सातारा / प्रतिनिधी : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. पण, पुन्हा एकदा ...
सातारा / प्रतिनिधी : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. पण, पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे. त्या टप्प्यावरून पुन्हा 5 महिने म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मात्र, सामाजिक अंतराच्या अटीचे पालन करून होणार आहे.
सहकाराच्या निवडणुका गेल्या वर्षापासून स्थगितीच्या फेर्यात अडकल्या आहेत. सुरुवातीला मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तीन महिने पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर 18 मार्च, 17 जून, 28 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ मिळाली. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली गेली. त्यानंतर 16 मार्चच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शासनाने 16 जानेवारीचा आदेश रद्द करून पुन्हा मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सातारा जिल्हा बँकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.