$type=ticker$snippet=hide$cate=0

नगर अर्बनचा सोनेतारण घोटाळा वेगळ्या वळणावर ; फसवणूक झाल्याचा कर्जदारांचाच दावा

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण घोटाळा वेगळ्या वळणावर जाण्याच्या मार्गावर आहे. या घोटाळ्या...

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण घोटाळा वेगळ्या वळणावर जाण्याच्या मार्गावर आहे. या घोटाळ्यातील 364 पिशव्यांचा येत्या 15 रोजी बँकेने लिलाव पुकारला आहे. त्याआधी पैसे भरण्याच्या नोटिसा कर्जदारांना पाठवल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर या कर्जदारांपैकी काहींनी बँकेच्या अधिकार्‍यांकडून व गोल्ड व्हॅल्युअरकडूनच आमची फसवणूक झाल्याचा दावा करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी येत्या 12 एप्रिलपासून शेवगाव शाखेसमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. 


    थकबाकीदारांची फसवणूक करणार्‍या शेवगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर यांचे एक रॅकेट आहे. या कर्जदार थकबाकीदारांना विश्‍वासात घेऊन या रॅकेटने पद्धतशीरपणे त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या थकीत सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमानुसार एका व्यक्तीला किती सोने तारण पावत्या करता येतात, परस्पर नूतनीकरण करता येते काय? सगळ्या सोने तारणच्या वस्तु एक सारख्याच कशा? (ब्रासलेट, बांगडी स्वरुपात) असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत असल्याने या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या कर्जदारांनी केली आहे. नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या शेवगाव शाखेतील कथित सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांची फसवणूक करणार्‍यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवार दि. 12 एप्रिलपासून शेवगाव शाखेच्या कार्यालयासमोर फसवणूक झालेल्या व्यक्तींसह बेमुदत उपोषण करणार असल्याची महिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी नगर येथे दिली.  याबाबतचे निवेदन नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या प्रशासकांना देण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, तालुका संघटक सलीम जिलानी शेख तसेच फसवणूक झालेले थकबाकीदार सचिन महाजन, अशोक लोढे, गणेश भोंडे, बालाजी महाजन, अनिल निकम, संतोष झिंजे, शेषराव नवले, मच्छिंद्र निकम, कृष्णा महाजन यावेळी उपस्थित होते.


फसवणुकीच्या तक्रारीची दखलच नाही

नगर अर्बन बँकेने शेवगाव शाखेतील सोने तारण कर्जदार व थकबाकीदारांची यादी नावसाहित प्रसिद्ध केली असून कर्जाची रक्कम व्याजासह 14 एप्रिलपर्यंत भरावी, अन्यथा,फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बँकेच्या प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व सोनेतारण कर्जदार व थकबाकीदार हे सर्वसामान्य, गरीब, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. त्यांनी सोने तारण कर्ज प्रकरणाबद्दल नगर अर्बन बँक कार्यालयाशी संपर्क साधून शेवगाव शाखेतील गोल्ड व्हॅल्युअरकडून आपली फसवणूक झाली असल्याचे वारंवार लेखी स्वरूपात कळविले आहे. परंतु नगर अर्बन बँक प्रशासनाने या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही किंवा चौकशी देखील केली नाही. उलट कुठलीही चौकशी न करताच संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संबंधित थकीत कर्जदार हवालदिल झाले असून त्यातील एका व्यक्तीने मागील महिन्यात आत्महत्या केली आहे. एवढे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने चौकशी न करताच सरसकट कारवाई केल्यास थकीत कर्जदारांना व ज्यांची सोने तारण प्रकरणात फसवणूक झाली आहे, अशा सर्व थकबाकीदारांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकार्‍यांमार्फत सखोल चौकशी करूनच पुढील कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक सर्व नियम व अटी पाळून थकीत कर्जदार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत, असे स्पष्ट केले गेले आहे. या निवेदनाच्या प्रति माहितीसाठी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक व शाखा व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत.




Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगर अर्बनचा सोनेतारण घोटाळा वेगळ्या वळणावर ; फसवणूक झाल्याचा कर्जदारांचाच दावा
नगर अर्बनचा सोनेतारण घोटाळा वेगळ्या वळणावर ; फसवणूक झाल्याचा कर्जदारांचाच दावा
https://1.bp.blogspot.com/-AMUWfmwQe2o/YG3IpRh2gDI/AAAAAAABpmc/JDEvHOXdEjoT5tucmdkXj9hwrjQwjeCaQCLcBGAsYHQ/s320/7-urban-vanchit%2Buposhan.jpg
https://1.bp.blogspot.com/-AMUWfmwQe2o/YG3IpRh2gDI/AAAAAAABpmc/JDEvHOXdEjoT5tucmdkXj9hwrjQwjeCaQCLcBGAsYHQ/s72-c/7-urban-vanchit%2Buposhan.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_253.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_253.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content