कराड / प्रतिनिधी : सध्या संपुर्ण भारतामध्ये कोव्हिड-19 च्या अनुषंगाने 45 वर्षावरील सर्व नागरीकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु असून देशात मोठ...
कराड / प्रतिनिधी : सध्या संपुर्ण भारतामध्ये कोव्हिड-19 च्या अनुषंगाने 45 वर्षावरील सर्व नागरीकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु असून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण सुरु आहे. याअनुषंगाने मलकापूर नगरपरिषद आरोग्य विभाग व जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्र, काले अंतर्गत मलकापूर आरोग्य उपकेंद्र यांचे संयुक्त विद्यामाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कोव्हिड-19 नागरी लसीकरण केंद्र शुभारंभ आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला. त्यावेळी कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, नगराध्यक्ष सौ. निलम येडगे, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर व नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
शुभारंभप्रसंगी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मलकापूर शहरातील नागरीकांना लसीकरणाचा लाभ घेण्याचे अवाहन केले. मलकापूर शहराच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे पुर्व भागात भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय, नगरपरिषद कार्यालयाशेजारी, मलकापूर व पश्चिम भागात गणेश कॉलनी आगाशिवनगर याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास आणखी एखादे लसीकरण केंद्र उभारणेत येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपरिषदेचे मागणीप्रमाणे मलकापूर शहरास 2 लसीकरण केंद्र मंजूर झाली आहेत. त्यापैकी एक केंद्र भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय, मलकापूर व दुसरे केंद्र प्रेमलाताई चव्हाण महिला विकास केंद्र गणेश कॉलनी, आगाशिवगर या ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे. ज्या नागरीकांना बी. पी. शुगर, दमा इत्यादी आजार आहेत. त्यांनी याबाबतची कल्पना लसीकरण केंद्रामध्ये द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शकुंतला शिंगण व नगरसेविका सौ. कमल कुराडे, सौ. गितांजली पाटील, सौ. स्वाती तुपे, सौ. नंदा भोसले, सौ. भारती पाटील, सौ. आनंदी शिंदे, सौ. कमल कुराडे, सौ. पुजा चव्हाण, सौ.अलका जगदाळे, सौ. नुरजहॉन मुल्ला, सौ. निर्मला काशिद व नगरसेवक, आनंदराव सुतार, किशोर येडगे, सागर जाधव, आबा सोळवंडे तसेच मंडल अधिकारी पंडित पाटील व तलाठी सचिन निकम उपस्थित होते.