkXvo4Y9yW52v5rM0-CcWvcwSLCgCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_977.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_977.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content