मुंबई/प्रतिनिधीः कोरोना काळात नोकरी गेली म्हणून एका तरुणाने भाजीपाला विकण्यास सुरुवात केली; पण या व्यवसायातून त्याची पावले भलतीकडेच वळली आणि...
मुंबई/प्रतिनिधीः कोरोना काळात नोकरी गेली म्हणून एका तरुणाने भाजीपाला विकण्यास सुरुवात केली; पण या व्यवसायातून त्याची पावले भलतीकडेच वळली आणि आता त्याला पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले. मुंबईतील कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तानाजीनगर परिसरात ही घटना घडली.
याठिकाणी एक भाजीचे गोदाम आहे. त्यात एक व्यक्ती गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा ठेवत असल्याची सूचना कुरार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कुरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वेले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोदामावर छापा टाकला.या ठिकाणी कांद्याच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या; मात्र त्याआड गांजाचा मोठा साठादेखील लपवण्यात आला होता. पंचनामा केल्यानंतर कुरार पोलिसांनी तीन पोती गांजा जप्त केला. या गांजाची किंमत साधारण नऊ लाख 45 हजारांच्या आसपास आहे. या तरुणाची कहाणी अशी आहे, की टाळेबंदीच्या काळात या तरुणाची नोकरी गेली होती. तेव्हा त्याने पोटापाण्यासाठी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तो थेट शेतातून शेतमाल मागवून ग्राहकांना विकत असते. घरापासून थोड्या अंतरावरच त्याचे भाजीचे गोदाम होते. याठिकाणी तो भाजीपाल्या बरोबरच गांजा ठेवत असे. संबंधित आरोपीचे नाव सचिन आहे. याठिकाणी पोलिसांनी 63 किलो गांजा जप्त केला आहे. ओडिशामधून आलेल्या भाजीच्या साठ्यातून हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साधारण 9 लाख 45 हजारांच्या आसपास आहे.